Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

स्वामी समर्थ केंद्रात उच्चांकी २७ हजार पारायण संपन्न

July 27, 2026

आज, सोमवार २७ जुलै २०२६ – कसा असेल तुमचा आजचा दिवस जाणून घ्या

July 27, 2026

माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांची मोठी घोषणा: माजी सैनिक समितीसाठी थोरात कारखान्याची ४२ गुंठे जागा; संगमनेरमध्ये उभारणार राज्यातील सर्वात सुंदर स्वातंत्र्य सैनिक स्मारक

July 26, 2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » चिरंतन सनातन!
महाराष्ट्र संवाद विशेष

चिरंतन सनातन!

अनंत पांगारकरBy अनंत पांगारकरSeptember 17, 2023No Comments4 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज

रविवार विशेष लेख

गेल्या काही दिवसांपासून काही राजकारण्यांकडून सनातन धर्मावर अश्लाघ्य टीका होत आहे. तामिळनाडूमधील द्रमुक पक्षाचे क्रीडामंत्री तथा मुख्यमंत्रीपुत्र उदयनिधी स्टॅलिन यांनी ‘सनातन धर्मविरोधी परिषदे’त ‘सनातन धर्म डेंग्यू, मलेरिया यांसारखा असून त्याचे उच्चाटन व्हायला हवे’, असे तारे तोडले. त्यानंतर द्रमुक पक्षाचे तामिळनाडूतील खासदार ए. के. राजा, काँग्रेसचे कर्नाटकातील मंत्री प्रियांक खर्गे, तृणमूल काँग्रेस पक्षाच्या ममता बॅनर्जी, अभिनेते कलम हसन, सिनेअभिनेता प्रकाशराज यांच्यासम महानुभवी मंडळींनी उदयनिधी यांची री ओढली. खरे तर हे ‘हेट स्पीच’ केल्याप्रीत्यर्थ उदयनिधी आणि तत्सम मंडळींना गजाआड करायला हवे होते; पण दुर्दैवाने अद्यापपर्यंत तरी त्यांच्यावर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. अर्थात सनातन धर्मात ‘कर्मसिद्धांत’ आहे. त्यामुळे केलेल्या प्रत्येक कर्माचे फळ हे कधी ना कधीतरी भोगावेच लागणार आहे !

सनातन हे अविनाशी तत्त्व : ‘सना आतनोति इति सनातनः’ अशी सनातन या शब्दाची व्युत्पत्ती आहे. सना म्हणजे शाश्वत आणि आतनोति म्हणजे प्राप्ती करून देते. ‘सनातन’ म्हणजे शाश्वताची प्राप्ती करून देते ते. ‘सनातनो नित्यनूतन:’ म्हणजे जो शाश्वत, अनादि असूनही नित्यनूतन, म्हणजेच कधी जुनापुराणा होत नाही, त्याला ‘सनातन’ म्हणतात. सनातन हे अविनाशी तत्त्व आहे. महाभारताच्या शांतीपर्वात अध्याय 64 मध्ये म्हटले आहे की, अनादी काळी ईश्वराने सृष्टीची उत्पत्ती केली, तेव्हाच धर्माचीही निर्मिती केली. अनादी आणि अनंत अशा धर्माला संपवण्याचा कितीही प्रयत्न केला, तरी सनातन संपू शकत नाही. कारण उत्पत्ती-स्थिती-लय हा नियम धर्माला लागू होऊ शकत नाही. युगानुयुगे सुर आणि असुर संग्राम चालू आहे आणि यात अंतिम विजय सत्याचा अर्थात् सनातन धर्माचा होतो, हा इतिहास आहे. हेच शाश्वत सत्य आहे. त्यामुळे आगामी काळात सनातन धर्माचे उच्चाटन होईल की सनातनविरोधी द्रमुकचे, याचे उत्तर काळच देईल.

