Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेर एम.डी. ड्रग्ज रॅकेटचे धागेदोर कोणापर्यंत? जिल्हा न्यायालयात नेमकं काय घडलं… आता एक नव्हे तर चार आरोपी

28/09/2026

१०० वे पुण्यात, तर १०१ वे साहित्य संमेलन संगमनेरमध्ये, दुर्गाताई तांबे यांची मोठी घोषणा!

28/09/2026

कांदा व्यापाऱ्यावर कोयत्याने वार करणारा फरार आरोपी अखेर दोन वर्षानंतर एलसीबीच्या जाळ्यात

28/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » संगमनेर फेस्टिव्हलमधून मिळणार सांस्कृतिक मेजवाणी! छत्रपतींच्या ‘दक्षिण दिग्विजय’ शौर्यगाथेने होणार शुभारंभ
सामाजिक

संगमनेर फेस्टिव्हलमधून मिळणार सांस्कृतिक मेजवाणी! छत्रपतींच्या ‘दक्षिण दिग्विजय’ शौर्यगाथेने होणार शुभारंभ

20 ते 24 सप्टेंबरला आयोजन
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar14/09/2023No Comments3 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज

संगमनेर – संगमनेरचा सांस्कृतिक मानबिंदू ठरलेला संगमनेर फेस्टिव्हल यंदा पंधरा वर्ष पूर्ण करीत आहे. यंदाही श्री स्थापनेच्या दुसर्‍या दिवसापासून सलग पाच दिवस विविध सांस्कृतिक आणि मनोरंजक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. पेशाने संगणक अभियंता असलेल्या दोघा तरुणांच्या ‘गोष्ट इथे संपत नाही..’ या छत्रपती शिवाजी महाराजांच्या दक्षिण दिग्विजयावरील शौर्यगाथेने फेस्टिव्हलचा शुभारंभ होणार आहे. यंदाच्या पाच दिवसांच्या संगमनेर फेस्टिव्हलमध्ये राज्यस्तरीय समूह नृत्यस्पर्धेसह अभिनेता भरत जाधव आणि निवेदिता सराफ यांच्या धम्माल मराठी नाट्यप्रयोगांचेही सादरीकरण होणार आहे. कार्यक्रमांसाठी प्रवेश खुला असल्याची माहिती संगमनेर फेस्टिव्हलचे जनक, राजस्थान युवक मंडळाचे अध्यक्ष मनीष मालपाणी यांनी दिली.

गेल्या पंधरा वर्षांपासून संगमनेरचा गणेशोत्सव म्हणजे ‘संगमनेर फेस्टिव्हल’ असे समीकरण घट्ट झाले आहे. दरवर्षी सादर होणार्‍या वीरगाथा, शौर्यगाथा, गायन, नृत्य, नाट्यप्रयोग, व्याख्याने, प्रवचने, कीर्तने, कवी संमेलन, लोककला अशा बहुरंगी सांस्कृतिक वैभवाने फेस्टिव्हलचा रंगमंच समृद्ध झाला आहे. यंदाच्या गणेशोत्सवातील पाच दिवस अशाच दिमाखदार कार्यक्रमांची मेजवाणी संगमनेरकरांना मिळणार आहे.

बुधवारी (20 सप्टेंबर) संगमनेर फेस्टिव्हलचा शुभारंभ होईल. सायंकाळी सहा वाजता पारंपरिक पद्धतीच्या सोहळ्यानंतर पेशाने संगणक अभियंता असलेल्या सारंग मांडके आणि सारंग भोईरकर या तरुण जोडगोळीच्या अफलातून कल्पनेतून साकारलेल्या ‘गोष्ट इथे संपत नाही’ या छत्रपती शिवरायांच्या शौर्यगाथेवरील कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. छत्रपतींचा दूरदर्शी स्वभाव आणि दक्षिणी पातशाही रक्षिण्याचा मुरब्बी डाव म्हणून महाराजांच्या दक्षिणस्वारीकडे बघितले जाते. म्हणूनच या स्वारीला इतिहास ‘दक्षिण दिग्विजय’ म्हणून ओळखतो. या मोहिमेतील रंजक, थरारक युद्ध कथांसह राजांच्या चाणाक्ष बुद्धिमत्तेचे दर्शन हे दोघे घडवणार आहेत.

गुरुवारी (21 सप्टेंबर) सायंकाळी 7 वाजता हिंदी चित्रपटसृष्टीतील अजरामर गीतांची सुरेल मैफील रंगणार आहे. झी, स्टार, सोनी अशा राष्ट्रीय मनोरंजन वाहिन्यांवरील स्पर्धांमध्ये गाजलेल्या चैतन्य कुलकर्णी, गौरी गोसावी, रवींद्र खोमणे व श्रावणी महाजन यांच्यासह बाराहून अधिक संगितवृंदांचा समावेश असलेला ‘बेस्ट ऑफ बॉलिवूड लाईव्ह’ हा कार्यक्रम होणार आहे. शालेय व महाविद्यालयीन कलाकारांना हक्काचा रंगमंच उपलब्ध करुन देणार्‍या संगमनेर फेस्टिव्हलमध्ये यंदाही ‘डान्सींग सुपरस्टार’ ही राज्यस्तरीय समूह नृत्यस्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. शुक्रवारी (22 सप्टेंबर) सायंकाळी 6 वाजल्यापासून दोन गटात होणार्‍या या स्पर्धेसाठी दोन्ही गटात मिळून एक लाख रुपयांची रोख बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. चित्रपट क्षेत्रातील विख्यात नृत्यदिग्दर्शक वैभव घुगे या कार्यक्रमाचे प्रमुख परिक्षक म्हणून जबाबदारी सांभाळणार आहेत.

