Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

अकोले तालुक्यात भीषण स्फोट; मासेमारीसाठी नेण्यात येणाऱ्या स्फोटकांचा दुचाकीवरच स्फोट, एक जण गंभीर जखमी

June 10, 2026

अध्यात्म सांगणे सोपे, पण जगणे कठीण : नंदकुमार पोवार

June 10, 2026

धार्मिक कार्यानंतर नदीत पोहण्यासाठी गेलेल्या दोघांचा बुडून मृत्यू

June 10, 2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » सरकारमान्य भिशीच्या पैशापोटी दिलेला धनादेश बाउन्स झाल्याने न्यायालयाने ताहीर बागवानला दंडासह दिली अशी शिक्षा…
न्यायालय

सरकारमान्य भिशीच्या पैशापोटी दिलेला धनादेश बाउन्स झाल्याने न्यायालयाने ताहीर बागवानला दंडासह दिली अशी शिक्षा…

संगमनेर न्यायालयाचा निकाल
अनंत पांगारकरBy अनंत पांगारकरSeptember 18, 2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज

संगमनेर – नाशिक चिट्स प्रायव्हेट लिमिटेड या सरकारमान्य भिशी कंपनीच्या थकलेल्या हप्त्यापोटी दिलेला धनादेश न वटल्याने संगमनेरच्या अतिरिक्त मुख्य न्याय दंडाधिकाऱ्यांनी आरोपी व्यावसायिकाला दोषी ठरवत सहा महिन्याच्या कारावासाची व सत्तर हजार रुपये दंड तसेच दंडाची रक्कम न भरल्यास तीन महिने साध्या कारावासाची शिक्षा ठोठावली आहे.

ताहीर कादर बागवान असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव असून बागवान याने नाशिक चिट्स या कंपनीची 50 महिन्यांसाठी दरमहा दहा हजार रुपयांची मासिक भिशी सुरू केली होती. बागवान सक्सेसिव्ह बिडर ठरल्यानंतर त्याला प्राईज मनी म्हणून कंपनीने 3 लाख 47 हजार 500 रुपयांचा धनादेश दिला होता. त्याबद्दल बागवान आणि कंपनीच्या लाभात प्रॉमिसरी नोट्स गॅरेंटी करारनामा व इतर कागदपत्रे लिहून दिले होते.

धनादेश बाउन्स: आरोपी बागवान याने उचललेल्या या पैशासाठी मासिक हप्ते भरणे आवश्यक होते. परंतु भिशीची रक्कम उचलल्यानंतर आरोपीने दरमहा हप्ते भरण्यास टाळाटाळ केली. सात हप्त्यांची 61,500 रुपयांची रक्कम थकल्याने या थकित रकमेपोटी कंपनीला धनादेश दिला होता. फिर्यादी कंपनीने धनादेश न वटल्याने आरोपी बागवान याच्याकडे पैशांची मागणी केली होती. मात्र आरोपीने कंपनीला पैसे दिले नाही म्हणून कंपनीच्या वतीने आरोपी विरोधात संगमनेरच्या जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयात भारतीय चलनक्षम दस्तऐवज कायदा 138 अन्वये तक्रार करण्यात आली होती.

यांच्यासमोर झाले सुनावणी: न्यायाधीश डी. एम. गिरी यांच्यासमोर या खटल्याचे कामकाज सुरू होते. नाशिक चिट्स प्रायव्हेट लिमिटेड या फिर्यादी कंपनीच्यावतीने ॲड. प्रशांत कोल्हे यांनी काम बघितले. कंपनीचे प्रतिनिधी पापा करीम बेग यांनी त्यांना मदत केली. न्यायालयासमोर आरोपीने वादातीत धनादेश कायदेशीर देण्यापूर्वी दिल्याचे सिद्ध झाल्याने न्यायालयाने आरोपी ताहीर करीम बागवान याला दोषी ठरवले.

दोषी: आरोपी बागवान याला न्यायालयाने भारतीय चलनक्षम दस्तऐवज कायदा 138 अन्वये फौजदारी प्रक्रिया संहितेचे कलम 255 (2) अन्वये दोषी ठरवत सहा महिन्याच्या कारावासाची व सत्तर हजार रुपये दंड तसेच दंडाची रक्कम न भरल्यास तीन महिने साध्या कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. दंडाच्या रकमेतून कंपनीच्या धनादेशाची रक्कम कंपनीला परत करावयाची आहे.

anantpangarkar
अनंत पांगारकर

Post Views: 1,630
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
अनंत पांगारकर
  • Website

Related Posts

संगमनेर येथील जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल: पोक्सो प्रकरणातील आरोपीची निर्दोष मुक्तता

June 6, 2026

राजेंद्र गडगे याला न्यायालयाचा दिलासा; गंभीर गुन्ह्यांत मिळाला नियमित जामीन

May 29, 2026

नसरापूर हत्याकांड: ६५ वर्षीय नराधमाभोवती कायद्याचा फास आवळला; कोर्टात रोज …

May 28, 2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
महाराष्ट्र संवाद विशेष

अकोले तालुक्यात भीषण स्फोट; मासेमारीसाठी नेण्यात येणाऱ्या स्फोटकांचा दुचाकीवरच स्फोट, एक जण गंभीर जखमी

By अनंत पांगारकरJune 10, 20260

अकोले: अकोले तालुक्यातील औरंगपूर फाटा येथे आज दुपारी एक अत्यंत धक्कादायक आणि भीषण स्फोट झाल्याची…

अध्यात्म सांगणे सोपे, पण जगणे कठीण : नंदकुमार पोवार

June 10, 2026

धार्मिक कार्यानंतर नदीत पोहण्यासाठी गेलेल्या दोघांचा बुडून मृत्यू

June 10, 2026

आज बुधवार, १० जून २०२६ – कसा असेल तुमचा आजचा दिवस जाणून घ्या

June 10, 2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.