हिंदुत्वाचा सूर्य ‘उदय’ होत आहे: स्टॅलिन यांचे वक्तव्य येताच धर्मविद्वेशी पिलावळीने लागोपाठ हिंदु धर्माच्या विरोधात वक्तव्ये केली. काही वर्षांपूर्वी ‘धर्म ही अफूची गोळी आहे’, ‘देवाला रिटायर्ड करा’ अशी वक्तव्ये करण्यात आली होती. ही वक्तव्ये म्हणजे हिंदु धर्माच्या विरोधात चालणार्‍या ‘डिस्मेंटलिंग ग्लोबल हिंदुत्व’ या आंतरराष्ट्रीय षड्यंत्राचा भाग आहे. जी भाषा मोगल आक्रमकांची होती, तीच भाषा आज स्टॅलिन आणि ओवैसी यांची आहे. सनातन हिंदु धर्माला विरोध करण्याचे प्रयत्न मोठ्या प्रमाणावर होत असले, तरी आज कोरोनानंतर जगभरात हिंदु धर्माविषयी आकर्षण वाढत आहे. सनातन जीवनशैली अंगिकारणार्‍यांचेही प्रमाण वाढत आहे. ज्याप्रमाणे सूर्योदयाची वेळ हळूहळू जवळ येते, तसतसे वातावरणातील अंधकार कमी होतो, तसे हे आहे. उदयनिधी व ए. राजा यांनी कितीही थयथयाट केला, तरी आज जागतिक स्तरावर हिंदुत्वाचे ‘डिसमेंटलिंग’ नाही, तर हिंदुत्वाचा सूर्य ‘उदय’ होत आहे, हे वास्तव आहे.

नुकतीच भारतात ‘जी-20’ परिषदेची शिखर बैठक झाली. त्या वेळी भारतात आलेले ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी सपत्नीक अक्षरधाम मंदिराला भेट दिली. ‘मी हिंदु आणि भारतीय वंशाचा असल्याचा मला अभिमान आहे’, असे जाहीर वक्तव्य त्यांनी केले. या परिषदेला आमंत्रित अनेक विदेशी महिलांनी साडी हा पारंपारिक हिंदु पोशाख परिधान केला होता. अमेरिकेच्या आगामी राष्ट्रध्यक्षापदाच्या निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार असलेले भारतीय वंशाचे रामास्वामी यांनीही हिंदु धर्माविषयी आस्था प्रगट केली आहे. हिंदु धर्ममूल्यांप्रमाणे ते त्यांचे दैनंदिन आचरण करत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

याच महिन्यात अमेरिकेतील लुईसव्हिले या शहराच्या महापौरांनी 3 सप्टेंबर हा दिवस ‘सनातन धर्म दिवस’ म्हणून घोषित केला. विदेशातील लोक हिंदु धर्माचे अनुसरण करत आहेत, तसे भारतातील आस्तिकताही वाढत आहे. वर्ष 2019-20 मध्ये भारतात केलेल्या संशोधनावर आधारित ‘प्यु रिसर्च सेंटर’चा जो अहवाल प्रसिद्ध झाला आहे, त्यामध्ये असे आढळून आले आहे की, ‘80 टक्के हिंदू देवावर विश्वास ठेवतात. 55 टक्के हिंदु घरात नियमित पूजा करतात.’ योग, आयुर्वेद, संस्कृत भाषा यांविषयीही जगभरात आकर्षण वाढत आहे.

तामिळनाडूतील मंदिरे सरकारमुक्त करा!

उदयनिधी स्वतःला ख्रिस्ती म्हणवतात आणि सनातन धर्माला नावे ठेवतात. कदाचित हिंदु धर्माचा प्रभाव सर्वत्र वाढत असल्यानेच उदयनिधी यांची अस्वस्थता वाढत असेल. सनातन धर्म समाजाचा प्रतिनिधी म्हणून उदयनिधिना एकच सांगावेसे वाटते. उदयनिनिधींना म्हणजेच तामिळनाडूमध्ये सत्ताधारी असलेल्या पक्षाला सनातन धर्म मान्य नसल्याने आता त्यांनी तेथील सनातन धर्माची आधारशीला असणार्‍या मंदिरांवरील हक्कही सोडायला हवा. त्यांनी तामिळनाडूमधील सर्व मंदिरे सरकारीकरणातून मुक्त करण्याची घोषणा केली पाहिजे.

