Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

अंगारकी चतुर्थीनिमित्त श्री वरदविनायकाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी, आमदार डॉ. किरण लहामटे यांच्यासह हजारो भाविकांनी घेतले दर्शन; खिचडी महाप्रसाद व सामुदायिक अथर्वशीर्ष पठणाने कोतूळ नगरी भक्तिमय

30/09/2026

संगमनेरकरांची सुरक्षा होणार अधिक भक्कम; नगरपरिषदेसाठी २ नवीन अग्निशामक वाहनांना प्रशासकीय मान्यता, आमदार अमोल खताळ यांच्या प्रयत्नांना यश! साक्षी सूर्यवंशी यांची माहिती

30/09/2026

महात्मा गांधी जयंतीनिमित्त संगमनेरमध्ये जयहिंदच्या वतीने विविध उपक्रम; १५७ विद्यार्थ्यांची प्रभात फेरी अन् ‘जवाहरलाल हाजीर हो’ पुस्तकाचे प्रकाशन

30/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » साखर कारखान्याला दिलेला धनादेश वटला नाही; ठेकेदाराला एक वर्षाचा कारावास आणि तीन लाख दहा हजाराचा दंड
न्यायालय

साखर कारखान्याला दिलेला धनादेश वटला नाही; ठेकेदाराला एक वर्षाचा कारावास आणि तीन लाख दहा हजाराचा दंड

Annant PpangarkarBy Annant Ppangarkar19/09/2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज

संगमनेर – ऊस तोडणी करून कारखान्याच्या कार्यस्थळावर ऊस पोहोचविण्याचा ठेका घेतलेल्या ठेकेदाराने करारनाम्यानुसार काम केले नाही. त्यामुळे अनामत म्हणून घेतलेल्या रकमेचा धनादेश त्याने कारखान्यात दिला होता हा धनादेश न वाटल्याने संगमनेरच्या न्यायालयाने ठेकेदाराला एक वर्षाच्या कारावासाची शिक्षा ठोठावली आहे.

शिक्षा: शांताराम दामू गवांदे असे शिक्षा झालेल्या ठेकेदार आरोपीचे नाव असून गवांदे याला एक वर्षाच्या साध्या कारावासाची शिक्षा, तीन लाख दहा हजार रुपये दंड व दंड न भरल्यास चार महिन्याच्या साध्या कारावासाची शिक्षा अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी डी. एम. गिरी यांनी ठोठावली आहे.

काय होती घटना: आरोपी शांताराम दामू गवांदे या ठेकेदाराने संगमनेर तालुक्यातील कौठे मलकापूर येथील श्री. गजानन महाराज शुगर लिमिटेड (पुर्वीचे नांव युटेक शुगर लिमिटेड) या साखर कारखान्याच्या सन २०१७-२०१८ च्या गळीत हंगामासाठी ऊस तोडणी व त्याची कारखाना कार्यस्थळापर्यंत वाहतूक करण्याचा ठेका घेतला होता. तसा करार हे त्याने कारखान्याच्या लाभात लिहून दिला होता. त्या पोटी त्याने कारखान्याकडून अनामत म्हणून तीन लाख रुपये घेतले.

चेक बाउन्स: मात्र अनामत रक्कम घेऊनही ठेकेदार कामावर हजर झाला नाही. त्यामुळे कारखान्याने ठेकेदार शांताराम दामू गवांदे यांच्याकडे अनामत रकमेची मागणी केली असता गवांदे याने कारखान्याला त्याच्या खात्याचा तीन लाख रुपयांचा धनादेश दिला होता. मात्र बँकेत हा धनादेश वटला नाही त्यामुळे कारखान्याला रक्कम मिळू शकली नाही.

या न्यायालयात सुनावणी: कारखान्याने शांताराम गवांदे यांच्या विरोधात संगमनेरच्या न्यायालयात निगोशिएबल इन्स्ट्रुमेंटस ॲक्ट कलम १३८ प्रमाणे फिर्याद दाखल केली होती. न्यायाधीश डी. एम. गिरी यांच्यासमोर या खटल्याची सुनावणी झाली.

गुन्हा सिद्ध: न्यायालयात आरोपी ठेकेदार शांताराम गवांदे यांच्या विरोधात गुन्हा सिद्ध झाला. त्यामुळे न्यायालयाने गवांदे आला १२ महिने साधी कैद तसेच रु. ३,१०,०००/- दंड इतकी शिक्षा ठोठावली. तसेच दंड न भरल्यास ४ महिने साध्या कारावासाची शिक्षा सुनावली.

कारखान्याच्यावतीने यांनी बघितले काम: तसेच दंड रकमेतून फिर्यादी यांना चेकची रक्कम रु. ३ लाख नुकसान भरपाई देण्यासंबंधी आदेश पारीत केला. कारखान्याच्यावतीने खटल्याचे कामकाज ॲड. श्रीकांत एच. गोंगे यांनी पाहिले.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 972
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेर एम.डी. ड्रग्ज रॅकेटचे धागेदोर कोणापर्यंत? जिल्हा न्यायालयात नेमकं काय घडलं… आता एक नव्हे तर चार आरोपी

28/09/2026

चेक अनादर प्रकरणात संगमनेर न्यायालयाने आरोपीस ठोठावला एक वर्षाचा कारावास; दोन लाखांची नुकसान भरपाई व ९ टक्के व्याजासह रक्कम देण्याचा निर्णय

23/09/2026

फायनान्सचा चेक बाऊन्स: अकोले तालुक्यातील कर्जदाराला ६ महिने कारावास आणि दुप्पट दंडाची शिक्षा

04/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
धार्मिक

अंगारकी चतुर्थीनिमित्त श्री वरदविनायकाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी, आमदार डॉ. किरण लहामटे यांच्यासह हजारो भाविकांनी घेतले दर्शन; खिचडी महाप्रसाद व सामुदायिक अथर्वशीर्ष पठणाने कोतूळ नगरी भक्तिमय

By Annant Ppangarkar30/09/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- अंगारकी चतुर्थीनिमित्त मंगळवारी, दि. २९ सप्टेंबर २०२६ रोजी अकोले तालुक्यातील कोतूळ…

संगमनेरकरांची सुरक्षा होणार अधिक भक्कम; नगरपरिषदेसाठी २ नवीन अग्निशामक वाहनांना प्रशासकीय मान्यता, आमदार अमोल खताळ यांच्या प्रयत्नांना यश! साक्षी सूर्यवंशी यांची माहिती

30/09/2026

महात्मा गांधी जयंतीनिमित्त संगमनेरमध्ये जयहिंदच्या वतीने विविध उपक्रम; १५७ विद्यार्थ्यांची प्रभात फेरी अन् ‘जवाहरलाल हाजीर हो’ पुस्तकाचे प्रकाशन

30/09/2026

पराभूत होऊनही लोकनेते बाळासाहेब थोरातांचे राजकीय वलय संपत का नाही? वाचा काँग्रेसच्या पदाधिकाऱ्याने केलेले विश्लेषण…

30/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.