Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

माहिती अधिकाराचे प्रणेते अण्णा हजारे यांची मुख्य माहिती आयुक्त राहुल पांडे यांनी घेतली सदिच्छा भेट; प्रकृतीची केली विचारपूस

03/09/2026

अहिल्यानगरमध्ये ४० नशेची इंजेक्शन्स जप्त; व्यायामपटूंकडून वापराचा संशय, तिघांना अटक

03/09/2026

अहिल्यानगर जिल्ह्यात अवैध गुटखा विक्रीवर स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; ५.३० लाखांचा मुद्देमाल जप्त, ११ जणांवर गुन्हे दाखल

03/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » पंतप्रधान मोदी, नितीन गडकरींचे अभिनंदन करत अमृतवाहिनी ते बस स्टॅन्डपर्यंतच्या मार्गाच्या रंगलेल्या श्रेय नाट्यावरून मुख्यमंत्री शिंदेंच्या शिवसेनेचे शहर प्रमुख कानकाटे यांनी साधला निशाणा…
राजकारण

पंतप्रधान मोदी, नितीन गडकरींचे अभिनंदन करत अमृतवाहिनी ते बस स्टॅन्डपर्यंतच्या मार्गाच्या रंगलेल्या श्रेय नाट्यावरून मुख्यमंत्री शिंदेंच्या शिवसेनेचे शहर प्रमुख कानकाटे यांनी साधला निशाणा…

संगमनेरात मोह, माया, पद आणि पैशाचाच तमाशा! जबाबदारी ओळखा...
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar27/09/2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज @ अनंत पांगारकर

अमृतवाहिनी महाविद्यालय ते रायतेवाडी फाटा बाह्यवळण मार्गापर्यंतच्या रस्त्याच्या कामासाठी केंद्र सरकारच्या माध्यमातून निधी देण्यात आला. अमृतवाहिनी महाविद्यालयाचे बस स्थानकापर्यंत काम झाल्याने लगेचच त्याच्या उद्घाटनाची घाई का असा प्रश्न उपस्थित करत रस्त्याच्या पूर्णतेनंतर उद्घाटन केले असते तर बरे झाले असते. श्रेयवादासाठीचा तमाशा संगमनेर शहराने मंगळवारी अनुभवला. केवळ नगरपालिका निवडणुका केव्हाही होऊ शकतात त्यामुळे त्याच्या देखाव्यासाठी हा उद्घाटनाचा अट्टाहास होता का? असा प्रश्न मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे शहर प्रमुख सोमनाथ कानकाटे यांनी उपस्थित केला आहे.

कानकाटे म्हणाले, संगमनेरमधील जनता भोळी नाही, ती सर्व जाणून आहे. ती तिसरा नेत्र उघडेल तेव्हा सर्व राजकीय पुढाऱ्यांना जनतेची ताकद काय असते ते कळेल. जनतेला कायम गृहीत धरून काम करणे योग्य नाही.

अमृतवाहिनी ते बस स्थानकापर्यंत काम पूर्णत्वास गेले आहे. आता रायतेवाडी फाट्याकडून संगमनेर खुर्द पर्यंतचे काम सुरू आहे. पंतप्रधान मोदी गडकरी यांनी या कामासाठी निधी दिला तर त्यांच्या पक्षाच्या प्रतिनिधींना कार्यक्रमाला का बोलावले नाही? गणेशोत्सवाच्या गर्दीत उद्घाटनाची घाई का? असा प्रश्न उपस्थित करत शहरात अनेक महत्त्वाचे विषय असून ते दुर्लक्षित करण्याचा प्रयत्न सुरू आहे.

शहरात युवा पिढी कामाविना बेकार आहे. त्यांच्याकडे कोणाचे लक्ष नाही. शहरात मटका, दारू, गांजा, पत्त्याचे क्लब, सावकारी, हुक्का बार, बिघडत चाललेली तरुण-तरुणी, छुपे अनैतिक व्यवसाय, गुटखा विक्री राजरोसपणे सुरू असून हे अवैध धंदे रोखण्याची जबाबदारी कोणावर आहे हे देखील पाहिले पाहिजे. यामुळे संगमनेरात भविष्यात मोठे गुन्हेगारी वाढून त्याचा फटका शहराला बसणार आहे.

या प्रश्नात देखील संगमनेरातील प्रत्येक राजकीय नेत्याने, पक्षाने लक्ष घातले पाहिजे. आम्हीच कसे मोठे हे दाखवून कामापुरता फायदा करून घेण्याचे प्रकार सुरू असून यामुळे निस्वार्थी कार्यकर्ता मागे पडत आहे. पुढे येत आहे तो फक्त लाभार्थी. पद, पैसा या माध्यमातून लॉबिंग करून कामे मिळविणारा. अनैतिक धंदे करणारा. बगलबच्चे हाताशी धरून कामे करणारे युवा नेते. त्यामुळे ही वाईट अवस्था दूर करण्याची जबाबदारी सर्वांची आहे, हे ओळखण्याची गरज असून वेळीच जागे व्हा, असे कानकाटे यांनी म्हटले आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,256
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

आमदार अमोल खताळ यांच्या सूचनेनंतर लोहारे-कासारे पाझर तलावातून पाण्याचा विसर्ग सुरू

30/08/2026

संगमनेर पालिकेचा अनोखा उपक्रम! १ ते २५ सप्टेंबरदरम्यान होणार प्रभागनिहाय बैठका; नगराध्यक्ष डॉ. मैथिली तांबे यांच्या पुढाकाराने नागरिकांच्या प्रश्नांना थेट व्यासपीठ

29/08/2026

संगमनेरकरांच्या अभिप्रेत असलेलेच छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य-दिव्य स्मारक उभारणार! “दीड वर्षे खाती हातात असूनही वाढीव जागेचा प्रश्न सोडवला नाही; आता स्मारकाच्या कामात खोडा घालून संगमनेरकरांची दिशाभूल करू नका”

28/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
महाराष्ट्र संवाद विशेष

माहिती अधिकाराचे प्रणेते अण्णा हजारे यांची मुख्य माहिती आयुक्त राहुल पांडे यांनी घेतली सदिच्छा भेट; प्रकृतीची केली विचारपूस

By Annant Ppangarkar03/09/20260

Annant Ppangarkar मुंबई: माहिती अधिकाराचे प्रणेते आणि ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे हे सध्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे…

अहिल्यानगरमध्ये ४० नशेची इंजेक्शन्स जप्त; व्यायामपटूंकडून वापराचा संशय, तिघांना अटक

03/09/2026

अहिल्यानगर जिल्ह्यात अवैध गुटखा विक्रीवर स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; ५.३० लाखांचा मुद्देमाल जप्त, ११ जणांवर गुन्हे दाखल

03/09/2026

अवैध वाळू वाहतूक करणारा हायवा जप्त, २५.६० लाखांचा मुद्देमाल हस्तगत

03/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.