Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

माहिती अधिकाराचे प्रणेते अण्णा हजारे यांची मुख्य माहिती आयुक्त राहुल पांडे यांनी घेतली सदिच्छा भेट; प्रकृतीची केली विचारपूस

03/09/2026

अहिल्यानगरमध्ये ४० नशेची इंजेक्शन्स जप्त; व्यायामपटूंकडून वापराचा संशय, तिघांना अटक

03/09/2026

अहिल्यानगर जिल्ह्यात अवैध गुटखा विक्रीवर स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; ५.३० लाखांचा मुद्देमाल जप्त, ११ जणांवर गुन्हे दाखल

03/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळूनही तपास यंत्रणा आरोपींपासून अद्यापही दूर! भाऊसाहेब कुटेसह अन्य आरोपींना अटक कधी होणार?
गुन्हेगारी

न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळूनही तपास यंत्रणा आरोपींपासून अद्यापही दूर! भाऊसाहेब कुटेसह अन्य आरोपींना अटक कधी होणार?

दूधगंगेतील पांढरे बोके
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar28/09/2023Updated:28/09/2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

गुन्हा दाखल होऊन दीड महिन्याचा कालावधी उलटला तरी आर्थिक गुन्हे शाखा एकाही आरोपीला ताब्यात घेऊ शकलेली नाही

महाराष्ट्र संवाद न्यूज @ अनंत पांगारकर

व्हाईट कॉलर क्रिमिनल आणि दूधगंगा नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष असलेला भाऊसाहेब कुटे आणि त्याच्या कुटुंबीयांचा अटकपूर्व जामीन अर्ज संगमनेरच्या जिल्हा न्यायालयाने फेटाळून चार दिवसांचा कालावधी उलटत आहे. तरीदेखील तपास यंत्रणा कुटे आणि त्याच्या परिवारापर्यंत अद्यापही पोहोचत नसल्याने याप्रकरणी तपास यंत्रणेवर असलेले संशयाचे सावट अधिक गडद झाले आहे.

दूधगंगा नागरी सहकारी पतसंस्थेच्या 81 कोटी रुपयांच्या गैरव्यवहार प्रकरणात अडकलेल्या आरोपींसह तपास यंत्रणा आणि ज्यांच्यावर या सर्व कारभारावर लक्ष ठेवण्याची जबाबदारी होती त्या सहकार विभागाबद्दल आता संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे. गुन्हेगार राजकीय दृष्ट्या प्रतिष्ठित असल्याने आणि राजकारणातील बड्या प्रस्थासोबत असलेल्या नातेसंबंधाचा गैरफायदा घेऊन तपास यंत्रणेवर दबाव आणत असल्याची चर्चा सुरू आहे.

भाऊसाहेब कुटे हाच या गैरव्यवहार प्रकरणामागील मुख्य सूत्रधार असून त्याच्यासह त्याच्या कुटुंबातील सदस्य आणि अन्य काहीजणांसह तब्बल 15 जणांवर या 81 कोटीच्या गैरव्यवहाराचा ठपका ठेवण्यात आला आहे. भाऊसाहेब कुटे याने केवळ गैरव्यवहारच केला नाही तर संगमनेरच्या समृद्ध सहकार विश्वाला देखील अडचणीच्या खाईत ढकलले आहे. यामुळे संगमनेरातील पतसंस्थांच्या विश्वासार्हतेला धक्का पोहोचला असून पतसंस्थांचे अर्थकारण ढासळण्याची चिन्हे निर्माण झाले आहे.

देशाच्या सहकाराला नवा आयाम देणाऱ्या आणि दिशादर्शक ठरलेल्या संगमनेरच्या सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याचा तब्बल दहा वर्ष उपाध्यक्ष असलेला, अहमदनगर जिल्हा परिषदेचा काँग्रेसकडून सदस्य असलेला, दूधगंगा नागरी सहकारी पतसंस्थेचा तब्बल तीस वर्षे अध्यक्ष असलेला भाऊसाहेब कुटे जिल्ह्याच्या राजकारणात प्रतिष्ठित म्हणून गणला जातो. यामुळे त्याच्यामागे राजकीय आशीर्वाद असल्याचे बोलले जाते. संस्थेच्या आर्थिक मर्यादेबाहेर जाऊन घरातील सदस्यांना कोणत्याही तारणाशिवाय कोट्यावधी रुपयांची कर्ज देत नियमांची पायमल्ली कुटे याने केली आहे. याशिवाय देवळाली प्रवरा (राहुरी) येथील प्रतिष्ठित असलेल्या आणि राज्याच्या सत्ताकारणातील बड्या नेत्यासोबत नातेसंबंध असलेल्या कदम कुटुंबियांचे देखील या गैरव्यवहारात नाव समोर आले आहे. या दोन परिवारांसोबत आणखी दोन नावे प्रमुख आरोपींमध्ये असून आर्थिक गुन्हे शाखेची तपास यंत्रणा या सर्व राजकीय प्रतिष्ठित गुन्हेगारांपर्यंत अद्याप का पोहोचू शकले नाही असा प्रश्न उपस्थित होत आहे. मोठ्या प्रमाणात राजकीय दबाव आणि अर्थकारण यासंदर्भात तपास यंत्रणेवर संशयाचे ढग जमा झाले आहे. त्यामुळे हे व्हाईट कॉलर क्रिमिनल्स पकडत आर्थिक गुन्हे शाखेने आपली विश्वासार्हता सिद्ध करण्याची आवश्यकता या निमित्ताने निर्माण झाली आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 977
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

अहिल्यानगरमध्ये ४० नशेची इंजेक्शन्स जप्त; व्यायामपटूंकडून वापराचा संशय, तिघांना अटक

03/09/2026

अहिल्यानगर जिल्ह्यात अवैध गुटखा विक्रीवर स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; ५.३० लाखांचा मुद्देमाल जप्त, ११ जणांवर गुन्हे दाखल

03/09/2026

अवैध वाळू वाहतूक करणारा हायवा जप्त, २५.६० लाखांचा मुद्देमाल हस्तगत

03/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
महाराष्ट्र संवाद विशेष

माहिती अधिकाराचे प्रणेते अण्णा हजारे यांची मुख्य माहिती आयुक्त राहुल पांडे यांनी घेतली सदिच्छा भेट; प्रकृतीची केली विचारपूस

By Annant Ppangarkar03/09/20260

Annant Ppangarkar मुंबई: माहिती अधिकाराचे प्रणेते आणि ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे हे सध्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे…

अहिल्यानगरमध्ये ४० नशेची इंजेक्शन्स जप्त; व्यायामपटूंकडून वापराचा संशय, तिघांना अटक

03/09/2026

अहिल्यानगर जिल्ह्यात अवैध गुटखा विक्रीवर स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; ५.३० लाखांचा मुद्देमाल जप्त, ११ जणांवर गुन्हे दाखल

03/09/2026

अवैध वाळू वाहतूक करणारा हायवा जप्त, २५.६० लाखांचा मुद्देमाल हस्तगत

03/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.