Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

सोमवार २८ सप्टेंबर — जाणून घ्या आजच्या दिवसाचे राशिभविष्य

28/09/2026

सहकाराची परंपरा जपण्यासाठी अहिल्यानगर जिल्हा बँक निवडणूक बिनविरोध करण्यासाठी सर्वपक्षीय नेत्यांचे एकमत, संगमनेरात पार पडली बैठक; या नेत्यांची होती उपस्थिती

27/09/2026

संगमनेर तालुक्यातील खंडेरायवाडी येथे टोमॅटो तोडण्याच्या वादातून हाणामारी, विनयभंग; १२ जणांवर गुन्हा दाखल

27/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » पत्रकारिता अभ्यासक्रमातून जाणीवा समृद्ध होतात: डॉ. संजय मालपाणी
पत्रकारिता

पत्रकारिता अभ्यासक्रमातून जाणीवा समृद्ध होतात: डॉ. संजय मालपाणी

समाजहित जोपासणारी पत्रकारिता आवश्यक: कैलास सोमाणी
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar11/09/2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज

संगमनेर – आपली भाषा समृध्द असली की जाणीवा समृध्द होतात. संगमनेर महाविद्यालयातर्फे चालवल्या जाणाऱ्या पदव्युत्तर पदविका पत्रकारिता अभ्यासक्रमाच्या माध्यमातून केवळ पत्रकारितेचे विविध पैलूंच शिकविले जात नाहीत तर जाणीवा समृध्द केल्या जातात, असे प्रतिपादन शिक्षण प्रसारक संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ. संजय मालपाणी यांनी केले.

यांची उपस्थिती: संगमनेर महाविद्यालयाच्यावतीने चालवल्या जाणाऱ्या पुणे विद्यापीठाच्या पत्रकारिता अभ्यासक्रमाच्या गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार सोहळ्यात मालपाणी बोलत होते. यावेळी व्यासपीठावर उद्योजक कैलास सोमाणी, महाविद्यालयाचे कार्यकारणी सदस्य मधुसूदन नावंदर, महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो. अरूण गायकवाड, पत्रकारिता अभ्यासक्रमाचे प्रमुख डॉ. संतोष खेडलेकर उपस्थित होते.

मालपाणी म्हणाले, संगमनेर महाविद्यालयात मागील बारा वर्षांपासून चालविल्या जाणाऱ्या या अभ्यासक्रमात विद्यार्थी, गृहिणी, डॉक्टर्स, पत्रकार, उद्योजक, व्यापारी, शिक्षक, सरकारी अधिकारी अशा विविध स्तरात कार्यरत मराठी भाषाप्रेमी सहभागी होतात व भाषेच्या विविध पैलूंचा अभ्यास करतात.

उद्योजक कैलास सोमाणी म्हणाले, लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या पत्रकाराची जबाबदारी फार मोठी असते. हा अभ्यासक्रम पूर्ण करून बाहेर पडलेल्या पत्रकारांनी समाजातल्या विविध स्तरातील नागरिकांचे हित जोपासणारी पत्रकारिता करावी.

प्राचार्य गायकवाड म्हणाले, संगमनेर महाविद्यालयातील पुणे विद्यापीठाचा पत्रकारिता अभ्यासक्रम हा महाविद्यालयाच्या लौकिकात भर घालणारा विभाग आहे. यावेळी डॉ. संतोष खेडलेकर यांच्यासह गुणवंत विद्यार्थ्यांची भाषणे झाली.

यांचा झाला सत्कार: डॉ. किरण चांडक, नीतिन सूर्यवंशी, अविनाश बोधक, भाऊसाहेब कोटकर, संजय अहिरे, साईसुधा बच्चा, मंगल पेटकर, स्वप्नाली भुतडा-तापडे, अमोल गवांदे, अरविंद गाडेकर, दत्ता शेणकर, मिलिंद औटी, वृषाली कासट, बाळासाहेब बिन्नर, शाम कुलकर्णी आदींचा सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाचे संयोजन आणि सूत्रसंचालन पत्रकारिता अभ्यासक्रमाचे समन्वयक प्रा. सुशांत सातपुते यांनी केले.

पत्रकारिता अभ्यासक्रमासाठी प्रवेश सुरू…

विद्यार्थ्यांबरोबरच व्यावसायिक, नोकरदार यांच्या सुविधेसाठी दर रविवारी सकाळी संगमनेर महाविद्यालयात चालविल्या जाणाऱ्या पत्रकारिता अभ्यासक्रमासाठी कोणत्याही शाखेचे पदवीधर प्रवेश घेऊ शकतात. इच्छुकांनी प्रा. सुशांत सातपुते यांच्याशी कार्यालयीन वेळेत 9766760926 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन प्राचार्य डॉ. अरूण गायकवाड यांनी केले आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 506
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

जिल्हाधिकारी साहेब एकदा रस्त्यावर पायी फिराच! संगमनेरातील अतिक्रमण हटाव मोहीम दिखावा की केवळ समाधान?

05/08/2026

संगमनेरमध्ये रेशनच्या धान्याचा काळा बाजार? पोलीस अन् पुरवठा विभागाच्या संशयास्पद भूमिकेने संभ्रम!

05/08/2026

अतिक्रमणाच्या नावाखाली संगमनेरात गरिबांवर बुलडोझर, धनदांडग्यांवर मेहेरनजर; ‘सिंघम’ बनलेल्या प्रशासनाविरोधात नागरिकांचा संतप्त सवाल

19/07/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राशिभविष्य

सोमवार २८ सप्टेंबर — जाणून घ्या आजच्या दिवसाचे राशिभविष्य

By Annant Ppangarkar28/09/20260

आजचे राशिभविष्य  मेष- आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत उत्साहाचा आणि ऊर्जादायी राहील. कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या…

सहकाराची परंपरा जपण्यासाठी अहिल्यानगर जिल्हा बँक निवडणूक बिनविरोध करण्यासाठी सर्वपक्षीय नेत्यांचे एकमत, संगमनेरात पार पडली बैठक; या नेत्यांची होती उपस्थिती

27/09/2026

संगमनेर तालुक्यातील खंडेरायवाडी येथे टोमॅटो तोडण्याच्या वादातून हाणामारी, विनयभंग; १२ जणांवर गुन्हा दाखल

27/09/2026

रविवार विशेष लेख— साहिलचा मृत्यू; शिक्षणाच्या मंदिरातील प्रश्न आता टाळता येणार नाहीत!

27/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.