Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

सोमवार २८ सप्टेंबर — जाणून घ्या आजच्या दिवसाचे राशिभविष्य

28/09/2026

सहकाराची परंपरा जपण्यासाठी अहिल्यानगर जिल्हा बँक निवडणूक बिनविरोध करण्यासाठी सर्वपक्षीय नेत्यांचे एकमत, संगमनेरात पार पडली बैठक; या नेत्यांची होती उपस्थिती

27/09/2026

संगमनेर तालुक्यातील खंडेरायवाडी येथे टोमॅटो तोडण्याच्या वादातून हाणामारी, विनयभंग; १२ जणांवर गुन्हा दाखल

27/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » पुन्हा ठरले संकट मोचक; धनगर समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी शासन सकारात्मक: ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन
आंदोलन

पुन्हा ठरले संकट मोचक; धनगर समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी शासन सकारात्मक: ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन

अण्णासाहेब रुपनर व सुरेश बंडगर यांचे उपोषण मागे
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar26/09/2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज 

अहमदनगर – धनगर समाजाच्या आरक्षण प्रश्नी ग्रामविकास व पंचायतराज मंत्री गिरीश महाजन यांनी अहमदनगर जिल्ह्यातील चौंडी येथे उपोषणकर्ते अण्णासाहेब रुपनर व सुरेश बंडगर यांची मंगळवारी (26 सप्टेंबर) प्रत्यक्ष भेट घेऊन चर्चा केली. धनगर समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी शासन सकारात्मक असल्याची ग्वाही दिली. त्यानंतर अण्णासाहेब रुपनर व सुरेश बंडगर यांनी उपोषण मागे घेत असल्याचे जाहीर केले.

ग्रामविकास मंत्र्यांच्या हस्ते लिंबूपाणी घेऊन रूपनर व बंडगर यांनी उपोषण सोडले. यावेळी आमदार प्रा. राम शिंदे, माजी आमदार अण्णासाहेब डांगे, जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, अण्णासाहेब बाचकर, बाळासाहेब दोडतले आदी उपस्थित होते.

ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन म्हणाले, धनगर समाजाच्या आरक्षण प्रश्नासंदर्भात 21 सप्टेंबरला यशवंत सेनेच्या प्रतिनिधी समवेत सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे विस्तृत बैठक झाली. धनगर समाजाची आरक्षणाची मागणी न्याय असून शासनाने एकमताने या मागणीला पाठिंबा दिला. आरक्षणाबाबत काही तांत्रिक अडचणी असून काही बाबी न्यायप्रविष्ठ आहेत. त्या सोडविण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याची ग्वाही देत तांत्रिक अडचणींची पन्नास दिवसांमध्ये सोडवणूक करण्यासाठी शासनाकडून योग्य ती कार्यवाही केली जाईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

आंदोलना दरम्यान समाज बांधवावर दाखल झालेले गुन्हे मागे घेण्यात येतील. तसेच आरक्षणासंदर्भात अभ्यास करण्यासाठी आवश्यकता भासल्यास उच्च न्यायालयाच्या सेवानिवृत्त न्यायधिशांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना करण्यात येईल. धनगर समाजासाठी असलेल्या विविध योजना, सोयी-सवलतींची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात येत असल्याचेही मंत्री महाजन यांनी यावेळी सांगितले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विनंतीला मान देत गेल्या 20 दिवसापासुन सुरू असलेले उपोषण सोडले आहे. धनगर समाजाला शाश्वत आरक्षण देण्यासाठी शासन अत्यंत सकारात्मक असून सर्व समाज बांधवांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 411
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

प्रशासनाच्या नाकर्तेपणाविरोधात संगमनेर पेटले! संतप्त शेतकरी प्रांताधिकारी कार्यालयात घुसले आमदारांचे फ्लेक्स लावायला तुम्ही त्यांचे गुलाम आहात का? – माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांचा थेट सवाल यशवंतराव चव्हाण प्रशासकीय भवनाच्या पायऱ्यांवर ठिय्या आंदोलन; अखेर प्रांताधिकारी अरुण उंडे नमले, निवेदन स्वीकारले

22/09/2026

विजेचा खेळखंडोबा अन् पाणी पळवण्याचा डाव; संगमनेरमध्ये उद्या महाआक्रोश मोर्चा!

21/09/2026

वीज प्रश्नावर संगमनेर काँग्रेसचा ‘जनआक्रोश मोर्चा’; बाळासाहेब थोरातांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यात जोरदार तयारी

19/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राशिभविष्य

सोमवार २८ सप्टेंबर — जाणून घ्या आजच्या दिवसाचे राशिभविष्य

By Annant Ppangarkar28/09/20260

आजचे राशिभविष्य  मेष- आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत उत्साहाचा आणि ऊर्जादायी राहील. कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या…

सहकाराची परंपरा जपण्यासाठी अहिल्यानगर जिल्हा बँक निवडणूक बिनविरोध करण्यासाठी सर्वपक्षीय नेत्यांचे एकमत, संगमनेरात पार पडली बैठक; या नेत्यांची होती उपस्थिती

27/09/2026

संगमनेर तालुक्यातील खंडेरायवाडी येथे टोमॅटो तोडण्याच्या वादातून हाणामारी, विनयभंग; १२ जणांवर गुन्हा दाखल

27/09/2026

रविवार विशेष लेख— साहिलचा मृत्यू; शिक्षणाच्या मंदिरातील प्रश्न आता टाळता येणार नाहीत!

27/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.