Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

सोमवार २८ सप्टेंबर — जाणून घ्या आजच्या दिवसाचे राशिभविष्य

28/09/2026

सहकाराची परंपरा जपण्यासाठी अहिल्यानगर जिल्हा बँक निवडणूक बिनविरोध करण्यासाठी सर्वपक्षीय नेत्यांचे एकमत, संगमनेरात पार पडली बैठक; या नेत्यांची होती उपस्थिती

27/09/2026

संगमनेर तालुक्यातील खंडेरायवाडी येथे टोमॅटो तोडण्याच्या वादातून हाणामारी, विनयभंग; १२ जणांवर गुन्हा दाखल

27/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » दूधगंगा पतसंस्थेच्या 81 कोटी रुपयांच्या अपहाराचा मास्टरमाईंड व्हाईट कॉलर भाऊसाहेब कुटेच! चेअरमन कुटे, मॅनेजर गुंजाळ, अकाउंटंट गायकवाड यांच्या संगनमतातूनच झाला ठेवीदारांच्या पैशाचा अपहार…
पत्रकारिता

दूधगंगा पतसंस्थेच्या 81 कोटी रुपयांच्या अपहाराचा मास्टरमाईंड व्हाईट कॉलर भाऊसाहेब कुटेच! चेअरमन कुटे, मॅनेजर गुंजाळ, अकाउंटंट गायकवाड यांच्या संगनमतातूनच झाला ठेवीदारांच्या पैशाचा अपहार…

दूधगंगेतील पांढरे बोके
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar29/09/2023Updated:30/09/2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज @ अनंत पांगारकर

दूधगंगा नागरी सहकारी पतसंस्थेतील सुमारे 81 कोटी रुपयांच्या गैरव्यवहाराने संगमनेरातील पतसंस्थांचे अर्थकारण धोक्यात आले आहे. संगमनेर शहर पोलीस ठाण्यात दूधगंगा पतसंस्थेचा चेअरमन आणि राजकीयदृष्ट्या प्रतिष्ठित असलेला पुढारी भाऊसाहेब कुटे याच्यासह तब्बल 21 जणांविरोधात अपहाराचा गुन्हा दाखल झाला असला तरी यामागील मुख्य सूत्रधार, मास्टरमाईंड हा भाऊसाहेब कुटेच असल्याचे दिसते. चेअरमन असलेल्या कुटे याच्या दहशत आणि दबावाला संस्थेतील अधिकारी कर्मचारी बळी पडल्याचे दिसते.

“विना सहकार नाही उद्धार” याप्रमाणे चालणारा सहकार हा संगमनेरच्या अर्थकारणाचा पाया आहे. भाऊसाहेब थोरात यांनी रुजविलेल्या सहकाराचे रोपटे माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यात सर्वत्र फोपावले. येथील सहकार राज्यासाठी दिशादर्शक ठरला असताना आता थोरात यांचे जुने सहकारी या सहकाराला गालबोट लावत असल्याचे समोर आले आहे. भाऊसाहेब कुटे हा त्याच पंक्तीतला व्हाईट कॉलर क्रिमिनल ठरला आहे. सहकारात काम करणारा थोरात यांचा हा सहकारी जिल्हा परिषदेचा कार्यकाल संपत असताना जिल्ह्यातील एका नेत्याचा आश्रयाने भारतीय जनता पक्षाच्या वाटेवर असल्याची चर्चा त्यावेळी शहरात रंगली होती. कुटे याच्यासोबत आणखी काही काँग्रेसचे पदाधिकारी देखील असल्याचे उघडपणे बोलले जात होते. मात्र माशी शिंकली आणि हा प्रवेश थांबला असल्याचे बोलले जात होते.

कुटे याने बँकेच्या नियमावलीला हरताळ फासत बँकेतील ठेवी या आपलीच मालमत्ता आहे, असे समजून या ठेवींचा व्यवस्थापक भाऊसाहेब विठ्ठल गुंजाळ, चिप अकाउंटंट भाऊसाहेब संतू गायकवाड यांच्या सोबत संगनमत करुन अपहार केला. त्यामुळे या तिघांवरच तब्बल 81 कोटीच्या लेखापरीक्षकांनी सर्वाधिक जबाबदारी टाकली असल्याचे फिर्यादीवरून दिसते. पतसंस्थांचा गैरव्यवहार संगमनेरकरांना तसा नवीन नाही. यापूर्वीही काही पतसंस्था बुडाल्याची उदाहरणे याच शहरात आहे. मात्र या सर्व पतसंस्थांच्या गैर व्यवहारावर कडी केली ते दूधगंगा नागरी पतसंस्थेच्या अपहार प्रकरणाने. तब्बल 81 कोटीच्या घोटाळ्याबरोबरच कुटे याने संस्थेच्या पैशाचा वैयक्तिक कसा वापर केला, याची देखील वेगवेगळी चर्चा आता सुरू आहे. त्यामुळेच 80 कोटी 79 लाख 41 हजार 981 रुपयांचा अपहार, गैरव्यवहार, गैरवापर हा व्याजासह गुन्हा दाखल झालेल्या मुख्य 15 आरोपीकडून वसुलीस पात्र असल्याचे लेखापरीक्षकांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे. असे झाले तरच ठेवीदारांचा पैसा वाचू शकेल आणि त्यांना न्याय मिळेल.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 3,826
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

जिल्हाधिकारी साहेब एकदा रस्त्यावर पायी फिराच! संगमनेरातील अतिक्रमण हटाव मोहीम दिखावा की केवळ समाधान?

05/08/2026

संगमनेरमध्ये रेशनच्या धान्याचा काळा बाजार? पोलीस अन् पुरवठा विभागाच्या संशयास्पद भूमिकेने संभ्रम!

05/08/2026

अतिक्रमणाच्या नावाखाली संगमनेरात गरिबांवर बुलडोझर, धनदांडग्यांवर मेहेरनजर; ‘सिंघम’ बनलेल्या प्रशासनाविरोधात नागरिकांचा संतप्त सवाल

19/07/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राशिभविष्य

सोमवार २८ सप्टेंबर — जाणून घ्या आजच्या दिवसाचे राशिभविष्य

By Annant Ppangarkar28/09/20260

आजचे राशिभविष्य  मेष- आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत उत्साहाचा आणि ऊर्जादायी राहील. कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या…

सहकाराची परंपरा जपण्यासाठी अहिल्यानगर जिल्हा बँक निवडणूक बिनविरोध करण्यासाठी सर्वपक्षीय नेत्यांचे एकमत, संगमनेरात पार पडली बैठक; या नेत्यांची होती उपस्थिती

27/09/2026

संगमनेर तालुक्यातील खंडेरायवाडी येथे टोमॅटो तोडण्याच्या वादातून हाणामारी, विनयभंग; १२ जणांवर गुन्हा दाखल

27/09/2026

रविवार विशेष लेख— साहिलचा मृत्यू; शिक्षणाच्या मंदिरातील प्रश्न आता टाळता येणार नाहीत!

27/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.