Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेर एम.डी. ड्रग्ज रॅकेटचे धागेदोर कोणापर्यंत? जिल्हा न्यायालयात नेमकं काय घडलं… आता एक नव्हे तर चार आरोपी

28/09/2026

१०० वे पुण्यात, तर १०१ वे साहित्य संमेलन संगमनेरमध्ये, दुर्गाताई तांबे यांची मोठी घोषणा!

28/09/2026

कांदा व्यापाऱ्यावर कोयत्याने वार करणारा फरार आरोपी अखेर दोन वर्षानंतर एलसीबीच्या जाळ्यात

28/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » शुक्रवारपासून शिर्डीत अपर जिल्हाधिकारी कार्यालयाचे कामकाज सुरू होणार; या तालुक्यांच्या नागरिकांची नगरची पायपीट थांबणार
प्रशासन

शुक्रवारपासून शिर्डीत अपर जिल्हाधिकारी कार्यालयाचे कामकाज सुरू होणार; या तालुक्यांच्या नागरिकांची नगरची पायपीट थांबणार

उत्तर नगर जिल्ह्यासाठी असेल कार्यालय
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar14/09/2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

खासदार सदाशिव लोखंडे यांच्या उपस्थितीत महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते होणार शुभारंभ; अर्धन्यायिक प्रकरणाच्याही होणार शिर्डीत सुनावण्या…

बाळासाहेब कोळेकर शिर्डीचे पहिले अपर जिल्हाधिकारी

महाराष्ट्र संवाद न्यूज 

शिर्डी – शुक्रवारपासून (15 सप्टेंबर) शिर्डीमध्ये नागरिकांच्या सेवेसाठी अपर जिल्हाधिकारी कार्यालयाचा शुभारंभ होत आहे. राज्याचे महसूल मंत्री तथा अहमदनगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते या कार्यालयाचा शुभारंभ होत असून शिर्डीचे खासदार सदाशिव लोखंडे यांची यावेळी उपस्थिती राहणार आहे.

नव्याने सुरू होत असलेल्या या कार्यालयामुळे उत्तर नगरमधील कोपरगाव, राहाता, श्रीरामपूर, संगमनेर, अकोले व राहूरी या ६ तालुक्यातील नागरिकांना आता अर्धन्यायिक सुनावणी व इतर शासकीय कामांसाठी अहमदनगर येथे जाण्याची आवश्यक राहणार नसल्याने नागरिकांची मोठे पायपीट टळणार आहे.

अनेक दिवसापासून उत्तर अहमदनगर मधील नागरिकांना या कार्यालयाची प्रतिक्षा होती. या कार्यालयासाठी ६ पदांची निर्मिती करण्यात आली आहे. शिर्डीचे पहिले अपर जिल्हाधिकारी म्हणून बाळासाहेब कोळेकर यांनी पदभार स्विकारला आहे. अपर जिल्हाधिकारी हे कार्यालय प्रमुख असणार आहेत. त्याशिवाय नायब तहसीलदार, लघुलेखक (निम्नश्रेणी), अव्वल कारकून व २ लिपिक टंकलेखक कार्यरत असणार आहेत. अपर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अखत्यारित शिर्डी, संगमनेर व श्रीरामपूर प्रांतधिकारी तसेच ६ तालुक्यातील तहसीलदार, ५१ मंडळाधिकारी असणार आहेत.

