Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

‘पैशाचा पाऊस’ पडणारच होता, पण…; अहिल्यानगरमध्ये ९२ लाखांच्या बनावट नोटांसह टोळी गजाआड!

29/09/2026

दुष्काळ, जिल्हा बँक आणि राजकारण : नाण्याच्या दोन बाजू एकत्र आल्या! पुढे काय…

29/09/2026

मंगळवार २९ सप्टेंबर — जाणून घ्या आजच्या दिवसाचे राशिभविष्य

28/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » अमृतवाहिनी बँकेला राष्ट्रीय स्तरावरील सर्वोत्कृष्ट बँकेचा पुरस्कार
शेती व सहकार

अमृतवाहिनी बँकेला राष्ट्रीय स्तरावरील सर्वोत्कृष्ट बँकेचा पुरस्कार

Annant PpangarkarBy Annant Ppangarkar08/10/2023No Comments3 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज 

संगमनेर – काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते तथा माजी महसूल व कृषी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकऱ्यांची आर्थिक कामधेनु असलेल्या सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात अमृतवाहिनी सहकारी बँकेस राष्ट्रीय स्तरावरील बँको या संस्थेचा ब्ल्यू रिबन सर्वोत्कृष्ट बँक पुरस्कार दमण येथील शानदार कार्यक्रमात प्रदान करण्यात आला

देल्टीन रिसॉर्ट दमन या ठिकाणी झालेल्या कार्यक्रमामध्ये रिझर्व बँक ऑफ इंडियाचे निवृत्त चीफ जनरल मॅनेजर पी. के. अरोरा यांच्या हस्ते पुरस्कार अमृतवाहिनी बँकेचे चेअरमन सुधाकर जोशी, व्हाईस चेअरमन ॲड. नानासाहेब शिंदे, संचालक राजेंद्र काजळे, श्रीकांत गिरी तसेच बँकेचे सीईओ अंबादास वाणी यांनी स्वीकारला.

सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या आदर्श शिस्त व विचारांवर बँकेची वाटचाल सुरू असून काँग्रेसचे वरिष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली बँकेने सातत्याने ऑडिटचा ‘अ’ दर्जा मिळून शेतकरी व सर्वसामान्य मदत केली आहे. अमृतवाहिनी बँकेने नुकताच दुग्धविकास कर्ज योजनेअंतर्गत सर्वसामान्यांच्या जीवनामध्ये आनंद पुरवण्याचे काम सुरू केले असून छोटे शेतकरी व व्यावसायिक यांच्यासाठी ही विविध योजना लागू केल्या आहेत. 500 दूध उत्पादकांना विनातारण दीड लाखापर्यंतचे कर्ज उपलब्ध करून दिले जात आहे. तसेच कारखान्याच्या ऊस तोडणी कामगार व ऊस वाहतुकीसाठी 30 कोटी रुपयांचे कर्ज बँकेने प्रथमच उपलब्ध करून दिले आहे.

याचबरोबर सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त नव्याने आश्वी बु. व संगमनेर खुर्द येथील शेतकी संघ पेट्रोल पंपाजवळ बँकेची शाखा सुरू केली जाणार आहे. काळानुरूप केलेले बदल बँकेला लोकाभिमुख करण्याचा प्रयत्न यासह या बँकेचे संगणकीय कामकाज, एटीएम, नवीन अद्यावत सुविधांसह असलेली अमृतनगर येथील मुख्य शाखा व संगमनेर मार्केट यार्ड, नेहरू चौक, तळेगाव, घारगाव, साकुर या ठिकाणीही विविध शाखा कार्यरत आहेत. या सर्व शाखांचे नूतनीकरण व आधुनिकीकरणाचे काम करण्यात आले असून नव्याने कॅन्सरतज्ञ डॉ. जयश्रीताई थोरात यांच्या हस्ते मुख्य शाखेत अत्याधुनिक लॉकरची सुविधा व्यवस्था कार्यान्वित झाली आहे.

सभासद, शेतकरी व नागरिकांचा मोठा विश्वास या बँकेने संपादन केला आहे . ग्रामीण भागात असूनही पाचशे कोटींची ठेव असलेल्या या बँकेने केलेल्या उल्लेखनीय कामाबद्दल बँको या राष्ट्रीय स्तरीय संस्थेने सन 2022- 23 चा ब्ल्यू रिबन सर्वोत्कृष्ट सहकारी बँक पुरस्काराने सन्मानित केले आहे.यापूर्वीही अमृतवाहीणी बँकेला 2022 मध्ये हा पुरस्कार मिळाला होता.

या पुरस्कारानंतर सुधाकर जोशी म्हणाले की, आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेरच्या अमृत उद्योग समूहातील विविध सहकारी संस्थांची वाटचाल सुरू असून या संस्था राज्यातील सहकारासाठी आदर्शवत ठरले आहेत. हा पुरस्कार सांघिक कामाचा असून यामध्ये बँकेचे सर्व कर्मचारी, अधिकारी, सभासद ठेवीदार कर्जदार व हितचिंतक या सर्वांचा समावेश असल्याचे ते म्हणाले.

बँकेला मिळालेल्या या पुरस्काराबद्दल चेअरमन, व्हाईस चेअरमन व सर्व संचालक मंडळ, मुख्य कार्यकारी अधिकारी अंबादास वाणी, अधिकारी, कर्मचारी यांचे काँग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरात, मा. आ. डॉ. सुधीर तांबे, आमदार सत्यजित तांबे, बाजीराव खेमनर, माधवराव कानवडे, दुर्गाताई तांबे, कॅन्सरतज्ञ डॉ. जयश्रीताई थोरात, रणजीतसिंह देशमुख, बाबा ओहोळ, शंकर खेमनर, इंद्रजीत थोरात, रामहरी कातोरे, हौशीराम सोनवणे, मिलिंद कानवडे, सोमेश्वर दिवटे, राजेश मालपाणी आदींसह विविध पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 809
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

सोशल मीडियावर खोटे पसरवणाऱ्यांचा बंदोबस्त करा: माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचा इशारा; संगमनेरची आर्थिक समृद्धी टिकवण्यासाठी संघर्षाचे आवाहन

21/09/2026

राज्यात सरसकट दुष्काळ जाहीर करा; माजी कृषिमंत्री बाळासाहेब थोरात यांची मागणी, रेल्वेप्रश्नी लोकप्रतिनिधीच्या बालिश वक्तव्यावरही केले भाष्य

19/09/2026

थोरात कारखान्याचे ११ लाख मेट्रिक टनाचे गाळप उद्दिष्ट; बॉयलर अग्नीप्रदीपन समारंभात बाळासाहेब थोरात यांचे आवाहन

19/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

‘पैशाचा पाऊस’ पडणारच होता, पण…; अहिल्यानगरमध्ये ९२ लाखांच्या बनावट नोटांसह टोळी गजाआड!

By Annant Ppangarkar29/09/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – नागरिकांच्या अज्ञानाचा आणि अंधश्रद्धेचा फायदा घेत ‘पैशाचा पाऊस’ पाडण्याचे आमिष…

दुष्काळ, जिल्हा बँक आणि राजकारण : नाण्याच्या दोन बाजू एकत्र आल्या! पुढे काय…

29/09/2026

मंगळवार २९ सप्टेंबर — जाणून घ्या आजच्या दिवसाचे राशिभविष्य

28/09/2026

मुलांऐवजी पालकांसाठी संस्कार शिबिर घ्या! — डॉ. संजय कळमकर यांचा घणाघाती टोला; बालकुमार साहित्य संमेलनात रंगली वैचारिक चर्चा

28/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.