Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

स्वातंत्र्य दिन विशेष: ८० वर्षांचा भारत; स्वातंत्र्य मिळाले, पण आपण खरेच स्वतंत्र झालो का?

August 15, 2026

स्वातंत्र्य दिन विशेष: देशाला स्वातंत्र्य मिळाले, पण आम्हाला स्वातंत्र्य मिळाले का?

August 15, 2026

शनिवार, १५ ऑगस्ट २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

August 15, 2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » न्यायाधीशांविरोधात वकिलांचा एल्गार; बदली करा अन्यथा कामकाजावर टाकणार बहिष्कार
न्यायालय

न्यायाधीशांविरोधात वकिलांचा एल्गार; बदली करा अन्यथा कामकाजावर टाकणार बहिष्कार

न्यायाधीशाविरोधातील तक्रार चर्चेचा विषय
अनंत पांगारकरBy अनंत पांगारकरSeptember 13, 2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज

नाशिक – नाशिक जिल्हा न्यायालयातील एका न्यायाधीशांविरोधात नाशिकच्या वकिलांनी एल्गार दिला आहे. कामकाजावेळी अरेरावी करणे, अपमानास्पद वक्तव्य करणे, उद्घटपणे वर्तणूक करणे अशा स्वरूपाचे वर्तन हे न्यायाधीश महोदय करत असल्याने त्यांची त्वरित बदली करण्याची मागणी वकिलांनी केली आहे. अन्यथा त्यांच्या समोरील कामकाजावर बहिष्कार टाकण्याचा इशारा देण्यात आला आहे.

प्रधान न्यायाधीशांना निवेदन: वकिलांनी नाशिक बार कौन्सिलच्या वतीने आपल्या मागणीचे निवेदन प्रधान जिल्हा न्यायाधीश एस. डी. जगमलानी यांना दिले. एका न्यायाधीशांच्या विरोधात वकिलांनी उघड-उघड भूमिका घेत त्यांच्या समोरील कामकाजावर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिल्याने हा विषय राज्यभर चर्चेचा ठरला आहे.

तर मुंबई उच्च न्यायालयाकडे तक्रार: संबंधित न्यायाधीशांची जिल्हा विधी प्राधिकरणामध्ये बदली करण्यात यावी, अन्यथा त्या संदर्भात मुंबई उच्च न्यायालयात बार कौन्सिल तर्फे तक्रार करण्यात येईल असा असे या निवेदनामध्ये आहे. या न्यायाधीशांविरोधात वकिलांनी कौन्सिलकडे तक्रारी केल्याने नाशिक जिल्हा बार कौन्सिलची बैठक अध्यक्ष ॲड. नितीन ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली.

बैठक: बैठकीमध्ये वकिलांनी संबंधित न्यायाधीशांसमोर कामकाज करताना वकील सदस्यांना अपमानास्पद वागणूक मिळते. अरेरावी केली जाते. त्यामुळे अनेक वकील सदस्य त्या न्यायाधीशांच्या कोर्टात कामकाज करण्यात इच्छुक नाहीत, असे सांगत आपल्या तक्रारींच्या पाढा वकिलांनी बैठकीत वाचला.

उपस्थिती: बैठकीवेळी कौन्सिलचे सदस्य ॲड. जयंत जायभाये, बार कौन्सिलचे माजी अध्यक्ष ॲड. अविनाश भिडे, उपाध्यक्ष शेटे सचिव ॲड. हेमंत गायकवाड, ॲड. संजय गीते, ॲड. लीलाधर जाधव, ॲड. लाहोटी, ॲड. अरुण माळवदे, ॲड. प्रतीक शिंदे यांच्यासह विधीज्ञ उपस्थित होते. बैठकीत ॲड. अनंत कुलकर्णी, ॲड. झुंजार आव्हाड, ॲड. संतोष गटकळ, ॲड. पी. आर. गीते, ॲड. जी. डी. नवले, ॲड. केदार दंडणे, ॲड. संगीता चव्हाण आदींनी तक्रारी केल्या.

वकील सदस्यांना कामकाज करताना अपमानास्पद वागणूक देणाऱ्या न्यायाधीशांची बदली करण्याची मागणी बार कौन्सिल तर्फे करण्यात आली आहे तसे निवेदन बार कौन्सिल तर्फे प्रधान जिल्हा न्यायाधीशांना देण्यात आले ज्या न्यायाधीशान विरोधात तक्रार आहे त्या न्यायाधीशांसमोर वकील सदस्य कामकाज करण्यास इच्छुक नाहीत.

ॲड. नितीन ठाकरे, अध्यक्ष, नाशिक बार कौन्सिल.

anantpangarkar
अनंत पांगारकर

Post Views: 1,851
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
अनंत पांगारकर
  • Website

Related Posts

संगमनेरचे आमदार अमोल खताळ यांना सर्वोच्च न्यायालयाचा मोठा धक्का; आमदारकी टांगणीला

July 30, 2026

‘दत्तधाम’च्या गडगे महाराजाच्या पत्नी अन् मुलाला दिलासा; सत्र न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन मंजूर

July 22, 2026

संगमनेर पोलिसांचा धक्कादायक कारनामा; १२ वर्षांच्या अल्पवयीन मुलाला २० वर्षांचा दाखवून तब्बल पाच महिने डांबले जेलमध्ये; न्यायालयानं बजावली नोटीस, तपासी अधिकारी अडचणीत!

July 1, 2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
महाराष्ट्र संवाद विशेष

स्वातंत्र्य दिन विशेष: ८० वर्षांचा भारत; स्वातंत्र्य मिळाले, पण आपण खरेच स्वतंत्र झालो का?

By अनंत पांगारकरAugust 15, 20260

अमोल शेलकर- १५ ऑगस्ट २०२६ रोजी भारत आपल्या स्वातंत्र्याचा ८० वा वर्धापन दिन साजरा करत…

स्वातंत्र्य दिन विशेष: देशाला स्वातंत्र्य मिळाले, पण आम्हाला स्वातंत्र्य मिळाले का?

August 15, 2026

शनिवार, १५ ऑगस्ट २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

August 15, 2026

राज्यात खळबळ..! तहसीलदार निलंबित; ‘ते’ प्रकरण भोवलं

August 14, 2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.