काय असणार अपर जिल्हाधिकारी कार्यालयाचे कामकाज…

जिल्हाधिकारी यांच्यानंतर उत्तर नगरमधील सहा तालुक्यांतील प्रांतधिकारी, तहसीलदार, मंडळाधिकारी, तलाठी कार्यालयावर अपर जिल्हाधिकारी यांचे प्रशासकीय नियंत्रण असेल. अर्धन्यायिक प्रकरणात अपिलीय अधिकारी म्हणून अपर जिल्हाधिकारी कामकाज पाहणार आहेत. यात मुख्यत: सातबारा, फेरफार, कुळ वहिवाट, वहिवाट रस्ता अशा बऱ्याच प्रकरणात तहसीलदार किंवा उपविभागीय अधिकारी आदेश करत असतात. अशा प्रकरणात नागरिकांना अपर जिल्हाधिकारी यांच्याकडे अपिल करता येणार आहे. महसूल अधिनियम कलम २४७ अन्वये नागरिकांना हे अपील करता येणार आहे. गौण खनिजांमध्ये रेती, मुरूम, डबर, स्टोन क्रेशर खडी, विटा व माती या गौण खनिजांना परवाने देणे, विविध खाणपट्ट्यांना परवानगी देण्याचे काम अपर जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत चालविले जाणार आहे.

रेती घाटाचे संपूर्ण नियोजन अपर जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत होणार आहे. रेती लिलाव, मोजणी,दंडात्मक कारवाई असे विविध कामांवर नियंत्रण या कार्यालयाचे असणार आहे. सिलींग जमीन खरेदी-विक्री परवानगी देणे, नुकसान भरपाई देण्याचे कामकाज असणार आहे. उपविभागीय अधिकारी यांच्याकडील जात प्रमाणपत्र, नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र, भूसंपादन दाखला, बिनशेती प्रकरण, वृत्तपत्र शीर्षक, ऐपतीचा दाखला आदी विविध दाखल्यांमध्ये अपिलीय अधिकारी म्हणून कामकाज केले जाणार आहे. उत्तर अहमदनगर विविध शासकीय विभागांच्या नियमित बैठका, आढावा घेणे तसेच केंद्र व राज्य शासनाच्या योजनांच्या अंमलबजावणीसाठी सर्व शासकीय विभागाचे सनियंत्रण अधिकारी म्हणून अपर जिल्हाधिकारी कामकाज करणार आहेत.

अपर जिल्हाधिकारी कार्यालयाचा असा असेल पत्ता…

अपर जिल्हाधिकारी कार्यालय, 

श्री साईबाबा समाधी मंदीराच्या गेट क्रमांक २ शेजारी, शिर्डी, ता. राहता, जिल्हा अहमदनगर.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,122
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

५० लाखांची कथित खंडणी अन् प्रशासकीय अनागोंदी: मुख्याधिकारी सक्तीच्या रजेवर, जिल्हाधिकाऱ्यांची कठोर कारवाई; नायब तहसीलदार मोहसीन शेख यांच्याकडे अतिरिक्त पदभार

24/09/2026

अन्न व औषध प्रशासनाची संगमनेरमध्ये कारवाई: २.६० लाखांचे संशयास्पद ‘काऊ घी’ जप्त, तर भेसळप्रकरणी दुग्ध केंद्राचा परवाना निलंबित

22/09/2026

अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; सुमारे चार कोटी रुपयांचे संशयास्पद बटर जप्त

11/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
न्यायालय

संगमनेर एम.डी. ड्रग्ज रॅकेटचे धागेदोर कोणापर्यंत? जिल्हा न्यायालयात नेमकं काय घडलं… आता एक नव्हे तर चार आरोपी

By Annant Ppangarkar28/09/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- संगमनेर शहरातील बहुचर्चित एम.डी. (M.D.) ड्रग्ज तस्करीत दररोज नवनवीन आणि धक्कादायक…

१०० वे पुण्यात, तर १०१ वे साहित्य संमेलन संगमनेरमध्ये, दुर्गाताई तांबे यांची मोठी घोषणा!

28/09/2026

कांदा व्यापाऱ्यावर कोयत्याने वार करणारा फरार आरोपी अखेर दोन वर्षानंतर एलसीबीच्या जाळ्यात

28/09/2026

संगमनेरमधील एका निष्ठावान शिवसैनिकाचा अनुभव व्हायरल; तत्कालीन मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यावरील शाईफेकीने चर्चेत आलेले ठाकरे गटाचे तत्कालीन पदाधिकारी भाऊसाहेब हासे यांनी केलेले वक्तव्य चर्चेत! बाळासाहेब थोरात यांना… ते तर…!

28/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.