Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

सोमवार २८ सप्टेंबर — जाणून घ्या आजच्या दिवसाचे राशिभविष्य

28/09/2026

सहकाराची परंपरा जपण्यासाठी अहिल्यानगर जिल्हा बँक निवडणूक बिनविरोध करण्यासाठी सर्वपक्षीय नेत्यांचे एकमत, संगमनेरात पार पडली बैठक; या नेत्यांची होती उपस्थिती

27/09/2026

संगमनेर तालुक्यातील खंडेरायवाडी येथे टोमॅटो तोडण्याच्या वादातून हाणामारी, विनयभंग; १२ जणांवर गुन्हा दाखल

27/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » अखेर न्यायालयाचा निर्णय; राजकीय प्रतिष्ठित भाऊसाहेब कुटेसह अन्य आरोपींच्या जामीन अर्जावर दिला हा निर्णय
न्यायालय

अखेर न्यायालयाचा निर्णय; राजकीय प्रतिष्ठित भाऊसाहेब कुटेसह अन्य आरोपींच्या जामीन अर्जावर दिला हा निर्णय

दूधगंगेतील पांढरे बोके
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar25/09/2023Updated:25/09/2023No Comments3 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

न्यायालयाच्या निर्णयाकडे लागले होते लक्ष

महाराष्ट्र संवाद न्यूज @ अनंत पांगारकर

संगमनेरच्या सहकारावर अविश्वासाचे सावट निर्माण करणाऱ्या आणि दूधगंगा नागरी सहकारी पतसंस्थेच्या 81 कोटी रुपयांच्या अपहार प्रकरणात मुख्य आरोपी असलेल्या भाऊसाहेब कुटे याच्यासह त्याच्या कुटुंबीयांचा अटकपूर्व जामीन अर्ज सरकारी वकिलांच्या जोरदार युक्तिवादानंतर फेटाळण्यात आला तर अन्य चौघांचा जामीन अर्ज जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश योगेश मनाठकर यांनी मंगळवारी मंजूर केला.

तपास अधिकारी, ठेवीदारांच्या भूमिकेकडे लक्ष: गेल्या महिनाभरापासून ठेवीदारांना न्यायालयाच्या या निर्णयाचे प्रतीक्षा लागली होती. भाऊसाहेब कुठे आणि अन्य आरोपींच्या जामीन अर्जाला सरकारी वकील मच्छिंद्र गवते यांनी न्यायालयासमोर हरकत घेत युक्तिवाद करत या प्रकरणातील गांभीर्य न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले होते. त्यामुळे मुख्य आरोपींचे जामीन अर्ज फेटाळण्यात आले. आता याप्रकरणी तपास अधिकारी आणि ठेवीदार काय भूमिका घेतात याकडे आता लक्ष लागले आहे.

21 जणांवर गुन्हा: संगमनेरच्या अर्थकारणातील महत्त्वाची संस्था म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दूधगंगा नागरी सहकारी पतसंस्थेचा तब्बल 81 कोटी रुपयांचा आर्थिक घोटाळा समोर आल्यानंतर संगमनेरच्या अर्थकारणात मोठी खळबळ उडाली. संगमनेर सह अहमदनगर जिल्ह्याच्या राजकारणातील प्रतिष्ठित असलेल्या जिल्हा परिषद सदस्य भाऊसाहेब कुटे याच्यासह प्रमुख 15 जणांवर या अपहाराचा ठपका ठेवण्यात आला आहे. याशिवाय त्यांना सहाय्य करणाऱ्या आणखी सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

तपास रेंगाळला: तत्कालीन तपास अधिकारी भगवान मथुरे यांनी याप्रकरणी बँकेच्या व्यवस्थापकासह पाच जणांना अटक केली होती. नंतर तपास नगरच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग झाल्यानंतर रेंगाळल्याचे दिसून आले. त्यानंतर या प्रकरणात अद्याप फारसे प्रगती झाली नाही. आरोपी राजकीय प्रतिष्ठित असल्याने आणि त्यांचे नातेसंबंध थेट मंत्रालयात सरकारपर्यंत असल्याने या प्रकरणात तपास यंत्रणेवर मोठा दबाव असल्याचे बोलले जाते. त्यामुळे तपास अधिकाऱ्यांकडून अद्याप नव्याने कोणालाही अटक करण्यात आली नसल्याचे दिसते.

