Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

सोमवार २८ सप्टेंबर — जाणून घ्या आजच्या दिवसाचे राशिभविष्य

28/09/2026

सहकाराची परंपरा जपण्यासाठी अहिल्यानगर जिल्हा बँक निवडणूक बिनविरोध करण्यासाठी सर्वपक्षीय नेत्यांचे एकमत, संगमनेरात पार पडली बैठक; या नेत्यांची होती उपस्थिती

27/09/2026

संगमनेर तालुक्यातील खंडेरायवाडी येथे टोमॅटो तोडण्याच्या वादातून हाणामारी, विनयभंग; १२ जणांवर गुन्हा दाखल

27/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » जामीनपात्र गुन्ह्यांमध्ये जामीन न स्वीकारता रात्रभर कोठडीत डांबले; दोन लाख रुपयांची भरपाई देण्याचे न्यायालयाचे आदेश!
न्यायालय

जामीनपात्र गुन्ह्यांमध्ये जामीन न स्वीकारता रात्रभर कोठडीत डांबले; दोन लाख रुपयांची भरपाई देण्याचे न्यायालयाचे आदेश!

दोषी आढळलेल्या पोलिसांच्या वेतनातून भरपाईची रक्कम वसूल करा...
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar02/10/2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज

मुंबई :‘अटक कारवाई अत्यावश्यक असेल तरच करावी, असे सर्वोच्च न्यायालयाचे स्पष्ट दिशानिर्देश असूनही ताडदेव पोलिसांनी जामीनपात्र गुन्ह्याच्या प्रकरणात आरोपीचा जामीन स्वीकारला नाही आणि त्याला त्याचे कपडे उतरवून अन्य गुन्हेगारांसोबत रात्रभर कोठडीत बेकायदा डांबून ठेवले, हे पोलिसांच्या मनमानी व बेदरकारपणा आणि असंवेदनशीलतचे दर्शन आहे. पोलिसांची अशी मनमानी खपवून घेतला जाऊ शकत नाही’, असे अत्यंत कठोर निरीक्षण नोंदवत मुंबईतील संगीत शिक्षकाला ८ नोव्हेंबरपर्यंत दोन लाख रुपयांची भरपाई देण्याचा आदेश उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिला आहे.

न्यायालयाने दिले हे आदेश : बेकायदा अटक कारवाई आणि सात रस्ता लॉक-अपमध्ये घडलेला प्रकार यासाठी जबाबदार असलेल्या ताडदेव पोलिस ठाण्यातील संबंधित पोलिसांची चौकशी करण्यासाठी मुंबई पोलिस आयुक्तांनी पोलिस उपायुक्त श्रेणीतील किंवा त्याहून वरिष्ठ अधिकाऱ्याची नियुक्ती करावी. त्या अधिकाऱ्याने याचिकाकर्ती नीलम संपत व तिचे पती नितीन संपत यांचे म्हणणेही ऐकून आठ आठवड्यांच्या आत सर्वंकष चौकशी करावी. त्यानंतर दोषी आढळलेल्या पोलिसांच्या वेतनातून भरपाईची रक्कम वसूल करण्यात यावी.

निकालाची प्रत पोलीस महासंचालक व आयुक्तांना : याबाबतचा कृती अहवाल २० डिसेंबरपर्यंत सादर करावा’, असा आदेशही न्या. रेवती मोहिते-डेरे व न्या. गौरी गोडसे यांच्या खंडपीठाने दिले आहेत. त्याचबरोबर जामीनपात्र गुन्ह्यांच्या प्रकरणांत पोलिसांकडून असे प्रकार होऊ नयेत, यादृष्टीने सर्व पोलिस ठाण्यांना योग्य ते निर्देश, मार्गदर्शक तत्त्वे घालून देता यावीत, यासाठी निकालाची प्रत राज्याचे पोलिस महासंचालक व मुंबईच्या पोलिस आयुक्तांकडे पाठवण्याचे निर्देशही खंडपीठाने दिले.

काय आहे प्रकरण?

‘संगीत वर्गाचे शुल्क का वाढवले, अशी विचारणा केल्यानंतर नितीन संपत यांनी आक्षेपार्ह वर्तन केले, अशी तक्रार एका महिलेने केल्यानंतर पोलिसांनी त्यांच्याविरोधात विनयभंग आणि विनयशीलतेचा भंग केल्याच्या आरोपाखाली १७ जुलैला एफआयआर नोंदवला. तसेच चौकशीसाठी फौजदारी दंड संहितेच्या कलम ४१-अ अन्वये नोटीस पाठवली. त्यानुसार, ते वेळोवेळी चौकशीसाठी हजर राहिले. 

नंतर ते बेंगळुरूमध्ये असताना पोलिसांनी त्यांना पुन्हा मुंबईत तातडीने चौकशीसाठी बोलावले. त्यानुसार, ते आले असता पोलिसांनी त्यांना रात्री उशिरापर्यंत पोलिस ठाण्यातच बसवून ठेवले. त्यानंतर त्यांना वैद्यकीय तपासणीसाठी नेले आणि मध्यरात्रीनंतर सातरस्ता लॉक-अपमध्ये ठेवले.

नितीन यांच्या वकिलांनी पोलिस ठाण्यातच तातडीने पोहोचून जामीन देण्याची तयारी दर्शवूनही पोलिसांनी ती स्वीकारली नाही. तसेच तिथे त्यांना त्यांचे कपडे काढायला लावून अन्य गुन्हेगारांसोबत बसायला लावले. अशाप्रकारे पोलिसांनी बेकायदा अटक करून त्यांच्या मूलभूत हक्कांचे उल्लंघन केले’, असा आरोप नीलम यांनी ॲड. कृपाशंकर पांडे यांच्यामार्फत फौजदारी रिट याचिकेद्वारे केला होता.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,073
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

चेक अनादर प्रकरणात संगमनेर न्यायालयाने आरोपीस ठोठावला एक वर्षाचा कारावास; दोन लाखांची नुकसान भरपाई व ९ टक्के व्याजासह रक्कम देण्याचा निर्णय

23/09/2026

फायनान्सचा चेक बाऊन्स: अकोले तालुक्यातील कर्जदाराला ६ महिने कारावास आणि दुप्पट दंडाची शिक्षा

04/09/2026

संगमनेर सत्र न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल: प्राणघातक हल्ल्याप्रकरणी तिघा आरोपींची २ वर्षांची सक्तमजुरी कायम

02/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राशिभविष्य

सोमवार २८ सप्टेंबर — जाणून घ्या आजच्या दिवसाचे राशिभविष्य

By Annant Ppangarkar28/09/20260

आजचे राशिभविष्य  मेष- आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत उत्साहाचा आणि ऊर्जादायी राहील. कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या…

सहकाराची परंपरा जपण्यासाठी अहिल्यानगर जिल्हा बँक निवडणूक बिनविरोध करण्यासाठी सर्वपक्षीय नेत्यांचे एकमत, संगमनेरात पार पडली बैठक; या नेत्यांची होती उपस्थिती

27/09/2026

संगमनेर तालुक्यातील खंडेरायवाडी येथे टोमॅटो तोडण्याच्या वादातून हाणामारी, विनयभंग; १२ जणांवर गुन्हा दाखल

27/09/2026

रविवार विशेष लेख— साहिलचा मृत्यू; शिक्षणाच्या मंदिरातील प्रश्न आता टाळता येणार नाहीत!

27/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.