Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

सोमवार २८ सप्टेंबर — जाणून घ्या आजच्या दिवसाचे राशिभविष्य

28/09/2026

सहकाराची परंपरा जपण्यासाठी अहिल्यानगर जिल्हा बँक निवडणूक बिनविरोध करण्यासाठी सर्वपक्षीय नेत्यांचे एकमत, संगमनेरात पार पडली बैठक; या नेत्यांची होती उपस्थिती

27/09/2026

संगमनेर तालुक्यातील खंडेरायवाडी येथे टोमॅटो तोडण्याच्या वादातून हाणामारी, विनयभंग; १२ जणांवर गुन्हा दाखल

27/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » मंगळवारी गणेश कारखान्याची वार्षिक सभा; बाळासाहेब थोरात आणि विवेक कोल्हे राहणार उपस्थित…
शेती व सहकार

मंगळवारी गणेश कारखान्याची वार्षिक सभा; बाळासाहेब थोरात आणि विवेक कोल्हे राहणार उपस्थित…

गणेशचा लढा शेतकऱ्यांच्या सन्मानासाठी : बाळासाहेब थोरात
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar25/09/2023Updated:25/09/2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

गणेशच्या निवडणुकीत दहशतीचे झाकण उडाले आणि गणेश परिसराने मोकळा श्वास घेतला : शिवाजीराव लहारे

महाराष्ट्र संवाद न्यूज

राहाता : स्वाभिमानी गणेश परिसरासाठी मंगळवारी (ता. २६ सप्टेंबर) घातलेली वार्षिक सर्वसाधारण सभा महत्त्वाची असणार आहे. गेले दहा वर्ष गणेश कारखान्याचे कामगार सभासद आणि शेतकरी अन्याय आणि दहशतीच्या वातावरणाखाली होते. नुकत्याच झालेल्या गणेशच्या निवडणुकीत दहशतीचे झाकण उडाले आणि गणेश परिसराने मोकळा श्वास घेतला. गणेश कारखाना सभासदांच्या हक्कासाठी प्रामाणिकपणे लढा देईल असा विश्वास ज्येष्ठ नेते तथा गणेश सहकारी साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष शिवाजीराव लहारे यांनी व्यक्त केला. सोबतच प्रवरेच्या नेतृत्वाने मोठे मन दाखवून गणेश कारखान्याला सहकार्य करावे, अशी भावनाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.
सभा: गणेश सहकारी साखर कारखान्याची वार्षिक सर्वसाधारण सभा मंगळवारी दुपारी एक वाजता ज्येष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात आणि युवा नेते विवेक कोल्हे यांच्या उपस्थितीत होऊ घातली आहे. त्या पार्श्वभूमीवर लहारे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे भूमिका स्पष्ट केली.
श्री गणेश हा निव्वळ कारखाना नसून राहाता तालुक्याच्या विकासाची कामधेनु आहे. ह्या कारखान्यावर हजारो कुटुंबांचे प्रपंच अवलंबून आहे, तसेच या परिसरातील विकासालाही कारखान्यामुळे गती मिळणार आहे. गणेश कारखान्यावर ७२ कोटीचा दावा ठोकून प्रवरा सहकारी साखर कारखान्याने गणेश समोर संकटांची मालिका उभी केली आहे. कारखाना बंद ठेवून या परिसरातला ऊस हडप करण्याचा डाव प्रवरा कारखान्याच्या नेतृत्वाचा दिसतो. हा कारखाना कामगार, सभासद आणि शेतकऱ्यांच्या मालकीचा आहे, तो सुरू करण्यासाठी आम्ही कोणत्याही स्तरावर संघर्ष करण्याची तयारी ठेवलेली आहे. कारखान्याच्या निवडणुकीनंतर आम्ही राजकारण करायचे नाही अशी भूमिका घेतली होती, त्यानुसारच वाटचाल सुरू होती, मात्र प्रवरा सहकारी साखर कारखान्यांने गणेशला हडप करण्यासाठी सर्व प्रयत्न केले. त्यामुळे गणेश कारखान्यांमध्ये गेल्या दहा वर्षात झालेला गैरकारभार आम्हाला जनतेला सांगावा लागला. ही आमची व्यक्तिगत लढाई नाही, असेही लहारे यांनी सांगितले.
जनतेच्या न्यायालयात : गणेश कारखान्याच्या संदर्भात प्रवरेच्या मंडळींकडून ज्या भूमिका मांडल्या जात आहे त्या धादांत खोट्या आणि अपुऱ्या माहितीवर आधारित आहे. गणेश कारखान्यासोबत झालेल्या करारातील अनेक नियमांचे प्रवरा कारखान्याने पालन केलेले नाही. मागील संचालक मंडळांने ही डोळे झाकून प्रवरा कारखान्यावर विश्वास ठेवला, त्यामुळे देखील अनेक अडचणी उद्भवलेल्या आहेत, आम्ही जनतेच्या न्यायालयात या सगळ्या भूमिका मांडत आहोत. शेवटी हा लढा आम्ही जनतेसाठी लढतो आहोत त्यामुळे त्यांना विश्वासात घेणे आम्हाला आवश्यक वाटते, असेही लहारे यांनी सांगितले.

थोरात-कोल्हे घडवायला आले
आम्ही गणेशच्या सभासदांनी वारंवार आग्रह केल्यामुळे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात आणि युवा नेते विवेक कोल्हे गणेशच्या निवडणुकीत उतरले. गणेशच्या सभासदांच्या जीवनात आनंद निर्माण करणे हेच आमचे ध्येय आहे, कोणी बिघडवायला येत असेल आम्ही मात्र गणेश कारखान्यामध्ये घडवायला आलो आहोत अशी भूमिका बाळासाहेब थोरात आणि विवेक कोल्हे यांनी वारंवार व्यक्त केली आहे, असेही लहारे म्हणाले.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 453
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

सोशल मीडियावर खोटे पसरवणाऱ्यांचा बंदोबस्त करा: माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचा इशारा; संगमनेरची आर्थिक समृद्धी टिकवण्यासाठी संघर्षाचे आवाहन

21/09/2026

राज्यात सरसकट दुष्काळ जाहीर करा; माजी कृषिमंत्री बाळासाहेब थोरात यांची मागणी, रेल्वेप्रश्नी लोकप्रतिनिधीच्या बालिश वक्तव्यावरही केले भाष्य

19/09/2026

थोरात कारखान्याचे ११ लाख मेट्रिक टनाचे गाळप उद्दिष्ट; बॉयलर अग्नीप्रदीपन समारंभात बाळासाहेब थोरात यांचे आवाहन

19/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राशिभविष्य

सोमवार २८ सप्टेंबर — जाणून घ्या आजच्या दिवसाचे राशिभविष्य

By Annant Ppangarkar28/09/20260

आजचे राशिभविष्य  मेष- आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत उत्साहाचा आणि ऊर्जादायी राहील. कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या…

सहकाराची परंपरा जपण्यासाठी अहिल्यानगर जिल्हा बँक निवडणूक बिनविरोध करण्यासाठी सर्वपक्षीय नेत्यांचे एकमत, संगमनेरात पार पडली बैठक; या नेत्यांची होती उपस्थिती

27/09/2026

संगमनेर तालुक्यातील खंडेरायवाडी येथे टोमॅटो तोडण्याच्या वादातून हाणामारी, विनयभंग; १२ जणांवर गुन्हा दाखल

27/09/2026

रविवार विशेष लेख— साहिलचा मृत्यू; शिक्षणाच्या मंदिरातील प्रश्न आता टाळता येणार नाहीत!

27/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.