Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

‘पैशाचा पाऊस’ पडणारच होता, पण…; अहिल्यानगरमध्ये ९२ लाखांच्या बनावट नोटांसह टोळी गजाआड!

29/09/2026

दुष्काळ, जिल्हा बँक आणि राजकारण : नाण्याच्या दोन बाजू एकत्र आल्या! पुढे काय…

29/09/2026

मंगळवार २९ सप्टेंबर — जाणून घ्या आजच्या दिवसाचे राशिभविष्य

28/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » संगमनेरच्या अर्थकारणातील अग्रगण्य महेश नागरी पतसंस्थेला २ कोटी ११ लाखांचा नफा; सभासदांना पंधरा टक्के दराने लाभांश वाटप : सीए कैलास सोमाणी
शेती व सहकार

संगमनेरच्या अर्थकारणातील अग्रगण्य महेश नागरी पतसंस्थेला २ कोटी ११ लाखांचा नफा; सभासदांना पंधरा टक्के दराने लाभांश वाटप : सीए कैलास सोमाणी

दोन दशकांची निर्विवाद वाटचाल
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar02/10/2023No Comments3 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज

संगमनेर – जेव्हा व्यापाराची भरभराट होते, तेव्हाच विकास साधला जावू शकतो. संगमनेर शहराकडेे जिल्ह्यातील आघाडीची बाजारपेठ म्हणून बघितले जाते. संगमनेरची बाजारपेठ समृद्ध होण्यात तालुक्यातील विविध आर्थिक संस्थांचा वाटा असून त्यात महेश नागरी सहकारी पतसंस्था अग्रणी आहे. सरलेल्या आर्थिक वर्षात संस्थेने शंभर कोटी रुपयांच्या ठेवींचा टप्पा ओलांडला असून सुमारे ७५ कोटींचे कर्ज वितरण करतांना व्यापारी वर्गाला आर्थिक स्थैर्य प्राप्त करुन देण्याचा प्रयत्न केला आहे. याच बळावर गेल्या आर्थिक संस्थेने २ कोटी ११ लाखांचा निव्वळ नफा कमावला असून थकबाकीही नगन्य असल्याची माहिती महेश नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन सीए कैलास सोमाणी यांनी दिली.

संगमनेरच्या अर्थकारणातील अग्रगण्य व पतसंस्था चळवळीत आघाडीवर असलेल्या महेश नागरी पतसंस्थेची २० वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. याप्रसंगी सोमाणी अध्यक्षस्थानावरुन बोलत होते. यावेळी मंचावर संस्थेचे संचालक मंडळ व व्यवस्थापक उपस्थित होते.

उपस्थित सभासदांसमोर संस्थेच्या आर्थिक पत्रकांचे तपशिलवार विवेचन करतांना चेअरमन सोमाणी यांनी अत्यंत मुद्देसूद आणि अभ्यासपूर्ण उत्तरे देत सभासदांचे समाधान केले. बँकेची आर्थिक प्रगती, गेल्या आर्थिक वर्षात संस्थेच्या ठेवींमध्ये झालेली जवळपास ३६ टक्के वाढ आणि चालू आर्थिक वर्षासाठी निश्‍चित उद्दिष्ट यावर भाष्य करतांना सरलेल्या वर्षात संस्थेला २ कोटी ११ लाख रुपयांचा विक्रमी निव्वळ नफा झाल्याने सभासदांना १५ टक्के दराने लाभांश वाटप करण्याचा प्रस्ताव त्यांनी मांडला, त्याला सभासदांनी एकमुखाने संमत करताच काही मिनिटांतच सभासदांच्या खात्यांवर लाभांशाची रक्कम जमा झाली.

