Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

मुलांऐवजी पालकांसाठी संस्कार शिबिर घ्या! — डॉ. संजय कळमकर यांचा घणाघाती टोला; बालकुमार साहित्य संमेलनात रंगली वैचारिक चर्चा

28/09/2026

संगमनेर एम.डी. ड्रग्ज रॅकेटचे धागेदोर कोणापर्यंत? जिल्हा न्यायालयात नेमकं काय घडलं… आता एक नव्हे तर चार आरोपी

28/09/2026

१०० वे पुण्यात, तर १०१ वे साहित्य संमेलन संगमनेरमध्ये, दुर्गाताई तांबे यांची मोठी घोषणा!

28/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » धक्कादायक… संजय गांधी निराधार अनुदान योजनेसाठी महसूल मंत्र्यांच्या अहमदनगर जिल्ह्याला इतिहासात प्रथमत:च मिळाला एवढा निधी!
पत्रकारिता

धक्कादायक… संजय गांधी निराधार अनुदान योजनेसाठी महसूल मंत्र्यांच्या अहमदनगर जिल्ह्याला इतिहासात प्रथमत:च मिळाला एवढा निधी!

आपलं सामान्यांचे सरकार, गतिमान सरकारने या योजनेसाठी राज्याला वितरित केले साडेचारशे कोटी
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar08/10/2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज @ अनंत पांगारकर

सन 2023-24 या आर्थिक वर्षांमध्ये सर्वसाधारण लाभार्थ्यांकरिता संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या अंमलबजावणीसाठी राज्य सरकारने साडेचारशे कोटीचा निधी जिल्हाधिकाऱ्यांकडे वितरित केला आहे. या निधीतून लाभार्थ्यांना अनुदान वाटप केले जाणार असले तरी राज्यातील अहमदनगर जिल्हा आणि मुंबई शहराच्या वाट्याला एक रुपयाचाही निधी वितरित करण्यात आलेला नाही. राज्याच्या महसूलमंत्र्यांच्या जिल्ह्यातच या योजनेचे लाभार्थी निधीपासून वंचित राहण्याची चिन्हे निर्माण झाली आहे.

विधानसभा कामकाजा दरम्यान 22 ऑगस्टला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना तातडीने वेळेवर पैसे देण्याचे निर्देश दिले गेले असल्याचे सांगितले होते. त्यानंतर आता या संदर्भात शासन निर्णय झाला असून या निधीचे वाटप करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. मात्र राज्यातील निधी न मिळालेला मुंबई शहरा पाठोपाठ अहमदनगर हा एकमेव जिल्हा आहे.

#विधानसभाकामकाज
संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना तातडीने वेळेवर पैसे देण्याचे निर्देश देण्यात येतील- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे pic.twitter.com/yoBYH32WrD

— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) August 22, 2022

राज्याच्या महसूल मंत्रीपदाची धुरा नगर जिल्ह्यातील भाजपचे मातब्बर नेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे आहे. ते पालकमंत्री असलेल्या जिल्ह्यालाच शासनाने ठेंगा दाखविला असून संजय गांधी निराधार अनुदान योजनेत राज्यात वितरित करण्यात आलेल्या साडेचारशे कोटीच्या निधीमध्ये अहमदनगर जिल्ह्याच्या वाट्याला एक रुपयाचाही निधी मिळालेला नाही. संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील सर्वसाधारण लाभार्थ्यांसाठी सन 2023-24 आर्थिक वर्षाकरिता अनुदानाचे वितरणासंबंधीचा शासन निर्णय 6 ऑक्टोंबरला काढण्यात आला आहे.

संजय गांधी निराधार योजनेसाठी नाशिक विभागाला 265260290 रुपयांचा निधी प्राप्त झाला असून हा सर्व निधी नाशिक विभागातील अहमदनगर वगळता नाशिक, धुळे, जळगाव व नंदुरबार जिल्ह्यासाठी वितरित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

तर श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेचाही 765 कोटी रुपयांचा निधी राज्यातील जिल्हाधिकाऱ्यांकडे वर्ग करण्यात आला आहे. यात नाशिक विभागाच्या वाट्याला 883673200 रुपये आले आहेत. यापैकी 336433800 रुपये नगर जिल्ह्याच्या वाट्याला आले आहेत. यातून श्रावण बाळ योजनेचा लाभार्थ्यांना लाभ दिला जाईल.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 927
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

जिल्हाधिकारी साहेब एकदा रस्त्यावर पायी फिराच! संगमनेरातील अतिक्रमण हटाव मोहीम दिखावा की केवळ समाधान?

05/08/2026

संगमनेरमध्ये रेशनच्या धान्याचा काळा बाजार? पोलीस अन् पुरवठा विभागाच्या संशयास्पद भूमिकेने संभ्रम!

05/08/2026

अतिक्रमणाच्या नावाखाली संगमनेरात गरिबांवर बुलडोझर, धनदांडग्यांवर मेहेरनजर; ‘सिंघम’ बनलेल्या प्रशासनाविरोधात नागरिकांचा संतप्त सवाल

19/07/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
महाराष्ट्र संवाद विशेष

मुलांऐवजी पालकांसाठी संस्कार शिबिर घ्या! — डॉ. संजय कळमकर यांचा घणाघाती टोला; बालकुमार साहित्य संमेलनात रंगली वैचारिक चर्चा

By Annant Ppangarkar28/09/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- “सध्याच्या डिजिटल युगात अन्न, वस्त्र आणि निवारा यासोबत ‘मोबाईल डेटा’ ही…

संगमनेर एम.डी. ड्रग्ज रॅकेटचे धागेदोर कोणापर्यंत? जिल्हा न्यायालयात नेमकं काय घडलं… आता एक नव्हे तर चार आरोपी

28/09/2026

१०० वे पुण्यात, तर १०१ वे साहित्य संमेलन संगमनेरमध्ये, दुर्गाताई तांबे यांची मोठी घोषणा!

28/09/2026

कांदा व्यापाऱ्यावर कोयत्याने वार करणारा फरार आरोपी अखेर दोन वर्षानंतर एलसीबीच्या जाळ्यात

28/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.