यांनी जामीन अर्ज दाखल केले होते: दरम्यान याप्रकरणी मुख्य आरोपी असलेल्या भाऊसाहेब कुटे याने व त्याच्या कुटुंबातील सदस्यांसाठी शकुंतला कुटे यांनी संगमनेरच्या जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला होता. याशिवाय यातील आरोपी लेखापरीक्षक अरुण के बुरड यांनी अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी, न्यायालयीन कोठडीत असलेले लेखापरीक्षक अमोल क्षीरसागर, बँकेचे कॅशियर लहानु गणपत कुटे, उल्हास यांनी देखील जामीन अर्ज दाखल केले होते. योगेश मनाठकर यांच्यासमोर या जामीन अर्जाची सुनावणी झाली.

निर्णय: सायंकाळी न्यायालयाने यासंदर्भात निर्णय दिला. मुख्य आरोपी भाऊसाहेब कुटे यांच्यासह त्याच्या कुटुंबाच्या वतीने पत्नी शकुंतला कुटे, विमल कुटे, मुलगा संदीप, अमोल आणि दादासाहेब कुटे यांच्यासह सून सोनाली यांनी दाखल केलेले दोन्ही जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळले आहे. त्यामुळे आता कुटे याच्या अटकेचा मार्ग मोकळा झाला असून पोलीस यंत्रणा कुटेसह त्याच्या कुटुंबीयांना कधी अटक करते याकडे लक्ष लागले आहे.

यांना दिलासा: तर लेखा परीक्षक असलेल्या अरुण बुरुड याचा अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर करण्यात आला असून न्यायालयीन कोठडीत असलेल्या लेखापरीक्षक अमोल क्षीरसागर, लहानू कुटे, उत्तम थोरात यांचा जामीन अर्ज न्यायालयाने मंजूर केला आहे.

यांनी बघितले काम: सरकार पक्षाच्या वतीने ॲड. मच्छिंद्र गवते, मुख्य भाऊसाहेब कुटे आणि कुटे परिवाराच्यावतीने नाशिक येथील ॲड. राहुल कासलीवाल, ॲड. सुशांत कवडे, अरुण बुरड यांच्यावतीने मुंबई येथील ॲड. सौरभ राऊत व संगमनेर येथील ॲड. ऋषिकेश वाणी, अमोल क्षीरसागर यांच्यावतीने ॲड. के. जी. कुलकर्णी व ॲड. स्मिता सस्कर, लहानु कुटे याच्यावतीने ॲड. उदयसिंह ढोमसे पाटील, उल्हास थोरात यांच्या वतीने ॲड. अतुल आंधळे यांनी तर ठेवीदारांच्या वतीने ॲड. सिद्धी वैद्य, जनार्दन वाळुंज यांनी काम पाहिले.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 3,387
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

चेक अनादर प्रकरणात संगमनेर न्यायालयाने आरोपीस ठोठावला एक वर्षाचा कारावास; दोन लाखांची नुकसान भरपाई व ९ टक्के व्याजासह रक्कम देण्याचा निर्णय

23/09/2026

फायनान्सचा चेक बाऊन्स: अकोले तालुक्यातील कर्जदाराला ६ महिने कारावास आणि दुप्पट दंडाची शिक्षा

04/09/2026

संगमनेर सत्र न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल: प्राणघातक हल्ल्याप्रकरणी तिघा आरोपींची २ वर्षांची सक्तमजुरी कायम

02/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राशिभविष्य

सोमवार २८ सप्टेंबर — जाणून घ्या आजच्या दिवसाचे राशिभविष्य

By Annant Ppangarkar28/09/20260

आजचे राशिभविष्य  मेष- आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत उत्साहाचा आणि ऊर्जादायी राहील. कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या…

सहकाराची परंपरा जपण्यासाठी अहिल्यानगर जिल्हा बँक निवडणूक बिनविरोध करण्यासाठी सर्वपक्षीय नेत्यांचे एकमत, संगमनेरात पार पडली बैठक; या नेत्यांची होती उपस्थिती

27/09/2026

संगमनेर तालुक्यातील खंडेरायवाडी येथे टोमॅटो तोडण्याच्या वादातून हाणामारी, विनयभंग; १२ जणांवर गुन्हा दाखल

27/09/2026

रविवार विशेष लेख— साहिलचा मृत्यू; शिक्षणाच्या मंदिरातील प्रश्न आता टाळता येणार नाहीत!

27/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.