Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेर एम.डी. ड्रग्ज रॅकेटचे धागेदोर कोणापर्यंत? जिल्हा न्यायालयात नेमकं काय घडलं… आता एक नव्हे तर चार आरोपी

28/09/2026

१०० वे पुण्यात, तर १०१ वे साहित्य संमेलन संगमनेरमध्ये, दुर्गाताई तांबे यांची मोठी घोषणा!

28/09/2026

कांदा व्यापाऱ्यावर कोयत्याने वार करणारा फरार आरोपी अखेर दोन वर्षानंतर एलसीबीच्या जाळ्यात

28/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » शिर्डीत अपर जिल्हाधिकारी कार्यालयाची शंभर कोटी खर्चून अत्याधुनिक इमारत उभारणार: महसूल राधाकृष्ण विखे-पाटील
प्रशासन

शिर्डीत अपर जिल्हाधिकारी कार्यालयाची शंभर कोटी खर्चून अत्याधुनिक इमारत उभारणार: महसूल राधाकृष्ण विखे-पाटील

Annant PpangarkarBy Annant Ppangarkar15/09/2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

अपर जिल्हाधिकारी कार्यालयाचे लोकार्पण; उत्तरेतील ६ तालुक्यातील नागरिकांची पायपीट थांबणार

महाराष्ट्र संवाद न्यूज

शिर्डी – उत्तर नगरमधील सहा तालुक्यातील नागरिकांच्या प्रशासकीय कामांसाठी शिर्डी येथे अपर जिल्हाधिकारी कार्यालयाचे शुक्रवारी (15 सप्टेंबर) लोकार्पण झाले. शेती महामंडळाच्या जागेवर या कार्यालयाच्या इमारतीसाठी १०० कोटी रूपये मंजूर झाले आहेत. अपर जिल्हाधिकारी कार्यालयाची राज्यातील सर्वात मोठी अत्याधुनिक इमारत या ठिकाणी लवकर उभारण्यात येणार आहे, अशी‌ माहिती राज्याचे महसूल, पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखेपाटील यांनी दिली.

शिर्डी येथे उत्तर नगरमधील नागरिकांच्या शासकीय कामासाठी सुरू करण्यात आलेल्या अपर जिल्हाधिकारी कार्यालयाचे लोकार्पण महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते‌. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदार सदाशिव लोखंडे उपस्थित होते.

याप्रसंगी खासदार डॉ. सुजय विखे पाटील, आमदार आशुतोष काळे, महानंदाचे अध्यक्ष राजेश परजणे, नाशिक विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ, श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी सिवाशंकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, अपर जिल्हाधिकारी सुहास मापारी, शिर्डीचे अपर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर, शिर्डी उपविभागीय अधिकारी माणिक आहेर आदी यावेळी उपस्थित होते.

विखे पाटील म्हणाले, उत्तर अहमदनगर जनतेसाठी शिर्डी अपर जिल्हाधिकारी कार्यालयाची मोठी उपयुक्तता आहे. या कार्यालयामुळे सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांची सोडवणूक, अडचणी दूर होण्यास निश्चितच मदत होणार आहे. महसूल विभागाच्या बऱ्याच सुविधा ऑनलाईन झालेल्या आहेत‌. नवीन तंत्रज्ञानाच्या माध्यमातून कमीत कमी मानवी हस्तक्षेपाशिवाय पारदर्शक व लोकाभिमुख कारभार करण्यावर महसूल विभागाचा भर आहे.

जिल्ह्यात कमी पाऊस झाला आहे. लाखो शेतकऱ्यांनी एक रूपयात पीक विमा काढला आहे. शेत पीक नुकसानीची २५ टक्के अग्रिम देण्याची अधिसूचना प्रसिद्ध झाली आहे. शेतकऱ्यांना नुकसानभरपाई त्यांच्या खात्यावर जमा करण्यासाठी निर्णयाची अंमलबजावणी प्रशासनाने तात्काळ करण्याची गरज आहे.

शिर्डी व परिसराच्या विकासासाठी शेती महामंडळाच्या जागेवर एमआयडीसी, श्री साईबाबांच्या जीवनावर आधारित शंभर कोटी खर्चून थीम पॉर्क, सहाशे कोटी खर्चून शिर्डी विमानतळाची नवीन विस्तारित इमारत असे धोरणात्मक निर्णय घेण्यात आले आहेत. यामुळे शिर्डी व परिसराच्या विकासाबरोबर रोजगारवाढीला चालना मिळणार आहे. असेही त्यांनी सांगितले.

खासदार लोखंडे म्हणाले, अपर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात संपूर्ण नेवासा तालुक्याचांही समावेश करणे गरजेचे आहे. शेती महामंडळाच्या जागेवर आयटी पार्क झाला तर शिर्डीची वाटचाल स्मार्ट सिटीकडे होणार आहे.

आमदार आशुतोष काळे यांनीही यावेळी आपले मत व्यक्त केले. प्रास्ताविक जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ यांनी केले. आभार अपर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर यांनी मानले.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 912
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

५० लाखांची कथित खंडणी अन् प्रशासकीय अनागोंदी: मुख्याधिकारी सक्तीच्या रजेवर, जिल्हाधिकाऱ्यांची कठोर कारवाई; नायब तहसीलदार मोहसीन शेख यांच्याकडे अतिरिक्त पदभार

24/09/2026

अन्न व औषध प्रशासनाची संगमनेरमध्ये कारवाई: २.६० लाखांचे संशयास्पद ‘काऊ घी’ जप्त, तर भेसळप्रकरणी दुग्ध केंद्राचा परवाना निलंबित

22/09/2026

अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; सुमारे चार कोटी रुपयांचे संशयास्पद बटर जप्त

11/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
न्यायालय

संगमनेर एम.डी. ड्रग्ज रॅकेटचे धागेदोर कोणापर्यंत? जिल्हा न्यायालयात नेमकं काय घडलं… आता एक नव्हे तर चार आरोपी

By Annant Ppangarkar28/09/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- संगमनेर शहरातील बहुचर्चित एम.डी. (M.D.) ड्रग्ज तस्करीत दररोज नवनवीन आणि धक्कादायक…

१०० वे पुण्यात, तर १०१ वे साहित्य संमेलन संगमनेरमध्ये, दुर्गाताई तांबे यांची मोठी घोषणा!

28/09/2026

कांदा व्यापाऱ्यावर कोयत्याने वार करणारा फरार आरोपी अखेर दोन वर्षानंतर एलसीबीच्या जाळ्यात

28/09/2026

संगमनेरमधील एका निष्ठावान शिवसैनिकाचा अनुभव व्हायरल; तत्कालीन मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यावरील शाईफेकीने चर्चेत आलेले ठाकरे गटाचे तत्कालीन पदाधिकारी भाऊसाहेब हासे यांनी केलेले वक्तव्य चर्चेत! बाळासाहेब थोरात यांना… ते तर…!

28/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.