Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

सोमवार २८ सप्टेंबर — जाणून घ्या आजच्या दिवसाचे राशिभविष्य

28/09/2026

सहकाराची परंपरा जपण्यासाठी अहिल्यानगर जिल्हा बँक निवडणूक बिनविरोध करण्यासाठी सर्वपक्षीय नेत्यांचे एकमत, संगमनेरात पार पडली बैठक; या नेत्यांची होती उपस्थिती

27/09/2026

संगमनेर तालुक्यातील खंडेरायवाडी येथे टोमॅटो तोडण्याच्या वादातून हाणामारी, विनयभंग; १२ जणांवर गुन्हा दाखल

27/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » जिल्हास्तरीय एरोबिक्समध्ये ‘ध्रुव’चा बोलबाला! ३१ पदकांची लयलुट; राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड
क्रिडा व कला

जिल्हास्तरीय एरोबिक्समध्ये ‘ध्रुव’चा बोलबाला! ३१ पदकांची लयलुट; राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड

ध्रुवचा आलेख उंचावणारा...
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar04/10/2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज

संगमनेर – अहमदनगरमध्ये झालेल्या अठराव्या जिल्हा स्पोर्ट्स व फिटनेस एरोबिक्स चॅम्पियनशीप स्पर्धेत संगमनेरच्या ध्रुव ग्लोबल स्कूलचा बोलबाला बघायला मिळाला. एरोबिक्सच्या फिटनेस आणि एरो या दोन्ही प्रकारात विविध गटात उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करतांना ध्रुवच्या खेळाडूंनी २५ सुवर्ण व प्रत्येकी ३ रौप्य व कांस्य पदकांसह एकूण ३१ पदकांची लयलुट केली. स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर या सर्व खेळाडूंची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे.

स्पर्धेतील १० ते १४ वर्षांखालील मुलांच्या स्पोर्ट्स एरोबिक्स गटात ध्रुव ग्लोबल स्कूलच्या ईशान उगले, शौर्य मणियार, रचित कासट यांनी सुवर्ण कामगिरी करतांना शाळेला तीन सुवर्ण पदके मिळवून दिली. रुद्र हुलवान, राजवीर आवारी आणि साईराज बालोडे यांनी रौप्य तर, ओम गणोरे, आलोक आरोटे व स्पर्श घुले यांना कांस्य पदके मिळाली. बारा वर्षांखालील मुलांच्या गटातही रचित आणि शौर्य यांनी सुवर्ण पदके मिळवतांना ध्रुव ग्लोबल स्कूलचा दबदबा कायम राखला.

अकरा वर्षांखाली मुलींच्या फिटनेस एरोबिक्स प्रकारात अनिका चांडक, गुंजल करवा, लब्धी कटारिया, रिद्धी दर्डा, त्रिषा गांधी, आराध्या जोशी आणि आलिया सोनकर यांनी सुवर्ण पदके मिळवित शाळेची सुवर्ण पताका फडकती ठेवली. याच प्रकारातील चौदा वर्षांखालील गटातही नंदिनी हुलवान, तनुश्री लहामगे, मानसी आहेर, आर्या तक्ते, मनस्वी कदम, आस्था जोशी, अस्मि वर्पे व अदिती काळे यांनी तर, एरो एरोबिक्स प्रकारात ओवी देशमुख, अक्षरा नवले, चार्वी मालुंजकर, आर्या आरोटे आणि रिद्धीमा सुलताने यांनी सुवर्ण पदकांची लयलुट केली.

जिल्हास्तरीय एरोबिक्स स्पर्धेत ध्रुव ग्लोबल स्कूलच्या स्पर्धकांनी सादर केलेल्या सर्वोत्कृष्ट प्रदर्शनाच्या जोरावर या सर्व खेळाडूंची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवडही करण्यात आली. एरोबिक्स असोसिएशनच्या पदाधिकार्‍यांच्या उपस्थितीत विजेत्या स्पर्धकांचा सन्मान करण्यात आला.

क्रीडा शिक्षक कुलदीप कागडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या सुवर्ण यशाबद्दल शाळेचे चेअरमन डॉ. संजय मालपाणी, व्हा. चेअरमन गिरीश मालपाणी व प्राचार्या अर्चना घोरपडे यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 584
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

जयहिंद कला महोत्सव: १२ हजार विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग; कौशल्यपूर्ण शिक्षणासाठी उपक्रम राज्यासाठी दिशादर्शक – माजी मंत्री बाळासाहेब थोरात

08/09/2026

संगमनेरात बालकला महोत्सवाचे उत्साहात उद्घाटन; बालगोपाळांच्या कलागुणांना मिळाले हक्काचे व्यासपीठ!

07/09/2026

संगमनेरात जयहिंद लोकचळवळीच्या वतीने उद्या आणि परवा बालकला महोत्सवाचे आयोजन; विविध उपक्रमांसह रंगभरण स्पर्धेची पर्वणी

05/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राशिभविष्य

सोमवार २८ सप्टेंबर — जाणून घ्या आजच्या दिवसाचे राशिभविष्य

By Annant Ppangarkar28/09/20260

आजचे राशिभविष्य  मेष- आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत उत्साहाचा आणि ऊर्जादायी राहील. कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या…

सहकाराची परंपरा जपण्यासाठी अहिल्यानगर जिल्हा बँक निवडणूक बिनविरोध करण्यासाठी सर्वपक्षीय नेत्यांचे एकमत, संगमनेरात पार पडली बैठक; या नेत्यांची होती उपस्थिती

27/09/2026

संगमनेर तालुक्यातील खंडेरायवाडी येथे टोमॅटो तोडण्याच्या वादातून हाणामारी, विनयभंग; १२ जणांवर गुन्हा दाखल

27/09/2026

रविवार विशेष लेख— साहिलचा मृत्यू; शिक्षणाच्या मंदिरातील प्रश्न आता टाळता येणार नाहीत!

27/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.