‘हेट स्पीच’वर कारवाई कोण करणार ? : आमच्या देशामध्ये दुर्दैवाने सनातन धर्माला नावे ठेवा की ‘सनातन धर्मियांचे उच्चाटन करा’ की सनातन धर्माच्या उच्चाटनासाठी ‘सर तन से जुदा’च्या खुलेआम घोषणा द्या, कोणावरही ‘हेट स्पीच’च्या संदर्भात पोलीस कारवाई होत नाही किंवा न्यायालयाच्या सर्वोच्च संस्था सुओमोटो कारवाई करण्याचे धाडस दाखवत नाहीत. ‘सेक्युलॅरिझम’चा उपदेश देणार्‍या उदारतावाद्यांना एक प्रश्न आहे की, हिंदु धर्माविरोधात विखारी वक्तव्य करणार्‍यांमुळे भारतातील ‘सेक्युलॅरिझम’ धोक्यात कसा येत नाही ? ‘We the people’ … म्हणजे ‘आम्ही नागरिक’ भारतीय संविधानाचे मूळ प्राधान्य असताना अर्थात् बहुसंख्य हिंदू समाज हा सनातनी असतांना, भारताचे संविधान धोक्यात कसे नाही ? खरे तर उदयनिधी यांचे वक्तव्य म्हणजे एकप्रकारे सनातन धर्मीय हिंदूंचा वंशविच्छेद करण्यासाठी भडकवणारे वक्तव्य आहे; पण उदयनिधीच्या या ‘हेट स्पीच’वर कारवाई कोण करणार, हाच प्रश्न सनातनी समाजाच्या मनात आवासून उभा आहे. राहिला प्रश्न सनातन धर्म उच्चाटनाचा, तर सनातन धर्म चिरंतन आहे, अविनाशी आहे. ‘कावळ्याच्या शापाने गाय मरत नाहीत’, तसे कोणाच्याही विद्वेषाने सनातन धर्म संपणार नाही, ही आमची धर्मश्रद्धा आहे !

anantpangarkar
अनंत पांगारकर

Post Views: 579
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
अनंत पांगारकर
  • Website

Related Posts

संगमनेर शहर पोलिस स्टेशनमध्ये उद्या तक्रार निवारण दिनाचे आयोजन

July 24, 2026

केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी; संगमनेरमध्ये प्रांताधिकाऱ्यांना निवेदन

July 21, 2026

जंतरमंतरवर हायव्होल्टेज ड्रामा: सोनम वांगचुक रुग्णालयात दाखल; अभिजीत दिपके पोलिसांच्या ताब्यात… रात्री काय घडलं!

July 18, 2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
धार्मिक

स्वामी समर्थ केंद्रात उच्चांकी २७ हजार पारायण संपन्न

By अनंत पांगारकरJuly 27, 20260

अहिल्यानगर | प्रतिनिधी: येथील बोल्हेगाव फाटा परिसरातील स्वामी समर्थ केंद्रात ( दिंडोरी प्रणित) रविवारी (…

आज, सोमवार २७ जुलै २०२६ – कसा असेल तुमचा आजचा दिवस जाणून घ्या

July 27, 2026

माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांची मोठी घोषणा: माजी सैनिक समितीसाठी थोरात कारखान्याची ४२ गुंठे जागा; संगमनेरमध्ये उभारणार राज्यातील सर्वात सुंदर स्वातंत्र्य सैनिक स्मारक

July 26, 2026

रविवार विशेष लेख — हट्टी मोदींचे गर्वहरण!

July 26, 2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.