Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

सोमवार २८ सप्टेंबर — जाणून घ्या आजच्या दिवसाचे राशिभविष्य

28/09/2026

सहकाराची परंपरा जपण्यासाठी अहिल्यानगर जिल्हा बँक निवडणूक बिनविरोध करण्यासाठी सर्वपक्षीय नेत्यांचे एकमत, संगमनेरात पार पडली बैठक; या नेत्यांची होती उपस्थिती

27/09/2026

संगमनेर तालुक्यातील खंडेरायवाडी येथे टोमॅटो तोडण्याच्या वादातून हाणामारी, विनयभंग; १२ जणांवर गुन्हा दाखल

27/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » भाऊसाहेब कुटे, त्याचे कुटुंबीय व अन्य आरोपींना त्वरित अटक करावी, यासह विविध मागण्यांसाठी दूधगंगाचे ठेवीदार, खातेदार एकवटले… जन आक्रोश व उपोषण करणार!
आंदोलन

भाऊसाहेब कुटे, त्याचे कुटुंबीय व अन्य आरोपींना त्वरित अटक करावी, यासह विविध मागण्यांसाठी दूधगंगाचे ठेवीदार, खातेदार एकवटले… जन आक्रोश व उपोषण करणार!

आरोपींचा तपास लागेना, व्हाईट कॉलर क्रिमिनल्सपर्यंत पोलीस पोहोचणार का?
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar05/10/2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज

संगमनेर – दूधगंगा नागरी सहकारी पतसंस्था अपहार प्रकरणातील मुख्य आरोपी भाऊसाहेब कुटे आणि त्याच्या कुटुंबीयांचा जामीन न्यायालयाने फेटाळल्यामुळे त्यांना तात्काळ अटक केली जावी, यासह विविध मागण्यांसाठी दूधगंगा पतसंस्थेतील ठेवीदार व खातेदार संघर्ष समितीच्यावतीने जनआक्रोश व उपोषणाचा मार्ग अवलंबला जाणार आहे.

नेमके प्रकरण काय आहे : सुमारे 81 कोटी रुपयांच्या ठेवींचा अपहार केल्याप्रकरणी संस्थेचा चेअरमन आणि प्रतिष्ठित राजकारणी भाऊसाहेब कुटे याच्यासह तब्बल 21 जणांविरोधात ऑगस्ट महिन्यात संगमनेर शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. शहर पोलिसांकडे या गुन्ह्याचा तपास होता तोपर्यंत अपहार प्रकरणातील मुख्य आरोपी व्यवस्थापक भाऊसाहेब गुंजाळ यांच्यासह तब्बल पाच जणांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर लगेचच हा गुन्हा जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी नगरच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे तपासासाठी वर्ग केला.

पोलीस तपास आणि न्यायालयात काय घडले : नगरच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे तपास गेल्यानंतर अद्याप पर्यंत यात कोणतेही समाधानकारक प्रगती झाली नाही. दरम्यानच्या काळात मुख्य आरोपी भाऊसाहेब कुटे आणि त्याच्या कुटुंबीयांसह आणखी एका आरोपीने संगमनेरच्या जिल्हा अतिरिक्त सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी, कोठडीतील तिघा जणांनी जामीन मंजूर होण्यासाठी अर्ज दाखल केला होता. न्यायालयाने मुख्य आरोपी भाऊसाहेब कुटे आणि त्याच्या कुटुंबीयांचा जामीन अर्ज फेटाळून लावला. तर उर्वरित आरोपींना जामीन मंजूर केला. यामुळे तपास अधिकाऱ्यांना कुटे याच्यासह त्याच्या कुटुंबीयांना अटक करण्याचा मार्ग मोकळा झाला होता. मात्र गेल्या दहा दिवसात आर्थिक गुन्हे शाखा कोणत्याही आरोपीपर्यंत पोहोचू शकलेली नाही.

