Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

सोमवार २८ सप्टेंबर — जाणून घ्या आजच्या दिवसाचे राशिभविष्य

28/09/2026

सहकाराची परंपरा जपण्यासाठी अहिल्यानगर जिल्हा बँक निवडणूक बिनविरोध करण्यासाठी सर्वपक्षीय नेत्यांचे एकमत, संगमनेरात पार पडली बैठक; या नेत्यांची होती उपस्थिती

27/09/2026

संगमनेर तालुक्यातील खंडेरायवाडी येथे टोमॅटो तोडण्याच्या वादातून हाणामारी, विनयभंग; १२ जणांवर गुन्हा दाखल

27/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » “दया, कुछ तो गडबड है!” न्यायालयाने अटकपूर्व जामीन नाकारल्यानंतरही दूधगंगा पतसंस्था प्रकरणातील मुख्य आरोपी भाऊसाहेब कुटेसह अन्य आरोपींपर्यंत पोलीस पोहोचेनात…
पत्रकारिता

“दया, कुछ तो गडबड है!” न्यायालयाने अटकपूर्व जामीन नाकारल्यानंतरही दूधगंगा पतसंस्था प्रकरणातील मुख्य आरोपी भाऊसाहेब कुटेसह अन्य आरोपींपर्यंत पोलीस पोहोचेनात…

दूधगंगेतील पांढरे बोके
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar03/10/2023Updated:03/10/2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

आरोपी औरंगाबाद खंडपीठात जाण्याच्या तयारीत, आर्थिक गुन्हे शाखेची भूमिका आरोपींच्या पथ्यावर

”सद्रक्षणाय खलनिग्रहणाय” हे महाराष्ट्र पोलिसांचे ब्रीदवाक्य. याचा विसर पडू देऊ नये, नागरिकांची अपेक्षा!

महाराष्ट्र संवाद न्यूज @ अनंत पांगारकर

शेकडो ठेवीदारांचे लक्ष लागलेल्या आणि तब्बल 81 कोटी रुपयांचा अपहार झालेल्या दूधगंगा नागरी सहकारी पतसंस्थेच्या राजकीय पुढारी असलेल्या चेअरमन भाऊसाहेब कुटे याच्यासह त्याच्या कुटुंबातील सदस्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज जिल्हा न्यायालयाने फेटाळून आठ दिवसांचा कालावधी उलटत आला आहे. शिवाय सलगपणे आलेल्या सुट्ट्यामुळे अद्याप आरोपी औरंगाबाद खंडपीठात पोहोचू शकलेले नाही अशा स्थितीत अहमदनगरच्या आर्थिक गुन्हे शाखेला या प्रकरणातील एकाही व्हाईट कॉलर क्रिमिनलपर्यंत अद्यापही पोहोचता आले नाही.

संगमनेर शहर पोलिसांकडून हा गुन्हा जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी अहमदनगरच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे तपासासाठी वर्ग केला आहे. मात्र यालादेखील तब्बल महिनाभराहून अधिक कालावधी उलटत असून दूधगंगा नागरी पतसंस्था अपहार प्रकरणात कोणतेही प्रगती होताना दिसत नाही. आरोपींचे राजकीय संबंध बघता तपास यंत्रणेवर वरिष्ठ स्तरावरूनच राजकीय दबाव असल्याच्या आणि जिल्हा न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळूनही भाऊसाहेब कुटेसह त्याच्या कुटुंबीयांना, देवळाली प्रवरा (राहुरी) येथील राजकीय प्रतिष्ठित कदम कुटुंबीय, औरंगाबाद येथील चेतन नागराज बाबा कपाटे उर्फ सुदर्शन महाराज अहमदनगर येथील संदीप दगडू जरे यांच्यापैकी एकाही आरोपीला जिल्हा पोलीस अद्याप पकडू शकले नसल्याने या चर्चेला पुष्टी मिळू लागली आहे.

