Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

विशेष वृत्त राजकीय दबावातून पोलिसांची संगमनेरच्या सुरक्षेकडे पाठ; २०० कॅमेऱ्यांच्या लोकार्पण सोहळ्यावर बहिष्कारातून नागरिकांमध्ये संताप… नगरपालिकेची सुरक्षेसाठी धडपड, तर पोलीस प्रशासनाची उघड-उघड उदासीनता

08/09/2026

शिंदेवाडी जिल्हा परिषद शाळेत ‘एक विद्यार्थी, एक बेंच’ उपक्रमाला अभूतपूर्व प्रतिसाद; आठवडाभरात ६८ हजारांच्या लोकसहभागातून ४० बेंचचे लोकार्पण

08/09/2026

धांदरफळ येथे महावितरण कर्मचाऱ्याला मारहाण; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

08/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » प्रांताधिकारी, तहसीलदारांना दुष्काळाचे गांभीर्य नाही; माजी मंत्री, आमदार बाळासाहेब थोरातांच्या आढावा बैठकीला मारली दांडी…
राजकारण

प्रांताधिकारी, तहसीलदारांना दुष्काळाचे गांभीर्य नाही; माजी मंत्री, आमदार बाळासाहेब थोरातांच्या आढावा बैठकीला मारली दांडी…

संगमनेरात प्रथमत:च घडले असं काही
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar18/09/2023Updated:18/09/2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

सामान्यांचे सरकार भारीच… अधिकारी लोकप्रतिनिधीच नव्हे तर कोणालाही जुमानेना!

प्रांताधिकारी, तहसीलदार आढावा बैठक सोडून पालकमंत्र्यांच्या बैठकीला…

महाराष्ट्र संवाद न्यूज @ अनंत पांगारकर

संगमनेर – राज्याचे माजी महसूल मंत्री विद्यमान आमदार बाळासाहेब थोरात यांनी सोमवारी बोलाविलेल्या टंचाई आढावा बैठकीला प्रांताधिकारी, तहसीलदार या दोघा शासनाच्या प्रमुख प्रतिनिधींनीच दांडी मारण्याचा प्रकार समोर आला. टंचाई आढावा बैठक सोडून हे दोन्ही अधिकारी पालकमंत्र्यांच्या बैठकीत व्यस्त असल्याने संगमनेरमधील दुष्काळाचे या अधिकाऱ्यांना गांभीर्य नसल्याचे दिसून आले. यामुळे थोरात देखील संतप्त झाल्याने त्यांनी याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली.

डझनभर टँकर सुरू: संगमनेर तालुक्यात दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली असून पठार भागामध्ये डझनभर टॅंकरने दुष्काळी जनतेला पाणीपुरवठा सुरू आहे. पावसाने सर्वत्र पाठ फिरवल्याने तालुक्यातच नव्हे तर राज्यात दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली असताना तालुक्याचे प्रमुख म्हणून काम करणाऱ्या प्रांताधिकारी तहसीलदारांनी या दुष्काळी परिस्थितीकडे गांभीर्याने बघण्याची आवश्यकता असताना आमदारांनी बोलाविलेल्या यशवंतराव चव्हाण प्रशासकीय इमारतीतील बैठकीला या अधिकाऱ्यांनी राज्यातील मातब्बर मंत्र्याच्या आशीर्वादाने दांडी मारली असल्याचे दिसून आले.

दुपारी शहरात सायंकाळी शहराबाहेर: संगमनेरचे प्रांताधिकारी शैलेंद्र हिंगे, तहसीलदार धीरज मांजरे प्रशासनाचे प्रमुख म्हणून संगमनेरमध्ये काम पाहत आहेत. दुपारपर्यंत संगमनेरमध्येच असलेल्या या दोन्ही अधिकाऱ्यांनी सायंकाळी मात्र आमदार थोरात यांनी बोलाविलेल्या टंचाई आढावा बैठकीला दांडी मारल्याने पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अनिल नागणे यांनी टंचाई परिस्थिती संदर्भात माहिती दिली.

