Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

सोमवार २८ सप्टेंबर — जाणून घ्या आजच्या दिवसाचे राशिभविष्य

28/09/2026

सहकाराची परंपरा जपण्यासाठी अहिल्यानगर जिल्हा बँक निवडणूक बिनविरोध करण्यासाठी सर्वपक्षीय नेत्यांचे एकमत, संगमनेरात पार पडली बैठक; या नेत्यांची होती उपस्थिती

27/09/2026

संगमनेर तालुक्यातील खंडेरायवाडी येथे टोमॅटो तोडण्याच्या वादातून हाणामारी, विनयभंग; १२ जणांवर गुन्हा दाखल

27/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » दूधगंगेची वाट लावणारे पांढऱ्या कपड्यातील लुटारू..!
पत्रकारिता

दूधगंगेची वाट लावणारे पांढऱ्या कपड्यातील लुटारू..!

रविवार विशेष
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar10/09/2023No Comments3 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज @ अनंत पांगारकर

संगमनेर तालुक्याच्या विकासाचा पाया सहकारावर आधारित आहे. सहकाराच्या माध्यमातून या तालुक्याने भरारी घेत राज्यात दिशादर्शक काम केले आहे. दिवंगत माजी मंत्री बी. जे. खताळ पाटील, दिवंगत स्वातंत्र्य सेनानी सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात या प्रमुख नेत्यांसह सहकारात काम करणाऱ्या अनेकांनी तालुक्यात सहकाराचा पाया रोवला. या सहकारातून समृद्धीची राज्यालाच नव्हे तर देशाला दिशा दिली. समाजाच्या प्रगतीचे उद्दिष्ट समोर ठेवून तत्कालीन धुरीनांनी हा सहकार जसा वाढवला, जोपासला तसाच तो संपविण्याचे काम आता पांढऱ्या कपड्यातील लुटारू करीत असल्याचे दिसून येत आहे.

सहकारात अपप्रवृत्ती: संगमनेर तालुक्यात पतसंस्थांची चळवळ जोमात उभी राहिली आहे. माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी येथील सहकार जोपासताना या पतसंस्था चळवळीला पुढे नेले. येथील अनेक पतसंस्था आज नावलौकिक मिळविताना आदर्श कारभाराच्या बळावर तालुक्याला समृद्ध करत असताना सहकारातील काही अपप्रवृत्तींनी या चळवळीला बदनाम करण्यासाठी आणि स्वतःचे खिसे भरण्यासाठी चुकीचा वापर केल्याचे यापूर्वी काही प्रकरणातून समोर आले आहे. हजारो कोटी रुपयांच्या ठेवी असलेल्या या पतसंस्था चळवळीचा पाया आता पांढऱ्या कपड्यातील लुटारुंमुळे ढासळू लागल्याचे दिसत आहे.

पतसंस्थांची वाट लागली: पतसंस्थांमध्ये संचालक मंडळाने अव्वाच्या सव्वा कर्ज वाटप करणे, स्वतः लाखो रुपयांची कर्ज उचलणे, नियमबाह्य गुंतवणुका करणे, चुकीच्या पद्धतीने केलेल्या कारभारामुळे तालुक्यात अनेक पतसंस्थांची वाट लागली. यावर संगमनेरच्या सहकारात काम करणाऱ्या आणि दूधगंगा नागरी पतसंस्थेचा संस्थापक म्हणून मिरविणाऱ्या भाऊसाहेब कुटे याने तर कडी केली. दुग्ध व्यवसायिक शेतकऱ्यांची आर्थिक कामधेनु म्हणून नावलौकिक मिळविलेल्या या संस्थेत संस्थापक पदापासून आत्तापर्यंत अव्याहतपणे चेअरमन राहिलेल्या कुटे याने काही सहकाऱ्यांसह तब्बल 81 कोटी रुपयांचा अपहार केल्याचे प्रकरण समोर आले आहे.

सहकारात मोठी जबाबदारी: कुटे तसे माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांचे सहकारी. त्यामुळे सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या उपाध्यक्षपदी दहा वर्ष, जिल्हा परिषद सदस्यपदी राहिले. आमदार बाळासाहेब थोरात यांनी समृद्ध सहकाराचा भाऊसाहेब थोरातांपासून घेतलेला वारसा निष्ठेने जोपासला, वाढविला. त्यामुळे थोरात यांचे सहकारातील काम राज्यात संगमनेरला कायमच नावलौकिक मिळवून देणारे ठरले आहे. दूधगंगा नागरी सहकारी पतसंस्थेतील घोटाळ्याचे प्रकरण त्यांच्यापर्यंत पोहोचताच त्यांनी कुटे यांना पाठीशी न घालता चुकीचे सुरू असलेले प्रकार थांबविण्याचा सल्ला दिल्याचे बोलले जाते. मात्र थोरात यांच्याकडून या प्रकरणात सहकार्य होण्याची अपेक्षा मावळल्याने कुटे काहीसे दुरावले असल्याचे बोलले जात होते.

