Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

मुलांऐवजी पालकांसाठी संस्कार शिबिर घ्या! — डॉ. संजय कळमकर यांचा घणाघाती टोला; बालकुमार साहित्य संमेलनात रंगली वैचारिक चर्चा

28/09/2026

संगमनेर एम.डी. ड्रग्ज रॅकेटचे धागेदोर कोणापर्यंत? जिल्हा न्यायालयात नेमकं काय घडलं… आता एक नव्हे तर चार आरोपी

28/09/2026

१०० वे पुण्यात, तर १०१ वे साहित्य संमेलन संगमनेरमध्ये, दुर्गाताई तांबे यांची मोठी घोषणा!

28/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » हॅप्पी संगमनेरकरांचा आनंद पाहवत नसल्याने विनाकारण राजकारण! आमदार बाळासाहेब थोरात
विकास

हॅप्पी संगमनेरकरांचा आनंद पाहवत नसल्याने विनाकारण राजकारण! आमदार बाळासाहेब थोरात

गडकरींनी थोरातांवरील प्रेमापोटी दिलेल्या निधीचे राजकारण रंगले
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar27/09/2023Updated:05/10/2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज

संगमनेर – हजारो नागरिकांच्या अभूतपूर्व जल्लोषामध्ये अमृतवाहिनी महाविद्यालय ते बसस्थानक या ‘हॅपी हायवे’चे लोकार्पण होत आहे. तालुक्यात फोनाफोनी झाली. मात्र हा तालुका एक परिवार आहे. संगमनेरच्या विकासात ज्या-ज्या वेळी अडचणी आणण्याचा प्रयत्न झाला त्या-त्या वेळी हा तालुका एकवटला आहे. संगमनेरकरांचा आनंद काही लोकांना पहावत नसल्याने हा कार्यक्रम होऊ नये यासाठी अनेक अडचणी निर्माण करण्यात आल्या. आनंदाच्या क्षणी सर्वांनी एकत्र यावे ही अपेक्षा होती मात्र काही लोकांनी यामध्ये विनाकारण राजकारण केल्याचे प्रतिपादन माजी मंत्री काँग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी केले.

थोरात यांच्या प्रयत्नातून झालेल्या अमृतवाहिनी महाविद्यालय ते बस स्थानक या हॅप्पी हायवेचे लोकार्पण मंगळवारी संध्याकाळी थोरात यांच्या हस्ते स्ट्रीटलाईट सुरु करून करण्यात आले. यावेळी माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे, उद्योजक मनीष मालपाणी, विविध मान्यवरांसह हजारो संगमनेरकर रिमझिम पावसातही उपस्थित होते. नव्याने झालेल्या मार्गावर एकीकडे पाऊस आणि दुसरीकडे लोकार्पण समारंभ अशा स्थितीतही संगमनेरकरांचा जल्लोष दिसून आला.

या मार्गावर सनई चौघडे ढोल ताशांचा निनाद, वीज दिव्यांचा लखलखाट, टाळ्यांचा गजर, फटाक्याची आतिषबाजी यात साहशी खेळ, दांडपट्टा तलवारबाजी या खेळांनी लक्ष वेधले. बास्केटबॉल, स्केटिंग, पारंपारिक नृत्य, झुंबा, तायकोंडो, कबड्डी, लाठी-काठी, तलवारबाजी, फुगडी, वारकऱ्यांचे भजन, संभळ वाद्य याच्यासह अनेक तरुणांनी परिधान केलेले पारंपारिक ड्रेस महिलांनी घातलेल्या पैठण्या, सुहासिनीनी केलेली ओवाळणी या कार्यक्रमातून हा सोहळा पार पडला. मालपाणी परिवाराच्यावतीने आयोजित करण्यात आलेला आर्यनगाला व इमॅजिका ऑर्केस्ट्रा याला प्रतिसाद मिळाला.

थोरात म्हणाले, महसूल मंत्री असताना नितीन गडकरी यांच्याशी संपर्क येत होता. त्यांची महसूलशी संबंधित कामे करत असताना आपण या मार्गासाठी त्यांच्याकडे पैशाची मागणी केली आणि दुसऱ्याच दिवशी त्यांनी आपल्या प्रेमापोटी या मार्गासाठी 25 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देत असल्याचे पत्र दिले. यात राज्य सरकारकडून आणखी भर घालण्यात आली महाविकास आघाडीच्या माध्यमातून या मार्गासाठी 40 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला. आजच्या आनंदमय सोहळ्यासाठी सर्वांना निमंत्रित केले होते. राजकारण बाजूला ठेवत सर्वांनी एकत्र यावे, ही अपेक्षा होती. मात्र आपला आनंद काही लोकांना बघवत नाही. त्यांनी कार्यक्रम होऊ नये यासाठी अनेक अडथळे आणले.

पावसात रंगला आनंद सोहळा…

संगमनेर तालुका एक परिवार असून आनंदात व संकटात सर्व तालुका एक होतो याची प्रचिती या कार्यक्रमाद्वारे पुन्हा एकदा आली. पाऊस सुरू असतानाही हजारो संगमनेरकर रस्त्यावर उतरून थोरात यांच्या नेतृत्वाखाली या आनंद सोहळ्यात सहभागी झाले होते.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 10,363
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेर तालुक्याला १०.५० कोटींचा निधी; दोन मोठ्या पुलांचे काम मार्गी – आमदार अमोल खताळ

18/12/2025

एमआयडीसीसाठी उपलब्ध जागेचा अहवाल सादर करण्याचे आदेश, आमदार सत्यजीत तांबे यांच्या पाठपुराव्याला यश – पठारातील प्रस्तावित एमआयडीसीसाठी ‘गुड न्यूज’

18/12/2025

संगमनेरच्या केशवतीर्थाला आमदार सत्यजीत तांबे यांच्या प्रयत्नांतून स्मार्ट टच! महिला-पुरुषांसाठी स्वतंत्र ई-टॉयलेट्स आणि चेंजिंग रूम लवकरच

24/10/2025
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
महाराष्ट्र संवाद विशेष

मुलांऐवजी पालकांसाठी संस्कार शिबिर घ्या! — डॉ. संजय कळमकर यांचा घणाघाती टोला; बालकुमार साहित्य संमेलनात रंगली वैचारिक चर्चा

By Annant Ppangarkar28/09/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- “सध्याच्या डिजिटल युगात अन्न, वस्त्र आणि निवारा यासोबत ‘मोबाईल डेटा’ ही…

संगमनेर एम.डी. ड्रग्ज रॅकेटचे धागेदोर कोणापर्यंत? जिल्हा न्यायालयात नेमकं काय घडलं… आता एक नव्हे तर चार आरोपी

28/09/2026

१०० वे पुण्यात, तर १०१ वे साहित्य संमेलन संगमनेरमध्ये, दुर्गाताई तांबे यांची मोठी घोषणा!

28/09/2026

कांदा व्यापाऱ्यावर कोयत्याने वार करणारा फरार आरोपी अखेर दोन वर्षानंतर एलसीबीच्या जाळ्यात

28/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.