शनिवारी (23 सप्टेबर) सायंकाळी 7 वाजता मराठी सिनेमात धुमाकूळ घालणार्‍या धम्माल विनोदी अभिनेता भरत जाधव यांच्या चौदा भूमिकांचा नवा कोरा कल्ला असलेल्या ‘तूतूमीमी’ या भन्नाट विनोदी नाटकाचे आयोजन करण्यात आले आहे. कमलाकर सातपुते, निखिल चव्हाण, रुचिरा जाधव आणि ऐश्‍वर्या शिंदे यांच्याही या नाटकात प्रमुख भूमिका आहेत.

संगमनेर फेस्टिव्हलचा समारोप रविवारी (24 सप्टेंबर) सायंकाळी 7 वाजता मराठी रंगमंचावरील दिग्गज अभिनेत्री निवेदिता सराफ यांची प्रमुख भूमिका असलेल्या ‘मी स्वरा आणि ते दोघं’ या कौटुंबिक नाटकाने होणार आहे. आज झपाट्याने स्वीकारल्या जाणार्‍या ‘लिव्ह-इन-रिलेशनशीप’ संस्कृतीवर प्रकाश टाकून मानवी भावभावनांना उलगडणार्‍या या नाट्यप्रयोगात सुयश टिळक, रश्मी अनपट व श्रीरंग देशमुख यांच्याही प्रमुख भूमिका आहेत.

मालपाणी लॉन्स, कॉलेज रोड या ठिकाणी दिनांक 20 ते 24 सप्टेंबर अशा गणेशोत्सवातील पाच दिवस दररोज संगमनेरकरांना दिमाखदार सांस्कृतिक आणि मनोरंजनपर कार्यक्रमांची मेजवाणी मिळणार आहे. संगमनेर फेस्टिव्हलमधील कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन राजस्थान युवक मंडळाचे कार्याध्यक्ष सम्राट भंडारी, उपाध्यक्ष सुदर्शन नावंदर, सचिव ओंकार इंदाणी, कोषाध्यक्ष व्यंकटेश लाहोटी आदींनी केले आहे.

संगमनेर फेस्टिव्हलचा शुभारंभ पारंपरिक पद्धतीने मशाल प्रज्ज्वलित करुन केला जातो. यावेळी मालपाणी उद्योग समूहाच्या सुरक्षा विभागाकडून गणरायांना मानवंदनाही दिली जाते. यावर्षीही हा सोहळा रंगणार असून माजीमंत्री, आमदार बाळासाहेब थोरात, प्रांताधिकारी शैलेश हिंगे, पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे, तहसीलदार धिरज मांजरे, मुख्याधिकारी राहुल वाघ व पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांची उपस्थिती असणार आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 587
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेर ड्रग्ज प्रकरणातील सत्य जनतेसमोर आणा; सोशल मीडियावरील ‘मीडिया ट्रायल’ त्वरित थांबवा! — काँग्रेस कार्याध्यक्ष अमोल शेलकर यांचे पोलीस प्रशासनाला आवाहन; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन पारदर्शक चौकशीचे पुरावे मांडण्याची मागणी

24/09/2026

संगमनेर शहरात वाहतूक कोंडीचा बोजवारा: बेशिस्त रिक्षाचालक, फुटपाथवरील अतिक्रमणे अन् अवैध पार्किंगमुळे नागरिक त्रस्त; पोलीस प्रशासन ढिम्म

24/09/2026

‘संगमनेर फेस्टिव्हल’ हा संगमनेरकरांचा सांस्कृतिक मानबिंदू : मनीष मालपाणी १८ व्या संगमनेर फेस्टिव्हलचा सांगता सोहळा उत्साहात; विनोदी नाटकाने प्रेक्षकांना हसवले मनमुराद

22/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
न्यायालय

संगमनेर एम.डी. ड्रग्ज रॅकेटचे धागेदोर कोणापर्यंत? जिल्हा न्यायालयात नेमकं काय घडलं… आता एक नव्हे तर चार आरोपी

By Annant Ppangarkar28/09/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- संगमनेर शहरातील बहुचर्चित एम.डी. (M.D.) ड्रग्ज तस्करीत दररोज नवनवीन आणि धक्कादायक…

१०० वे पुण्यात, तर १०१ वे साहित्य संमेलन संगमनेरमध्ये, दुर्गाताई तांबे यांची मोठी घोषणा!

28/09/2026

कांदा व्यापाऱ्यावर कोयत्याने वार करणारा फरार आरोपी अखेर दोन वर्षानंतर एलसीबीच्या जाळ्यात

28/09/2026

संगमनेरमधील एका निष्ठावान शिवसैनिकाचा अनुभव व्हायरल; तत्कालीन मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यावरील शाईफेकीने चर्चेत आलेले ठाकरे गटाचे तत्कालीन पदाधिकारी भाऊसाहेब हासे यांनी केलेले वक्तव्य चर्चेत! बाळासाहेब थोरात यांना… ते तर…!

28/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.