भाजपच्या वॉशिंग मशीनमध्ये: यातूनच राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवरून पायउतार झाल्यानंतर महायुतीचे सरकार सत्तेत आल्यावर याचे दृश्य परिणाम दिसू लागले होते. आपण अडचणीत सापडणार असल्याचे दिसताच कुटे यांनी संगमनेरातील आणखी काही पदाधिकाऱ्यांसह भाजपच्या राज्यातील एका बड्या नेत्याच्या माध्यमातून भाजपची वाट धरण्याचा निर्णय घेतला असल्याच्या चर्चा सुरू होत्या. मात्र जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका लांबल्या आणि हा निर्णय तूर्तास थांबला होता. निवडणुका लागल्या असत्या तर कदाचित कुटेसह तालुक्यातील आणखी काही भ्रष्टाचारी पदाधिकारी भाजपच्या वॉशिंग मशीनमध्ये स्वच्छ देखील झाले असते. मात्र त्यापूर्वीच कुटे यांच्यावर कारवाईचे गंडांतर आले आणि यांना कारवाईला सामोरे जावे लागले आहे.

सहकाराला डाग: दहा वर्ष सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात कारखान्याच्या उपाध्यक्षपदी, जिल्हा परिषद सदस्यपदी आणि सलग तीस वर्ष दूधगंगा नागरी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी राहिलेल्या माणसाला स्वतःच्या जबाबदारीची जाणीव असू नये एवढेही कुटे अडाणी असतील असे वाटत नाही. न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी त्यांनी सर्व जबाबदारी व्यवस्थापकावर ढकलून दिलेले कारण निश्चितच विचार करायला लावणारे आहे. कुटुंबीयासह इतरांना मर्यादेबाहेर जाऊन केलेले कर्जवाटप, लेखापरीक्षकाने घेतलेले आक्षेप आणि फिर्यादीतील मुद्दे कुटे यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारे आहेत. ठेवीदारांनी कवडी-कवडी बाजूला काढत भविष्याची तरतूद म्हणून ठेवलेल्या दूधगंगेतील 81 कोटींच्या ठेवींवर हात साफ करणारे नक्कीच राज्यात राजकारणासह सहकारात चांगले काम करणाऱ्या पदाधिकाऱ्यांना आणि सहकाराला डाग लावण्याचे काम करत असल्याचे बोलले जाते.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,733
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

जिल्हाधिकारी साहेब एकदा रस्त्यावर पायी फिराच! संगमनेरातील अतिक्रमण हटाव मोहीम दिखावा की केवळ समाधान?

05/08/2026

संगमनेरमध्ये रेशनच्या धान्याचा काळा बाजार? पोलीस अन् पुरवठा विभागाच्या संशयास्पद भूमिकेने संभ्रम!

05/08/2026

अतिक्रमणाच्या नावाखाली संगमनेरात गरिबांवर बुलडोझर, धनदांडग्यांवर मेहेरनजर; ‘सिंघम’ बनलेल्या प्रशासनाविरोधात नागरिकांचा संतप्त सवाल

19/07/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राशिभविष्य

सोमवार २८ सप्टेंबर — जाणून घ्या आजच्या दिवसाचे राशिभविष्य

By Annant Ppangarkar28/09/20260

आजचे राशिभविष्य  मेष- आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत उत्साहाचा आणि ऊर्जादायी राहील. कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या…

सहकाराची परंपरा जपण्यासाठी अहिल्यानगर जिल्हा बँक निवडणूक बिनविरोध करण्यासाठी सर्वपक्षीय नेत्यांचे एकमत, संगमनेरात पार पडली बैठक; या नेत्यांची होती उपस्थिती

27/09/2026

संगमनेर तालुक्यातील खंडेरायवाडी येथे टोमॅटो तोडण्याच्या वादातून हाणामारी, विनयभंग; १२ जणांवर गुन्हा दाखल

27/09/2026

रविवार विशेष लेख— साहिलचा मृत्यू; शिक्षणाच्या मंदिरातील प्रश्न आता टाळता येणार नाहीत!

27/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.