Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेर एम.डी. ड्रग्ज रॅकेटचे धागेदोर कोणापर्यंत? जिल्हा न्यायालयात नेमकं काय घडलं… आता एक नव्हे तर चार आरोपी

28/09/2026

१०० वे पुण्यात, तर १०१ वे साहित्य संमेलन संगमनेरमध्ये, दुर्गाताई तांबे यांची मोठी घोषणा!

28/09/2026

कांदा व्यापाऱ्यावर कोयत्याने वार करणारा फरार आरोपी अखेर दोन वर्षानंतर एलसीबीच्या जाळ्यात

28/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » एसटी बसवर दगड फेक करत सरकारी नोकरावर हल्ला करणे भोवले; न्यायालयाने कारावासासोबत केली 15 हजार रूपये दंडाची शिक्षा
न्यायालय

एसटी बसवर दगड फेक करत सरकारी नोकरावर हल्ला करणे भोवले; न्यायालयाने कारावासासोबत केली 15 हजार रूपये दंडाची शिक्षा

संगमनेरच्या जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाचा निर्णय
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar06/09/2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज

संगमनेर – रस्ता ओलांडताना एसटी बस जवळून गेल्याचा राग आल्याने बसवर दगडफेक करत बस चालकाच्या केबिनमध्ये शिरून कंडक्टरला मारहाण करणे आरोपीला चांगलेच भोवले आहे. याप्रकरणी आरोपीला संगमनेरच्या जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्यायाधीश योगेश मनाठकर यांनी तीन महिने सश्रम कारावास आणि पंधरा हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे.

काय होती घटना: आठ वर्षांपूर्वी 2 सप्टेंबर 2015 रोजी नासिक-पुणे राष्ट्रीय महामार्गावर प्रवरा नदी पुलाजवळ ही घटना घडली होती. नाशिक-पलूस-सांगली (MH 14 BN 4239) ही एसटी बस संगमनेर बस स्थानकातून सांगलीच्या दिशेने जात असताना प्रवरा नदी पुलापाशी रस्ता ओलांडणाऱ्या इसमाच्या जवळून बस गेल्याने त्याला याचा राग आला. त्यामुळे त्याने एसटी बसवर दगड फेकून मारल्याने बस चालकाने एसटी बस थांबविली असता आरोपीने बस चालकाच्या घेऊन मध्ये चढत चालक आणि वाहकाला मारहाण केली. वाहकाच्या हाताला चावा घेत त्यांचे कपडे देखील फाडले. त्यामुळे एसटी बसमधील प्रवाशांनी मध्यस्थी करत वाद मिटविण्याचा प्रयत्न केला.

आरोपी विरोधात गुन्हा: दरम्यान नजीकच्या रुग्णालयात उपचार घेत असताना आरोपीने तेथे देखील येऊन शिवीगाळ, दमदाटी, झटापट केली. या झटापटीत वाहकाचा मोबाईल देखील गहाळ झाला होता. त्यानंतर या संदर्भात एसटी बसचे वाहक धनाजी बळवंत भालेकर यांनी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी अफजल अन्सार पठाण यांच्या विरोधात भारतीय दंड विधान कलम 353, 332, 504, 506, 427 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.

यांनी केला तपास, यांच्यासमोर झाली सुनावणी: तत्कालीन पोलीस हेडकॉन्स्टेबल व सध्याचे पोलीस उपनिरीक्षक इस्माईल शेख यांनी याप्रकरणी तपास करत आरोपी विरोधात संगमनेरच्या जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते. न्यायाधीश योगेश मनाठकर यांच्यासमोर या खटल्याची सुनावणी झाली. सरकार पक्षाच्यावतीने ॲड. संजय वाकचौरे यांनी काम बघितले.

शिक्षा: न्यायालयात सरकार पक्षाच्यावतीने वैद्यकीय अधिकारी, फिर्यादी, वाहक व तपास अधिकारी या चार साक्षीदारांची साक्ष नोंदविण्यात आली. सरकारी अभियोक्ता वाकचौरे यांनी प्रबळ युक्तीवाद केला. सरकार पक्ष आणि आरोपीच्या वकिलांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायाधीश वाय. पी मनाठकर यांनी आरोपी अफजलखान अन्सारख्वान पठाण (रा. नाईकवाडपुरा, संगमनेर) यास दोषी धरत भारतीय दंड विधान कलम 353 नुसार 3 महिने सश्रम कारावास व 15,000/-रुपये दंड, दंड न भरल्यास एक महिना सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली.

यांची झाली मदत: सदरच्या केसमध्ये सरकारी अभियोक्ता संजय वाकचौरे यांना पैरवी अधिकारी पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रवीण डावरे, महिला पोलीस कॉन्स्टेबल दिपाली दवंगे, नयना पंडीत, स्वाती नाईकवाडी, प्रतिमा थोरात यांनी सहकार्य केले.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 799
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेर एम.डी. ड्रग्ज रॅकेटचे धागेदोर कोणापर्यंत? जिल्हा न्यायालयात नेमकं काय घडलं… आता एक नव्हे तर चार आरोपी

28/09/2026

चेक अनादर प्रकरणात संगमनेर न्यायालयाने आरोपीस ठोठावला एक वर्षाचा कारावास; दोन लाखांची नुकसान भरपाई व ९ टक्के व्याजासह रक्कम देण्याचा निर्णय

23/09/2026

फायनान्सचा चेक बाऊन्स: अकोले तालुक्यातील कर्जदाराला ६ महिने कारावास आणि दुप्पट दंडाची शिक्षा

04/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
न्यायालय

संगमनेर एम.डी. ड्रग्ज रॅकेटचे धागेदोर कोणापर्यंत? जिल्हा न्यायालयात नेमकं काय घडलं… आता एक नव्हे तर चार आरोपी

By Annant Ppangarkar28/09/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- संगमनेर शहरातील बहुचर्चित एम.डी. (M.D.) ड्रग्ज तस्करीत दररोज नवनवीन आणि धक्कादायक…

१०० वे पुण्यात, तर १०१ वे साहित्य संमेलन संगमनेरमध्ये, दुर्गाताई तांबे यांची मोठी घोषणा!

28/09/2026

कांदा व्यापाऱ्यावर कोयत्याने वार करणारा फरार आरोपी अखेर दोन वर्षानंतर एलसीबीच्या जाळ्यात

28/09/2026

संगमनेरमधील एका निष्ठावान शिवसैनिकाचा अनुभव व्हायरल; तत्कालीन मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यावरील शाईफेकीने चर्चेत आलेले ठाकरे गटाचे तत्कालीन पदाधिकारी भाऊसाहेब हासे यांनी केलेले वक्तव्य चर्चेत! बाळासाहेब थोरात यांना… ते तर…!

28/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.