Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

सोमवार २८ सप्टेंबर — जाणून घ्या आजच्या दिवसाचे राशिभविष्य

28/09/2026

सहकाराची परंपरा जपण्यासाठी अहिल्यानगर जिल्हा बँक निवडणूक बिनविरोध करण्यासाठी सर्वपक्षीय नेत्यांचे एकमत, संगमनेरात पार पडली बैठक; या नेत्यांची होती उपस्थिती

27/09/2026

संगमनेर तालुक्यातील खंडेरायवाडी येथे टोमॅटो तोडण्याच्या वादातून हाणामारी, विनयभंग; १२ जणांवर गुन्हा दाखल

27/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » धनादेश अनादर प्रकरणी शिक्षा झालेल्या आणि अपिलात गेलेल्या आरोपीला न्यायालयाने दिले एक लाख रुपये भरण्याचे आदेश
न्यायालय

धनादेश अनादर प्रकरणी शिक्षा झालेल्या आणि अपिलात गेलेल्या आरोपीला न्यायालयाने दिले एक लाख रुपये भरण्याचे आदेश

Annant PpangarkarBy Annant Ppangarkar03/10/2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज

संगमनेर – भूखंडाचा व्यवहार न झाल्याने तक्रारदाराला दिलेले धनादेश वटला नाही म्हणून संगमनेरच्या अतिरिक्त मुख्य न्याय दंडाधिकाऱ्यांनी आरोपीला दोषी ठरवत एक वर्ष कारावासाची शिक्षा आणि पाच लाख रुपयांच्या दंड ठोठावला. मात्र या निर्णयाविरोधात अपिलात गेलेल्या आरोपीला वरिष्ठ न्यायालयाने दंडाच्या रकमेच्या पंचवीस टक्के एक लाख रुपये पंधरा दिवसांच्या आत न्यायालयात भरण्याचे आदेश दिले. त्यानंतर या खटल्याचे कामकाज चालणार आहे.

याने घेतली वरिष्ठ न्यायालयात धाव : प्रकाश प्रभू अरगडे (रा. सुकेवाडी, ता. संगमनेर) असे शिक्षा झालेल्या व वरिष्ठ न्यायालयात या निर्णया विरोधात अपील दाखल केलेल्या आरोपीचे नाव आहे.

या न्यायालयासमोर सुनावणी : अरगडे यांच्या विरोधात प्रशांत चंद्रकांत डहाळे यांनी धनादेश अनादर प्रकरणी संगमनेरच्या न्यायालयात खटला दाखल केला होता. या खटल्याची सुनावणी अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी डी. एम. गिरी यांच्यासमोर झाली होती. अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी डी. एम. गिरी यांनी दिलेल्या निर्णया विरोधात प्रकाश प्रभू अरगडे यांनी वरिष्ठ न्यायालयात अपील केले असून या अपिलाची सुनावणी जिल्हा अतिरिक्त सत्र न्यायाधीश डी. एस. घुमरे यांच्यासमोर होणार आहे. तत्पूर्वी न्यायाधीश घुमरे यांनी आरोपीला एक लाख रुपये न्यायालयात भरण्याचे आदेश दिले आहेत.

हे वकील पाहतायत काम : या प्रकरणातील मूळ तक्रारदार प्रशांत चंद्रकांत डहाळे याच्यावतीने ॲड. सैफुद्दीन शेख, ॲड. सीमा काळे-सातपुते तर अपील दाखल केलेल्या आरोपीच्या वतीने ॲड. श्रीकांत गोंगे काम पहात आहेत.

काय होते प्रकरण…

मजुरीचे काम करणाऱ्या प्रशांत डहाळे यांना प्लॉट खरेदी करावयाची होती. ही बाब ओळखीतून त्यांनी आरोपी प्रकाश प्रभू अरगडे याला सांगितली. अरगडे याने त्याच्या घरासमोर असलेल्या मीरा हॉटेलजवळ सुकेवाडी (ता. संगमनेर) येथे प्लॉट विक्रीसाठी उपलब्ध असल्याचे डहाळे यांना सांगितले होते. तसेच या संदर्भातील व्यवहार करून देण्याचे अरगडे याने कबूल केले होते. मात्र अनामत देऊन देखील या प्लॉटचा व्यवहार होऊ शकला नव्हता. त्यामुळे अनामत पोटी दिलेली रक्कम डहाळे यांनी अरगडे याच्याकडे मागितली होती. आरगडे यांनी दिलेला धनादेश बँकेत न वटल्याने डहाळे यांनी अरगडे यांच्या विरोधात न्यायालयात निगोशिएबल इन्स्ट्रुमेंटस अॅक्ट कलम १३८ प्रमाणे फिर्याद दाखल केली होती. यात डहाळे यांच्यावतीने ॲड. सैफुद्दीन शेख यांनी काम बघितले. न्यायाधीश डी. एम. गिरी यांनी आरोपी प्रकाश प्रभू अरगडे याला दोषी ठरवत एक वर्षाचा साधा कारावास आणि 5,00,000/- (रु. पाच लाख रुपये) ची भरपाई देण्याचा हुकूम केला. या निर्णयाविरोधात आरोपीने जिल्हा व सत्र न्यायालयात अपील केले.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 774
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

चेक अनादर प्रकरणात संगमनेर न्यायालयाने आरोपीस ठोठावला एक वर्षाचा कारावास; दोन लाखांची नुकसान भरपाई व ९ टक्के व्याजासह रक्कम देण्याचा निर्णय

23/09/2026

फायनान्सचा चेक बाऊन्स: अकोले तालुक्यातील कर्जदाराला ६ महिने कारावास आणि दुप्पट दंडाची शिक्षा

04/09/2026

संगमनेर सत्र न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल: प्राणघातक हल्ल्याप्रकरणी तिघा आरोपींची २ वर्षांची सक्तमजुरी कायम

02/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राशिभविष्य

सोमवार २८ सप्टेंबर — जाणून घ्या आजच्या दिवसाचे राशिभविष्य

By Annant Ppangarkar28/09/20260

आजचे राशिभविष्य  मेष- आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत उत्साहाचा आणि ऊर्जादायी राहील. कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या…

सहकाराची परंपरा जपण्यासाठी अहिल्यानगर जिल्हा बँक निवडणूक बिनविरोध करण्यासाठी सर्वपक्षीय नेत्यांचे एकमत, संगमनेरात पार पडली बैठक; या नेत्यांची होती उपस्थिती

27/09/2026

संगमनेर तालुक्यातील खंडेरायवाडी येथे टोमॅटो तोडण्याच्या वादातून हाणामारी, विनयभंग; १२ जणांवर गुन्हा दाखल

27/09/2026

रविवार विशेष लेख— साहिलचा मृत्यू; शिक्षणाच्या मंदिरातील प्रश्न आता टाळता येणार नाहीत!

27/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.