Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयातील ढिसाळ कारभारावर शिवसेना शहरप्रमुख विनोद सूर्यवंशी आक्रमक; आंदोलनाचा इशारा

July 19, 2026

अतिक्रमणाच्या नावाखाली संगमनेरात गरिबांवर बुलडोझर, धनदांडग्यांवर मेहेरनजर; ‘सिंघम’ बनलेल्या प्रशासनाविरोधात नागरिकांचा संतप्त सवाल

July 19, 2026

रविवार विशेष लेख — सोनमजी, तुम्ही देशाला हवे आहात!

July 19, 2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » दुष्काळ निवारणाच्या कामात राजकारण आणि हलगर्जीपणा नको; माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरातांच्या प्रशासनाला सूचना
राजकारण

दुष्काळ निवारणाच्या कामात राजकारण आणि हलगर्जीपणा नको; माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरातांच्या प्रशासनाला सूचना

संगमनेरमध्ये घेतली टंचाई आढावा बैठक
अनंत पांगारकरBy अनंत पांगारकरSeptember 19, 2023Updated:September 19, 2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज

संगमनेर – दुष्काळात नागरिकांना पिण्याचे पाणी रोजगार हमीचे कामे आणि जनावरांना सारा उपलब्ध करून देणे हे सरकारचे काम आहे त्यांनी ते केलेच पाहिजे, दुष्काळाच्या संकटात जनतेच्या मदतीला प्राधान्य द्या, असे स्पष्ट करत दुष्काळ निवारणाच्या कामात हलगर्जीपणा आणि राजकारण नको, अशा स्पष्ट सूचना माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी प्रशासनातील अधिकाऱ्यांना दिल्या.

उपस्थिती: आमदार थोरात यांच्या उपस्थितीत यशवंतराव चव्हाण प्रशासकीय भवनामध्ये सोमवारी टंचाई आढावा बैठक पार पडली. यावेळी थोरात बोलत होते. गटविकास अधिकारी अनिल नागणे, कृषी अधिकारी प्रवीण गोसावी, नायब तहसीलदार उमाकांत कडनोर यांच्यासह प्रशासनातील अधिकारी, ग्रामसेवक, तलाठी, कृषी सहाय्यक, शंकरराव खेमनर, इंद्रजीत थोरात, मिलिंद कानवडे, रामहरी कातोरे, मिरा शेटे, अजय फटांगरे, अशोक सातपुते, अविनाश सोनवणे आदी उपस्थित होते.

थोरात म्हणाले, यावर्षी राज्यात विविध ठिकाणी अत्यंत कमी पाऊस झाला आहे. तसेच संगमनेर तालुक्यात अवघा 39 टक्के पाऊस झाल्याने येणारे वर्ष मोठ्या संकटाचे आणि दुष्काळाचे असून मागणी येताच गावांना टँकरने पिण्याचे पाणी पुरविणे, रोजगार हमीची कामे उपलब्ध करून देणे, जनावरांसाठी चारा उपलब्ध करणे या कामात कोणतेही राजकारण आणि हलगर्जीपणा करू नका. दुष्काळी संकटात जनतेच्या सेवेला प्राधान्य द्या.

सरकारचे काम: पिण्याच्या पाण्याच्या टँकरचा प्रस्ताव आल्यानंतर तातडीने टँकर द्या. ज्या गावांमध्ये दहा मजूर असतील तेथे रोजगार हमीची कामे सुरू करा. तालुक्यात मोठ्या प्रमाणात पशुधन असल्याने पशुधनासाठी चारा उपलब्ध होण्यासाठी सरकारने पुढाकार घेतला पाहिजे. दुष्काळात जनतेच्या पाठीशी उभे राहणे हे सरकारचे काम आहे.

गांभीर्य नाही: आपल्या काळात सुरू केलेल्या ई पीक पाहणीचा प्रोजेक्ट हा राज्यासाठी व देशासाठी दिशादर्शक आहे, मात्र सध्याच्या सरकारला त्याचे गांभीर्य नाही. आपण तालुक्यातील विविध गावांच्या पाणीपुरवठा योजनेसाठी जलजीवनमधून ८०० कोटींचा निधी मिळवला. या योजना सुरळीतपणे चालवणे त्या-त्या गावांची जबाबदारी आहे. विजेच्याबाबत तालुक्यातील अनेक नागरिकांच्या मोठ्या तक्रारी असून थकीत बिलावर आकारले जाणारे 18% व्याज सावकारी दराच्या पुढे आहे. हा प्रकार अत्यंत चुकीचा आहे.

पिक विमा: दुष्काळ निवारण कामांमध्ये गाव पातळीवरील ग्रामसेवक, तलाठी, कृषी सहाय्यक यांच्यासह सर्व अधिकाऱ्यांनी अत्यंत जबाबदारीने मदतीची भूमिका घ्यावी. याचबरोबर तालुक्यातील पाण्याचे नियोजन करताना एप्रिल मे महिन्याचे संकट डोळ्यासमोर ठेवून प्रशासनाने काम करावे. तालुक्यात खरीप पिके पूर्णपणे वाया गेली आहे. त्यामुळे पिकविमा योजनेमधून तातडीने सर्व शेतकऱ्यांना मोठी मदत मिळावी, अशी मागणी ही सरकारकडे केली आहे.

anantpangarkar
अनंत पांगारकर

Post Views: 428
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
अनंत पांगारकर
  • Website

Related Posts

राम मंदिरातील लूटमारीनंतर भाजपच्या राज्यात शैक्षणिक घोटाळा… नसलेल्या महाविद्यालयातून हजारो विद्यार्थ्यांना पदव्या

July 14, 2026

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या संगमनेर पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर; अमर कतारी यांच्याकडे तालुकाप्रमुखपदाची धुरा, नव्या पदाधिकाऱ्यांमध्ये यांचा समावेश

July 14, 2026

‘दुर्गाताई, आता आत्मपरीक्षणाची गरज; लाभार्थ्यांना बाजूला करा!, ताईंवर चिखलफेक होत असताना काँग्रेसचे २८ नगरसेवक गप्प का? – शिवसेनेचे अमर कतारी यांचा महाविकास आघाडीला घरचा आहेर

July 11, 2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
आरोग्य

घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयातील ढिसाळ कारभारावर शिवसेना शहरप्रमुख विनोद सूर्यवंशी आक्रमक; आंदोलनाचा इशारा

By अनंत पांगारकरJuly 19, 20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन  संगमनेर: घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयातील बेफिकीर आणि ढिसाळ कारभाराचा प्रत्यक्ष अनुभव आल्यानंतर…

अतिक्रमणाच्या नावाखाली संगमनेरात गरिबांवर बुलडोझर, धनदांडग्यांवर मेहेरनजर; ‘सिंघम’ बनलेल्या प्रशासनाविरोधात नागरिकांचा संतप्त सवाल

July 19, 2026

रविवार विशेष लेख — सोनमजी, तुम्ही देशाला हवे आहात!

July 19, 2026

आज, रविवार १९ जुलै २०२६ – कसा असेल तुमचा आजचा दिवस जाणून घ्या

July 19, 2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.