Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

माहिती अधिकाराचे प्रणेते अण्णा हजारे यांची मुख्य माहिती आयुक्त राहुल पांडे यांनी घेतली सदिच्छा भेट; प्रकृतीची केली विचारपूस

03/09/2026

अहिल्यानगरमध्ये ४० नशेची इंजेक्शन्स जप्त; व्यायामपटूंकडून वापराचा संशय, तिघांना अटक

03/09/2026

अहिल्यानगर जिल्ह्यात अवैध गुटखा विक्रीवर स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; ५.३० लाखांचा मुद्देमाल जप्त, ११ जणांवर गुन्हे दाखल

03/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » अपंग, विधवा, परित्यक्त्या, ज्येष्ठ नागरिकांच्या योजनांचा उडाला बोजवारा, चार महिन्यापासून अनुदानच नाही! शेजारच्या तालुक्यांमध्ये गुरगुर करण्यापेक्षा महसूल मंत्र्यांनी आपल्याच तालुक्यातील योजनांचा आढावा घ्यावा : ॲड. पंकज लोंढे
राजकारण

अपंग, विधवा, परित्यक्त्या, ज्येष्ठ नागरिकांच्या योजनांचा उडाला बोजवारा, चार महिन्यापासून अनुदानच नाही! शेजारच्या तालुक्यांमध्ये गुरगुर करण्यापेक्षा महसूल मंत्र्यांनी आपल्याच तालुक्यातील योजनांचा आढावा घ्यावा : ॲड. पंकज लोंढे

महसूल मंत्र्यांच्याच तालुक्यातील या अवस्थेविरोधात दाद मागायची तरी कोणाकडे?
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar08/10/2023Updated:08/10/2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज

राहाता : शिर्डी विधानसभा मतदार संघात शासकीय योजनांचा पुरता बोजवारा उडालेला आहे. ज्येष्ठ नागरिक, अपंग, विधवा, परित्यक्ता यांच्यासह विविध योजनांच्या लाभार्थ्यांना गेल्या चार महिन्यांपासून अनुदान मिळालेले नाही, पालकमंत्र्यांनी शेजारच्या तालुक्यात जाऊन गुरगुर करण्यापेक्षा राहता तालुक्यातल्या मूलभूत प्रश्नांकडे लक्ष द्यावे, असे मत राहाता तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अॅड. पंकज लोंढे यांनी व्यक्त केले.

राहाता तालुका काँग्रेस कमिटीच्यावतीने शासकीय योजना मिळविण्यात लाभार्थ्यांना येत असलेल्या अडचणी संदर्भात दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात लोंढे यांनी भूमिका मांडली.

लोंढे म्हणाले, पालकमंत्री नेतृत्व करत असलेल्या अहमदनगर जिल्ह्यात विविध शासकीय योजनांचा बोजवारा उडालेला आहे, त्याचा मनस्ताप हकनाक लाभार्थ्यांना सहन करावा लागतो. संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ योजना, इंदिरा गांधी वृद्धकाळ योजना, ज्येष्ठ नागरिक योजना, विधवा, परितक्त्या, अपंग, ज्येष्ठ नागरिक या योजनांचे अनुदान गेल्या चार महिन्यांपासून ठप्प आहे.

योजनेचे लाभार्थी बँकेत चकरा मारतात मात्र त्यांना तारीख पे तारीख दिली जाते. बँकेत चकरा मारून लाभार्थी वैतागलेले आहेत. आपला कामधंदा सोडून लोकांना बँकेत जावे लागते. ज्येष्ठ नागरिक आणि अपंगांची यामध्ये प्रचंड हाल होत आहेत.