का करणार आंदोलन : आर्थिक गुन्हे शाखेच्या तपासाबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याने ठेवीदार आणि खातेदारांच्या संघर्ष समितीने आरोपींना अटक व्हावी या मागणीसाठी लढा देण्याचा निर्णय घेतला असून लवकरच जन आक्रोश व उपोषणाचा मार्ग अवलंबला जाणार आहे.

या आहेत मागण्या : चेअरमन भाऊसाहेब कुटे व त्याच्या कुटुंबीयांचा जामीन न्यायालयाने फेटाळल्यामुळे त्यांना 24 तासात तर उर्वरित आरोपींना त्वरित अटक करावी. 21 आरोपी, सर्व कर्जदार, सर्व जामीनदार यांच्या मालमत्ता जप्त करून लिलाव करावा व यासाठी मंत्रालयातून त्यासाठी अध्यादेश मिळावा. ठेवीदारांच्या ठेवी व्याजासह परत करण्यात याव्या. एमपीआयडी कायद्यातील तरतुदीनुसार कर्जदार व जामीनदार यांच्या मालमत्ता लिलावासाठी सक्षम अधिकाऱ्याची नेमणूक करावी. बोगस कर्ज वाटपाची चौकशी व्हावी. त्यातील गैरव्यवहार व सेटलमेंटचे चौकशी झाली पाहिजे. 2016 पूर्वीचे व 2021 नंतरचे सरकारी ऑडिट झाले पाहिजे. गैरव्यवहार व अपहार 81 कोटीचा असल्यामुळे केंद्रीय तपास यंत्रणे कडून तपास व्हावा. सहकार खाते, महसूल खाते, पोलीस खाते, सरकारी वकील व न्यायव्यवस्था यांचा योग्य ताळमेळ व समन्वय ठेवावा. प्रत्येक ठेवीदाराची एफआयआर दाखल करून घ्या. ठेवीदार व खातेदार यांना योग्य त्या न्यायाचे आदेश व्हावे, अशा मागण्या दूधगंगा पतसंस्था ठेवीदार व खातेदार संघर्ष समितीच्यावतीने करण्यात आल्या आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,736
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

प्रशासनाच्या नाकर्तेपणाविरोधात संगमनेर पेटले! संतप्त शेतकरी प्रांताधिकारी कार्यालयात घुसले आमदारांचे फ्लेक्स लावायला तुम्ही त्यांचे गुलाम आहात का? – माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांचा थेट सवाल यशवंतराव चव्हाण प्रशासकीय भवनाच्या पायऱ्यांवर ठिय्या आंदोलन; अखेर प्रांताधिकारी अरुण उंडे नमले, निवेदन स्वीकारले

22/09/2026

विजेचा खेळखंडोबा अन् पाणी पळवण्याचा डाव; संगमनेरमध्ये उद्या महाआक्रोश मोर्चा!

21/09/2026

वीज प्रश्नावर संगमनेर काँग्रेसचा ‘जनआक्रोश मोर्चा’; बाळासाहेब थोरातांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यात जोरदार तयारी

19/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राशिभविष्य

सोमवार २८ सप्टेंबर — जाणून घ्या आजच्या दिवसाचे राशिभविष्य

By Annant Ppangarkar28/09/20260

आजचे राशिभविष्य  मेष- आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत उत्साहाचा आणि ऊर्जादायी राहील. कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या…

सहकाराची परंपरा जपण्यासाठी अहिल्यानगर जिल्हा बँक निवडणूक बिनविरोध करण्यासाठी सर्वपक्षीय नेत्यांचे एकमत, संगमनेरात पार पडली बैठक; या नेत्यांची होती उपस्थिती

27/09/2026

संगमनेर तालुक्यातील खंडेरायवाडी येथे टोमॅटो तोडण्याच्या वादातून हाणामारी, विनयभंग; १२ जणांवर गुन्हा दाखल

27/09/2026

रविवार विशेष लेख— साहिलचा मृत्यू; शिक्षणाच्या मंदिरातील प्रश्न आता टाळता येणार नाहीत!

27/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.