अनेक गुन्ह्यांमध्ये कोणत्याही प्रकारचा पुरावा मागे नसताना देखील जिल्हा पोलीस दल आपले कौशल्य वापरून विविध गुन्ह्यातील आरोपींना निष्पन्न करत परराज्यातूनही त्यांना ताब्यात घेत गुन्ह्याची उकल करण्यात यशस्वी ठरलेले आहे. असे असताना या व्हाईट कॉलर क्रिमिनल्सचे नाव, पत्ते सर्व काही पोलीस दप्तरी उपलब्ध असताना देखील विशेष म्हणजे आरोपी कुटुंबीयांसह फरार असताना हेच कौतुकास पात्र ठरलेले पोलीस या राजकीय प्रतिष्ठित आरोपींपर्यंत का पोहोचत नाही असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.

25 सप्टेंबरला संगमनेरच्या जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाने भाऊसाहेब कुटे याच्यासह त्याच्या कुटुंबातील शकुंतला भाऊसाहेब कुटे, विमल भाऊसाहेब कुटे, सोनाली दादासाहेब कुटे, दादासाहेब भाऊसाहेब कुटे, संदीप भाऊसाहेब कुटे व अमोल भाऊसाहेब कुटे यांचे अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळले आहे. कुटे आता आपल्या परिवारासह औरंगाबाद खंडपीठात जामिनासाठी अर्ज दाखल करण्याच्या प्रयत्नात आहे.

याशिवाय छत्रपती संभाजीनगर येथील चेतन नागराजबाबा कपाटे उर्फ सुदर्शन महाराज, देवळाली प्रवरा (राहुरी) येथील कृष्णराव श्रीपतराव कदम श्रीमती प्रमिला कृष्णराव कदम अजित कृष्णराव कदम सुजित कृष्णराव कदम यांच्यासह अहमदनगर येथील संदीप दगडू जरे हे या गुन्ह्यातील प्रमुख आरोपी असून याशिवाय सहाय्य करणाऱ्या सहा जणांसह 21 जणांविरोधात संगमनेर शहर पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये 19 ऑगस्टला गुन्हा दाखल झालेला आहे.

मात्र सुरुवातीच्या दोन-तीन दिवसांचा कालावधी वगळता नंतर या गुन्ह्यात कोणतीही प्रगती झाली नसल्याचे दिसते. त्यामुळे याप्रकरणी छोट्या पडद्यावरील सीआयडी मालिकेतील “दया कुछ तो गडबड है!” या डायलॉगची चर्चा आता संगमनेरच्या सहकारात सुरू झाली आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,353
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

जिल्हाधिकारी साहेब एकदा रस्त्यावर पायी फिराच! संगमनेरातील अतिक्रमण हटाव मोहीम दिखावा की केवळ समाधान?

05/08/2026

संगमनेरमध्ये रेशनच्या धान्याचा काळा बाजार? पोलीस अन् पुरवठा विभागाच्या संशयास्पद भूमिकेने संभ्रम!

05/08/2026

अतिक्रमणाच्या नावाखाली संगमनेरात गरिबांवर बुलडोझर, धनदांडग्यांवर मेहेरनजर; ‘सिंघम’ बनलेल्या प्रशासनाविरोधात नागरिकांचा संतप्त सवाल

19/07/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राशिभविष्य

सोमवार २८ सप्टेंबर — जाणून घ्या आजच्या दिवसाचे राशिभविष्य

By Annant Ppangarkar28/09/20260

आजचे राशिभविष्य  मेष- आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत उत्साहाचा आणि ऊर्जादायी राहील. कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या…

सहकाराची परंपरा जपण्यासाठी अहिल्यानगर जिल्हा बँक निवडणूक बिनविरोध करण्यासाठी सर्वपक्षीय नेत्यांचे एकमत, संगमनेरात पार पडली बैठक; या नेत्यांची होती उपस्थिती

27/09/2026

संगमनेर तालुक्यातील खंडेरायवाडी येथे टोमॅटो तोडण्याच्या वादातून हाणामारी, विनयभंग; १२ जणांवर गुन्हा दाखल

27/09/2026

रविवार विशेष लेख— साहिलचा मृत्यू; शिक्षणाच्या मंदिरातील प्रश्न आता टाळता येणार नाहीत!

27/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.