मात्र राहता तालुक्याचे लोकप्रतिनिधी आणि जिल्ह्याचे पालकमंत्री हे सध्या जिरवा-जिरवीच्या राजकारणात व्यस्त आहेत. शेजारी असलेल्या संगमनेर तालुक्यात जाऊन तेथील कामे बंद पाडण्यात त्यांना आनंद होत आहे. ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांचे व्यक्तिमत्व संपूर्ण राज्याला माहित आहे आणि राहत्याच्या नेतृत्वालाही संपूर्ण राज्य ओळखून आहे. त्यांनी संगमनेरमध्ये सुरू असलेल्या चांगल्या कामात किती अडकाठ्या आणल्या तरी तेथील सुज्ञ जनता हुशार आहे. मात्र या सगळ्या कुरघोड्यांमध्ये मंत्री महोदयांचे स्वतःच्या तालुक्याकडे अक्षम्य दुर्लक्ष झाल्याचे दिसते.

शासकीय योजनांच्या लाभार्थ्यांची हेळसांड सुरू आहे आणि दुसरीकडे हे स्वतः गतिमान सरकारचे मंत्री म्हणून मिरवत आहे. शासकीय योजनांचे अनुदान तातडीने लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा झाले नाही तर आम्हाला गतिमान सरकार आणि लोकप्रतिनिधी यांच्या विरोधात आंदोलन करावे लागेल असाही इशारा लोंढे यांनी दिला.

दाद कुणाकडे मागायची?

राहाता तालुक्याचे लोकप्रतिनिधी हे पालकमंत्रीही आहे आणि महसूलमंत्री देखील आहेत. त्यांच्याच तालुक्यात अनुदानासाठी लाभार्थ्यांची हेळसांड होत असेल, चार चार महिने अनुदान मिळत नसेल तर, मग दाद कुणाकडे मागायची असा संतप्त सवाल लोंढे यांनी उपस्थित केला.

…अन्यथा आंदोलन

चार महिन्यांपासून रखडलेले शासकीय योजनांच्या अनुदान लाभार्थ्यांच्या खात्यावर तातडीने जमा झाले नाही तर आम्हाला आंदोलन करण्याशिवाय पर्याय नाही. अपंग आणि ज्येष्ठ नागरिक यांचा सरकारने अधिक अंत पाहू नये. प्रशासनाला सूचना देऊन या योजनेच्या अंमलबजावणीतील अडथळे दूर करावे असेही लोंढे म्हणाले.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 757
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

आमदार अमोल खताळ यांच्या सूचनेनंतर लोहारे-कासारे पाझर तलावातून पाण्याचा विसर्ग सुरू

30/08/2026

संगमनेर पालिकेचा अनोखा उपक्रम! १ ते २५ सप्टेंबरदरम्यान होणार प्रभागनिहाय बैठका; नगराध्यक्ष डॉ. मैथिली तांबे यांच्या पुढाकाराने नागरिकांच्या प्रश्नांना थेट व्यासपीठ

29/08/2026

संगमनेरकरांच्या अभिप्रेत असलेलेच छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य-दिव्य स्मारक उभारणार! “दीड वर्षे खाती हातात असूनही वाढीव जागेचा प्रश्न सोडवला नाही; आता स्मारकाच्या कामात खोडा घालून संगमनेरकरांची दिशाभूल करू नका”

28/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
महाराष्ट्र संवाद विशेष

माहिती अधिकाराचे प्रणेते अण्णा हजारे यांची मुख्य माहिती आयुक्त राहुल पांडे यांनी घेतली सदिच्छा भेट; प्रकृतीची केली विचारपूस

By Annant Ppangarkar03/09/20260

Annant Ppangarkar मुंबई: माहिती अधिकाराचे प्रणेते आणि ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे हे सध्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे…

अहिल्यानगरमध्ये ४० नशेची इंजेक्शन्स जप्त; व्यायामपटूंकडून वापराचा संशय, तिघांना अटक

03/09/2026

अहिल्यानगर जिल्ह्यात अवैध गुटखा विक्रीवर स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; ५.३० लाखांचा मुद्देमाल जप्त, ११ जणांवर गुन्हे दाखल

03/09/2026

अवैध वाळू वाहतूक करणारा हायवा जप्त, २५.६० लाखांचा मुद्देमाल हस्तगत

03/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.