Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

माहिती अधिकाराचे प्रणेते अण्णा हजारे यांची मुख्य माहिती आयुक्त राहुल पांडे यांनी घेतली सदिच्छा भेट; प्रकृतीची केली विचारपूस

03/09/2026

अहिल्यानगरमध्ये ४० नशेची इंजेक्शन्स जप्त; व्यायामपटूंकडून वापराचा संशय, तिघांना अटक

03/09/2026

अहिल्यानगर जिल्ह्यात अवैध गुटखा विक्रीवर स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; ५.३० लाखांचा मुद्देमाल जप्त, ११ जणांवर गुन्हे दाखल

03/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » कॉटेज रुग्णालय बंद पाडणाऱ्यांना मंत्र्यांचा राजीनामा मागण्याचा अधिकार नाही : माजी उपनगराध्यक्ष जावेद जहागिरदार
राजकारण

कॉटेज रुग्णालय बंद पाडणाऱ्यांना मंत्र्यांचा राजीनामा मागण्याचा अधिकार नाही : माजी उपनगराध्यक्ष जावेद जहागिरदार

आगामी काळात विखे- थोरात समर्थकांमध्ये संघर्ष वाढणार
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar09/10/2023Updated:09/10/2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज

संगमनेर – सर्वसामान्य माणसाकरीता उपलब्ध असलेले नगरपालीकेचे कॉटेज रुग्णालय ज्यांनी बंद पाडले, ज्यांना अडीच वर्षाच्या मंत्रीपदाच्या कार्यकाळात उपजिल्हा रुग्णालय तालुक्यात सुरू करता आले नाही, त्यांना महायूती सरकारमधील मंत्र्यांचा राजीनामा मागण्याचा कोणताही अधीकार नाही. तालुक्यात सर्व सुवीधांनी परीपूर्ण अशा रुग्णालयांची उभारणी करण्यात आलेल्या अपयशाची जबाबदारी स्वीकारुन आ. थोरात यांनीच आधी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी माजी उपनगराध्यक्ष, भारतीय जनता पक्षाचे नेते जावेद जहागिरदार यांनी केली आहे.

माजी मंत्री आ. बाळासाहेब थोरात यांच्या मागणीचा समाचार घेताना, जावेद जहागिरदार यांनी पत्रकात म्हटले आहे की, अनेक वर्षे सता असताना तालुक्याच्या आरोग्य व्यवस्थेचा बोजवारा ज्यांच्या हलगर्जीपणाने उडाला त्यांनी राज्याच्या मंत्रीमंडळाच्या राजीनाम्याची मागणी करावी याचे आश्चर्य वाटते.

संगमनेर नगरपालीकेच्या अंतर्गत सुरू असलेले कॉटेज रुग्णालय हे शहर आणि तालुक्यातील जनतेकरीता मोठा आधार होते. परंतू स्वत:च्या बगलबच्च्यांची रूग्णालय चालावी, म्हणून ज्यांनी कॉटेज रुग्णालय बंद करण्यात धन्यता मानली, त्यांना स्वत:ला विकासपुरुष म्हणवून घेण्याचा तसेच सुंस्कृतपणाच्या आणि विकासाच्या गप्पा मारण्याचाही कोणाताही अधिकार नसल्याचा टोला जाहागिरदार यांनी लगावला.

कोव्हीड संकटात संगमनेर तालुक्यात सर्वाधिक खासगी रुग्णालयांना कोव्हीड सेंटरची मान्यता कोणी दिली. राज्यात त्यावेळेस कोणाचे सरकार होते. हेदेखील तालुक्याने नव्हे तर जिल्हयानेही पाहीले आहे. सरकारी रुग्णालयात सुविधा नसल्याने सामान्य माणसाचे कसे हाल आणि अर्थिक लूट झाली हे सर्वश्रृत आहे. यासर्व परिस्थितीत मंत्री म्हणून आ. बाळासाहेब थोरात यांनी फक्त बैठका घेण्यात धन्यता मानली. सामान्य माणसाची अर्थिक लूट करणाऱ्या एकाही रुग्णालयावर कारवाई करण्याची हिंमत ज्यांनी दाखवली नाही, त्यांनी महायुती सरकारकडे श्वेतपत्रिका काढण्याची मागणी करावी, हे अतीशय हास्यास्पद असल्याचे जहागिरदार यांनी स्पष्ट केले.

गेली चाळीस वर्ष नगरपालीकेची आणि तालुक्याची सर्व सतास्थाने आ. थोरातांच्या ताब्यात आहे. परंतू एकही सरकारी रुग्णालय शहर आणी तालुक्यात सर्व सुवीधांनी परीपूर्ण उभारले न गेल्याने सामान्य माणसाची मोठी गैरसोय झाली असल्याकडे आ. थोरात सोयीस्करपणे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप जहागिरदार यांनी केला आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 888
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

आमदार अमोल खताळ यांच्या सूचनेनंतर लोहारे-कासारे पाझर तलावातून पाण्याचा विसर्ग सुरू

30/08/2026

संगमनेर पालिकेचा अनोखा उपक्रम! १ ते २५ सप्टेंबरदरम्यान होणार प्रभागनिहाय बैठका; नगराध्यक्ष डॉ. मैथिली तांबे यांच्या पुढाकाराने नागरिकांच्या प्रश्नांना थेट व्यासपीठ

29/08/2026

संगमनेरकरांच्या अभिप्रेत असलेलेच छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य-दिव्य स्मारक उभारणार! “दीड वर्षे खाती हातात असूनही वाढीव जागेचा प्रश्न सोडवला नाही; आता स्मारकाच्या कामात खोडा घालून संगमनेरकरांची दिशाभूल करू नका”

28/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
महाराष्ट्र संवाद विशेष

माहिती अधिकाराचे प्रणेते अण्णा हजारे यांची मुख्य माहिती आयुक्त राहुल पांडे यांनी घेतली सदिच्छा भेट; प्रकृतीची केली विचारपूस

By Annant Ppangarkar03/09/20260

Annant Ppangarkar मुंबई: माहिती अधिकाराचे प्रणेते आणि ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे हे सध्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे…

अहिल्यानगरमध्ये ४० नशेची इंजेक्शन्स जप्त; व्यायामपटूंकडून वापराचा संशय, तिघांना अटक

03/09/2026

अहिल्यानगर जिल्ह्यात अवैध गुटखा विक्रीवर स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; ५.३० लाखांचा मुद्देमाल जप्त, ११ जणांवर गुन्हे दाखल

03/09/2026

अवैध वाळू वाहतूक करणारा हायवा जप्त, २५.६० लाखांचा मुद्देमाल हस्तगत

03/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.