महेश नागरी सहकारी पतसंस्था शहरातील आघाडीच्या आर्थिक संस्थांमध्ये गणली जाते. ३१ मार्च अखेरपर्यंत संस्थेने निश्‍चित केलेले १०० कोटी रुपयांच्या ठेवींचे उद्दिष्ट ओलांडले आहे. चालू आर्थिक वर्षात त्यात ३५.७७ टक्क्यांची भर पडली आहे. व्यापार क्षेत्रातील प्रामाणिक आणि होतकरु कर्जदारांना ७४ कोटी ८० लाख रुपयांची कर्ज देण्यात आली असून संस्थेच्या थकबाकीचे प्रमाण अगदीच नगन्य २.६५ टक्के इतके आहे. संस्थेच्या विनाजोखीम गुतवणूकीची रक्कम ४४ कोटी ४४ लाखांची असून स्वनिधी १४ कोटी ५४ लाख इतका झाला आहे.

यावेळी शोभा पोफळे, ओंकारनाथ भंडारी, केदारनाथ राठी, राणिप्रसाद मुंदडा, प्रकाश कलंत्री, प्रकाश राठी, गणेश बाहेती, मनीष मणियार, अनीष मणियार आदी सभासदांनी मनोगत व्यक्त करतांना संस्थेच्या प्रगतीबद्दल समाधान व्यक्त करताना आगामी आर्थिक वर्षात संस्था निश्‍चित उद्दिष्ट प्राप्त करेल असा विश्‍वास व्यक्त केला.

भंडारी मंगल कार्यालयात पार पडलेल्या या सभेला सभासदांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यावेळी विद्यमान चेअरमन डॉ. शशिकांत पोफळे, व्हा. चेअरमन विशाल नावंदर, संचालक मंडळाचे सदस्य अनिल आट्टल, योगेश जाजू, आनंद तापडे, नंदकिशोर कलंत्री, श्रीकांत मणियार, संतोष चांडक, निलेश बाहेती, दिनेश सोमाणी, राजेश लड्डा, सुदर्शन लाहोटी, मोरेश्वर कोथमिरे, नानासाहेब शेरमाळे, ज्योती कासट, सरला आसावा तसेच संस्थेचे अंतर्गत लेखापरिक्षक सीए. जितेन्द्र लाहोटी, कायदे विषयक सल्लागार ज्योती मालपाणी आदींसह सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. व्यवस्थापक दिगंबर आडकी यांनी ताळेबंद व नफा-तोटा पत्रकाचे वाचन केले. जयप्रकाश भुतडा यांनी स्वागत व व्हा. चेअरमन योगेश रहातेकर यांनी आभार मानले.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 845
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

सोशल मीडियावर खोटे पसरवणाऱ्यांचा बंदोबस्त करा: माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचा इशारा; संगमनेरची आर्थिक समृद्धी टिकवण्यासाठी संघर्षाचे आवाहन

21/09/2026

राज्यात सरसकट दुष्काळ जाहीर करा; माजी कृषिमंत्री बाळासाहेब थोरात यांची मागणी, रेल्वेप्रश्नी लोकप्रतिनिधीच्या बालिश वक्तव्यावरही केले भाष्य

19/09/2026

थोरात कारखान्याचे ११ लाख मेट्रिक टनाचे गाळप उद्दिष्ट; बॉयलर अग्नीप्रदीपन समारंभात बाळासाहेब थोरात यांचे आवाहन

19/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

‘पैशाचा पाऊस’ पडणारच होता, पण…; अहिल्यानगरमध्ये ९२ लाखांच्या बनावट नोटांसह टोळी गजाआड!

By Annant Ppangarkar29/09/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – नागरिकांच्या अज्ञानाचा आणि अंधश्रद्धेचा फायदा घेत ‘पैशाचा पाऊस’ पाडण्याचे आमिष…

दुष्काळ, जिल्हा बँक आणि राजकारण : नाण्याच्या दोन बाजू एकत्र आल्या! पुढे काय…

29/09/2026

मंगळवार २९ सप्टेंबर — जाणून घ्या आजच्या दिवसाचे राशिभविष्य

28/09/2026

मुलांऐवजी पालकांसाठी संस्कार शिबिर घ्या! — डॉ. संजय कळमकर यांचा घणाघाती टोला; बालकुमार साहित्य संमेलनात रंगली वैचारिक चर्चा

28/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.