Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

विधान परिषद निवडणूक बिनविरोध करण्यासाठी भाजपाकडून कोट्यवधींच्या ऑफर्स; काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा घणाघाती आरोप

June 4, 2026

विधान परिषद निवडणूक : १७ पैकी ५ जागांवर उमेदवार बिनविरोध, वाचा कोणाचा आहे समावेश

June 4, 2026

‘लग्न आणि धर्म परिवर्तना’साठी दबाव; पीडित महिला अधिकाऱ्याचा राजीनामा, ‘कॉर्पोरेट जिहाद’चा आरोप

June 4, 2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » भंगारची दुकान, गोडाऊनची झाडाझडती! पोलिसांना आढळल्या संशयास्पद वस्तू… समाधानकारक खुलासा न आल्यास पोलीस…
गुन्हेगारी

भंगारची दुकान, गोडाऊनची झाडाझडती! पोलिसांना आढळल्या संशयास्पद वस्तू… समाधानकारक खुलासा न आल्यास पोलीस…

चोऱ्यांच्या पार्श्वभूमीवर तपासणी
अनंत पांगारकरBy अनंत पांगारकरSeptember 23, 2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज

संगमनेर – संगमनेर अकोले तालुक्यात मोठ्या प्रमाणात सुरू असलेल्या दुचाकी, शेती औजारांच्या चोऱ्यांच्या पार्श्वभूमीवर संगमनेर पोलिसांनी शुक्रवारी एकाच वेळी चौदा भंगार दुकान, गोडाऊनची एकाच वेळी झाडाझडती घेतली. या तपासणीत पोलिसांना काही संशयास्पद वस्तू आढळून आल्या.

तक्रारी: संगमनेर पोलीस उपविभागातील संगमनेर शहर, संगमनेर तालुका, घारगाव, आश्वी, राजुर आणि अकोले पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये मोटर सायकल चोरी, शेतकऱ्यांची शेती औजारे, शेती पंप, केबल, बॅटरी चोरीचे गुन्हे सातत्याने वाढत असून त्यासंदर्भात मोठ्या प्रमाणात तक्रारी वाढत आहे.

14 छापे: गेल्या काही महिन्यांमध्ये शेतकऱ्याचे स्प्रिंकलर पाईप, ठिबक सिंचन पाईप तसेच सबमर्सिबल पंप चोरी झाल्याबाबतचे काही गुन्हे देखील विविध पोलीस स्टेशनला दाखल आहे. चोरट्यांकडून चोरी केलेले साहित्य संगमनेर शहर व परिसरातील विविध भंगार दुकानांमध्ये अत्यल्प किमतीत विकत घेतले जात असल्याची माहिती मिळाली होती. या पार्श्वभूमीवर एकाच वेळी चौदा ठिकाणी छापे टाकण्यात आले.

तपासणी: या छाप्यासाठी पोलिसांच्या चौदा टीम करण्यात आल्या होत्या. एकाचवेळी टाकलेल्या या छाप्यात संशयास्पद दुचाकी, चार चाकी गाड्या, वाहनाचे इंजिन, चेसीस आदी पार्ट तसेच विविध शेती औजारे, सबमर्सिबल पंप, पाईप, लोखंड, सेंट्रिंग कामाची स्टील आदी वस्तू आढळून येतात का याची तपासणी पोलीस निरीक्षक भगवान मथुरे, उपनिरीक्षक निवांत जाधव, विठ्ठल पवार आदींसह शहर व तालुका पोलिसांकडून करण्यात आली.

लेखी विचारणा: तपासणी करण्यात आलेल्या भंगार गोडाऊन दुकानांमध्ये मिळून आलेल्या संशयास्पद वस्तूंचे सविस्तर पंचनामे करण्यात आले आहेत. तेथे मिळून आलेल्या वस्तूंबाबत संबंधित भंगार दुकानचे चालक-मालक यांना लेखी विचारणा करण्यात येणार आहे. त्यांचे समाधानकारक खुलासे प्राप्त न झाल्यास त्यांच्यावर पुढील कायदेशीर कारवाई केली जाईल, अशी माहिती देण्यात आली आहे.

…तर भंगार दुकानदारही असतील आरोपी

भंगार दुकान, गोडाऊनवाल्यांनी चोरीचा मुद्देमाल विकत घेतल्यास भारतीय दंड विधान कलम 411, 413, 414 खाली यापुढे त्यांना आरोपी करण्यात येईल. त्यामुळे सर्व भंगार दुकानदारांना निर्देश देण्यात येत आहे की, त्यांनी भंगार म्हणून कोणतीही वस्तू व मुद्देमाल विकत घेत असताना विक्रीसाठी आलेल्या व्यक्तीची खातरजमा करावी. तसेच तो मुद्देमाल त्याच्याच मालकीचा आहे, त्याची खातरजमा केल्यानंतरच भंगार म्हणून खरेदी करावी. तसेच मुद्देमाल ज्या व्यक्तीकडून घेतली असेल त्याची व घेतलेल्या मुद्देमालाची नोंद ही विहीत रजिस्टरमध्ये घेण्यात यावी. – सोमनाथ वाघचौरे, पोलीस उपाधीक्षक संगमनेर.

anantpangarkar
अनंत पांगारकर

Post Views: 2,032
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
अनंत पांगारकर
  • Website

Related Posts

शासकीय कामात अडथळा आणणाऱ्या दोघांवर गुन्हा दाखल; प्रशासकीय कारवाईदरम्यान राडा

June 4, 2026

सहा मटका अड्ड्यांवर पोलिसांचे छापे; दीड लाखांचा मुद्देमाल जप्त, १० जण ताब्यात

June 4, 2026

संगमनेरमध्ये बुलेटच्या सायलेन्सरमधून मोठे आवाज काढणाऱ्या तरुणावर पोलिसांची कारवाई, दुचाकी जप्त

June 1, 2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राजकारण

विधान परिषद निवडणूक बिनविरोध करण्यासाठी भाजपाकडून कोट्यवधींच्या ऑफर्स; काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा घणाघाती आरोप

By अनंत पांगारकरJune 4, 20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन | मुंबई/बुलढाणा: भारतीय जनता पक्षाला देशात लोकशाही नको असून, ‘इलेक्शन सिस्टिम’…

विधान परिषद निवडणूक : १७ पैकी ५ जागांवर उमेदवार बिनविरोध, वाचा कोणाचा आहे समावेश

June 4, 2026

‘लग्न आणि धर्म परिवर्तना’साठी दबाव; पीडित महिला अधिकाऱ्याचा राजीनामा, ‘कॉर्पोरेट जिहाद’चा आरोप

June 4, 2026

शासकीय कामात अडथळा आणणाऱ्या दोघांवर गुन्हा दाखल; प्रशासकीय कारवाईदरम्यान राडा

June 4, 2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.