Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

‘पैशाचा पाऊस’ पडणारच होता, पण…; अहिल्यानगरमध्ये ९२ लाखांच्या बनावट नोटांसह टोळी गजाआड!

29/09/2026

दुष्काळ, जिल्हा बँक आणि राजकारण : नाण्याच्या दोन बाजू एकत्र आल्या! पुढे काय…

29/09/2026

मंगळवार २९ सप्टेंबर — जाणून घ्या आजच्या दिवसाचे राशिभविष्य

28/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » निष्काळजीपणे दुचाकी चालवत पोलीस कर्मचाऱ्याला जखमी केले; न्यायालयाने दिली आरोपीला कोर्ट ऊठेपर्यंत व पंधरा हजार रुपये नुकसान भरपाईची शिक्षा
न्यायालय

निष्काळजीपणे दुचाकी चालवत पोलीस कर्मचाऱ्याला जखमी केले; न्यायालयाने दिली आरोपीला कोर्ट ऊठेपर्यंत व पंधरा हजार रुपये नुकसान भरपाईची शिक्षा

संगमनेरच्या जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाचा निकाल
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar06/10/2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज

संगमनेर – हिवरगाव पावसा टोल नाक्याजवळ वाहतूक नियमन करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याला जोराची धडक देऊन जखमी केल्याच्या कारणावरून आरोपीला संगमनेरच्या जिल्हा अतिरिक्त सत्र न्यायालयाने कोर्ट ऊठेपर्यंत व पंधरा हजार रुपये नुकसान भरपाई जखमी पोलीस कर्मचाऱ्याला देण्याची शिक्षा ठोठावली आहे.

अमोल मारुती शिंदे वय 29 वर्ष (रा. मनोली, ता. संगमनेर, जि. अहमदनगर) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. शिंदे याच्या विरोधात संगमनेर तालुका पोलीस ठाण्यातील पोलीस हेडकॉन्स्टेबल संजय बडे यांनी दिलेल्या तक्रारीवरून भारतीय दंड संहिता कलम 333, 353, 279, 337, 338, मोटार वाहन अधिनियम कलम 184, 134 (अ) (ब) सह 177 नुसार गुन्हा नोंदविण्यात आला होता.

फिर्यादी पोलीस हेडकॉन्स्टेबल संजय बडे हे 3 मार्च 2021 रोजी नासिक-पुणे महामार्गावर हिवरगाव पावसा टोल नाक्याजवळ पोलीस हेड कॉन्स्टेबल आहेर, उगले व शेंगाळ यांच्यासह वाहतूक नियमन करण्यासाठी व विनामास जाणाऱ्या लोकांवर कारवाई करण्यासाठी थांबले होते. हे सर्वजण टोल नाक्याजवळ रोडच्या कडेला उभे राहून वाहनांवर व नागरिकांवर कारवाई करत होते याच दरम्यान दुपारी बारा दहा वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी कारवाई करू नये व दंड लागू नये या हेतूने ट्रिपल सीट जाणाऱ्या आरोपीने आपल्या ताब्यातील दुचाकी भरधाव वेगाने नेत बडे यांना जोराची धडक दिली. या अपघातात फिर्यादी पोलीस कर्मचारी बडे व आरोपी शिंदे हे दोघेही जखमी झाले होते. त्यामुळे दोघांनाही उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले होते.

आरोपी शिंदे यांच्या विरोधात संगमनेरच्या न्यायालयात दोषारोपपत्र सादर करण्यात आले. जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश योगेश मनाठकर यांच्यासमोर या खटल्याची सुनावणी झाली. सरकार पक्षाच्या वतीने ॲड. मच्छिंद्र गवते यांनी तर आरोपी शिंदे याच्यावतीने ॲड. जी. एन. कापकर यांनी काम बघितले. सरकारी आणि आरोपीच्या वकिलांनी केलेला युक्तिवाद व साक्षीदारांच्या न्यायालयात महत्त्वाच्या ठरल्या.

आरोपीने फिर्यादीला केलेली जखम ही हेतू पुरस्कर नव्हती. फिर्यादीला त्याच्या शासकीय कामात अडथळा आणण्याचे हेतूने आरोपीने त्याला स्वतःच्या मोटरसायकलने धडक दिलेली नव्हती. उलट आरोपी निष्काळजीपणे मोटर सायकल चालवत होता त्यामुळे त्याची फिर्यादीला धडक बसली. असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवत आरोपीचे वय लक्षात घेत घटना कोणत्या कारणामुळे घडली याचा विचार केला असल्याचे स्पष्ट करत ही घटना केवळ निष्काळजीपणे वाहन चालविण्यामुळे झाल्याचे स्पष्ट करत आरोपीला भारतीय दंड विधान संहिता कलम 279 337 व मोटार वाहन अधिनियम 184 मध्ये नमूद होण्यासाठी कोर्ट उठेपर्यंत (till rising of the court) शिक्षा सुनावली तसेच फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम 357 (3) प्रमाणे पंधरा हजार रुपये नुकसान भरपाई जखमी फिर्यादी पोलीस कर्मचारी संजय बडे यांना देण्याचे आदेश आरोपी अमोल शिंदे याला दिले आहे. तर उर्वरित गुन्ह्यातून आरोपीला मुक्त करण्यात आले आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,012
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेर एम.डी. ड्रग्ज रॅकेटचे धागेदोर कोणापर्यंत? जिल्हा न्यायालयात नेमकं काय घडलं… आता एक नव्हे तर चार आरोपी

28/09/2026

चेक अनादर प्रकरणात संगमनेर न्यायालयाने आरोपीस ठोठावला एक वर्षाचा कारावास; दोन लाखांची नुकसान भरपाई व ९ टक्के व्याजासह रक्कम देण्याचा निर्णय

23/09/2026

फायनान्सचा चेक बाऊन्स: अकोले तालुक्यातील कर्जदाराला ६ महिने कारावास आणि दुप्पट दंडाची शिक्षा

04/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

‘पैशाचा पाऊस’ पडणारच होता, पण…; अहिल्यानगरमध्ये ९२ लाखांच्या बनावट नोटांसह टोळी गजाआड!

By Annant Ppangarkar29/09/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – नागरिकांच्या अज्ञानाचा आणि अंधश्रद्धेचा फायदा घेत ‘पैशाचा पाऊस’ पाडण्याचे आमिष…

दुष्काळ, जिल्हा बँक आणि राजकारण : नाण्याच्या दोन बाजू एकत्र आल्या! पुढे काय…

29/09/2026

मंगळवार २९ सप्टेंबर — जाणून घ्या आजच्या दिवसाचे राशिभविष्य

28/09/2026

मुलांऐवजी पालकांसाठी संस्कार शिबिर घ्या! — डॉ. संजय कळमकर यांचा घणाघाती टोला; बालकुमार साहित्य संमेलनात रंगली वैचारिक चर्चा

28/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.