प्रशासनाने जनतेसाठी काम कराव: दरम्यान हे दोन्ही अधिकारी बैठकीला उपस्थित नसल्याने माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी यासंदर्भात तीव्र नाराजी व्यक्त केली. थोरात म्हणाले, चार दिवसांपूर्वी या बैठकीचे नियोजन करण्यात आले आहे. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर टंचाई आढावा बैठक अत्यंत महत्त्वाची असून वर्षातून एखाद-दोन वेळेसच टंचाई आढावा बैठक होत असते. या महत्त्वाच्या बैठकीकरता प्रांताधिकारी व तहसीलदार ही अनुपस्थित राहतात हे योग्य नाही, असे वागणे बरोबर नाही. या काळात जनतेच्या मदतीसाठी प्रशासनाने काम करावे याबाबत आपण काळजी घेतली. मी देखील अनेक वर्ष महसूल, कृषी खात्यासारखे महत्त्वाचे विभाग सांभाळले आहे. मात्र अधिकाऱ्यांना त्यांच्या बैठकांसाठी स्वातंत्र्य दिले.

हे वागणं बरं नव्हं: संगमनेरमध्ये टंचाई परिस्थितीवर महत्त्वाची बैठक असताना प्रांताधिकारी तहसीलदारांना पालकमंत्र्यांना याबाबत सांगता आले नाही का? तालुक्याचे संपूर्ण प्रशासन, लोकप्रतिनिधी टंचाई आढावा बैठकीला उपस्थित असताना हे दोन्ही अधिकारी पालकमंत्र्यांच्या बैठकीसाठी निघून गेले, अधिकाऱ्यांचे हे वागणे बरे नाही. या बैठकीबद्दल महसूलमंत्र्यांना कल्पना दिली असती तरी ते याच असे म्हणाले असते असे मला वाटत नाही. हे मंत्र्यांना सांगितले तरी हरकत नाही. पालकमंत्री पालक असतात ते त्रास द्यायला नसतात असे देखील थोरात म्हणाले.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 733
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

विशेष वृत्त राजकीय दबावातून पोलिसांची संगमनेरच्या सुरक्षेकडे पाठ; २०० कॅमेऱ्यांच्या लोकार्पण सोहळ्यावर बहिष्कारातून नागरिकांमध्ये संताप… नगरपालिकेची सुरक्षेसाठी धडपड, तर पोलीस प्रशासनाची उघड-उघड उदासीनता

08/09/2026

कौठे मलकापूरच्या औद्योगिक प्रकल्पावरून जनतेची दिशाभूल? ‘MIDC’ की केवळ औद्योगिक वसाहत; सत्तेतील दोन्ही आमदारांनी भूमिका स्पष्ट करावी : अमोल शेलकर

08/09/2026

अधिकृत आदेश नसताना भारनियमन कोणाच्या दबावाखाली? महावितरणच्या कारभारावर काँग्रेस कार्याध्यक्ष अमोल शेलकरांचा हल्लाबोल

05/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राजकारण

विशेष वृत्त राजकीय दबावातून पोलिसांची संगमनेरच्या सुरक्षेकडे पाठ; २०० कॅमेऱ्यांच्या लोकार्पण सोहळ्यावर बहिष्कारातून नागरिकांमध्ये संताप… नगरपालिकेची सुरक्षेसाठी धडपड, तर पोलीस प्रशासनाची उघड-उघड उदासीनता

By Annant Ppangarkar08/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – शहरातील महिलांची सुरक्षा आणि कायदा-सुव्यवस्थेच्या दृष्टीने संगमनेर नगर…

शिंदेवाडी जिल्हा परिषद शाळेत ‘एक विद्यार्थी, एक बेंच’ उपक्रमाला अभूतपूर्व प्रतिसाद; आठवडाभरात ६८ हजारांच्या लोकसहभागातून ४० बेंचचे लोकार्पण

08/09/2026

धांदरफळ येथे महावितरण कर्मचाऱ्याला मारहाण; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

08/09/2026

कोपरगाव आणि संगमनेरमधील चैन स्नॅचिंगचे गुन्हे उघडकीस; दोन सराईत चोरट्यांकडून ५ लाखांचा मुद्देमाल हस्तगत, अहिल्यानगर एलसीबीची कामगिरी

08/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.