Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

‘पैशाचा पाऊस’ पडणारच होता, पण…; अहिल्यानगरमध्ये ९२ लाखांच्या बनावट नोटांसह टोळी गजाआड!

29/09/2026

दुष्काळ, जिल्हा बँक आणि राजकारण : नाण्याच्या दोन बाजू एकत्र आल्या! पुढे काय…

29/09/2026

मंगळवार २९ सप्टेंबर — जाणून घ्या आजच्या दिवसाचे राशिभविष्य

28/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » सहकारमहर्षी भाऊसाहेब संतूजी थोरात महाविद्यालयाने गाजविला स्वररंग युवक महोत्सव
क्रिडा व कला

सहकारमहर्षी भाऊसाहेब संतूजी थोरात महाविद्यालयाने गाजविला स्वररंग युवक महोत्सव

Annant PpangarkarBy Annant Ppangarkar30/09/2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज

स्वररंग युवक महोत्सवमध्ये सहकारमहर्षी भाऊसाहेब संतूजी थोरात महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी विविध कला प्रकारात सहभाग घेऊन ९ कला प्रकारात यश संपादन केले.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, विद्यार्थी विकास मंडळामार्फत स्वररंग या विभागीय युवक महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. या महोत्सवातून विद्यार्थ्यांना त्यांच्यातील विविध कला अविष्कार सादर करण्याची संधी मिळते.

या महोत्सवात सहभागी होणाऱ्या विद्यार्थी कलावंताना आगामी राज्यस्तरीय, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय युवक महोत्सवाकरिता सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या माध्यमातून संधी दिली जाते. या युवक महोत्सवातून अनेक नामवंत कलाकार तयार होऊन त्यांना आंतरराष्ट्रीय ख्याती प्राप्त झालेली आहे.

समूह गीत गायनमध्ये समृद्धी अभंग, कार्तिक सोनवणे, प्रथमेश बिडवे, आदित्य साळवे, संज्योत कोल्हे, कावेरी बोऱ्हाडे यांना प्रथम क्रमांक, मेहंदीमध्ये शेख अक्सा प्रथम क्रमांक, स्वरवाद्य सनई वादन प्रथमेश बिडवे द्वितीय क्रमांक, एकपात्री अभिनय सायली गायकवाड द्वितीय क्रमांक, माती कला प्रिया जाधव तृतीय क्रमांक, वैयक्तिक सुगम गीत समृद्धी अभंग तृतीय क्रमांक, उपशास्त्रीय गीत गायन समृद्धी अभंग तृतीय क्रमांक, कात्रण कला ऋतुजा पोकळे तृतीय क्रमांक, मांडणी कला तेजस महाले, सार्थक महाले, ओम नवले तृतीय क्रमांक याप्रमाणे विद्यार्थ्यांनी यश संपादन केले.

या सर्व सहभागी व यशस्वी विद्यार्थ्यांचे महाराष्ट्र राज्याचे माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात, सह्याद्री बहुजन विद्या प्रसारक समाज संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, आमदार सत्यजीत दादा तांबे, माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे, कॅन्सरतज्ञ डॉ. जयश्रीताई थोरात, सेक्रेटरी लक्ष्मणराव कुटे, सहसचिव दत्तात्रय चासकर, रजिस्ट्रार बी.आर.गवांदे, महाविद्यालायचे प्राचार्य डॉ. दिनानाथ पाटील, उपप्राचार्य प्रो. डॉ. बाळासाहेब वाघ, उपप्राचार्य डॉ. विलास कोल्हे, आय.क्यू.ए.सी.समन्वयक डॉ. लक्ष्मण घायवट, कार्यालय अधिक्षक गोरक्षनाथ पानसरे, सर्व विभाग प्रमुख, प्राध्यापक, शिक्षकेत्तर सेवक वृंद, विद्यार्थी आदींनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.

सदर स्पर्धेकरिता विद्यार्थी कल्याण अधिकारी प्रा. जयराम डेरे, कला मंडळ प्रमुख प्रा. तुळशीराम जाधव यांचे मार्गदर्शन लाभले. या स्पर्धेसाठी प्रा. नानासाहेब गुंजाळ व कला मंडळातील सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 806
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

जयहिंद कला महोत्सव: १२ हजार विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग; कौशल्यपूर्ण शिक्षणासाठी उपक्रम राज्यासाठी दिशादर्शक – माजी मंत्री बाळासाहेब थोरात

08/09/2026

संगमनेरात बालकला महोत्सवाचे उत्साहात उद्घाटन; बालगोपाळांच्या कलागुणांना मिळाले हक्काचे व्यासपीठ!

07/09/2026

संगमनेरात जयहिंद लोकचळवळीच्या वतीने उद्या आणि परवा बालकला महोत्सवाचे आयोजन; विविध उपक्रमांसह रंगभरण स्पर्धेची पर्वणी

05/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

‘पैशाचा पाऊस’ पडणारच होता, पण…; अहिल्यानगरमध्ये ९२ लाखांच्या बनावट नोटांसह टोळी गजाआड!

By Annant Ppangarkar29/09/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – नागरिकांच्या अज्ञानाचा आणि अंधश्रद्धेचा फायदा घेत ‘पैशाचा पाऊस’ पाडण्याचे आमिष…

दुष्काळ, जिल्हा बँक आणि राजकारण : नाण्याच्या दोन बाजू एकत्र आल्या! पुढे काय…

29/09/2026

मंगळवार २९ सप्टेंबर — जाणून घ्या आजच्या दिवसाचे राशिभविष्य

28/09/2026

मुलांऐवजी पालकांसाठी संस्कार शिबिर घ्या! — डॉ. संजय कळमकर यांचा घणाघाती टोला; बालकुमार साहित्य संमेलनात रंगली वैचारिक चर्चा

28/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.