Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

मालपाणी बजाज शोरूममधील मारहाण प्रकरण: आरोपींच्या अटकेसाठी संगमनेर प्रशासकीय भवनावर मोर्चा; तीव्र आंदोलनाचा इशारा

June 6, 2026

आज शनिवार, ६ जून २०२६ – कसा असेल तुमचा आजचा दिवस जाणून घ्या

June 6, 2026

वृक्ष संवर्धन ही काळाची गरज; तापमान वाढ रोखण्यासाठी प्रत्येकाने दोन झाडे लावावीत: माजी मंत्री बाळासाहेब थोरात

June 5, 2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » मुख्यमंत्री शिंदेंना पत्र लिहीत माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरातांनी का केली राज्याच्या आरोग्य व्यवस्थेची श्वेतपत्रिका काढण्याची मागणी! जाणून घ्या कारणे…
राजकारण

मुख्यमंत्री शिंदेंना पत्र लिहीत माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरातांनी का केली राज्याच्या आरोग्य व्यवस्थेची श्वेतपत्रिका काढण्याची मागणी! जाणून घ्या कारणे…

राज्यात आरोग्य यंत्रणा सलाईनवर!
अनंत पांगारकरBy अनंत पांगारकरOctober 9, 2023Updated:October 9, 2023No Comments3 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

सरकारच खेळतय सामान्यांच्या जीवाशी..

ही तर संपूर्ण मंत्रिमंडळाची जबाबदारी…

वर्षभरात असे काय घडले की ज्यामुळे आरोग्य यंत्रणा अपयशी ठरू लागली?

महाराष्ट्र संवाद न्यूज

संगमनेर – राज्यात आरोग्य व्यवस्थेचा पुरता बोजवारा उडाला आहे. सामान्य माणसांच्या जीवाशी खेळ सुरू आहे. नांदेडसह राज्यातील शासकीय रुग्णालयांमध्ये मृत्यूचे तांडव निर्माण झाले, ही परिस्थिती नेमकी का उद्भवली? नेमके दोष कुठे होते? औषध पुरवठ्याची स्थिती काय होती? यंत्रणेमध्ये इतका गलथानपणा का आला? या प्रश्नांची उत्तरे महाराष्ट्राला हवी आहेत. त्यामुळे सरकारने आरोग्याची श्वेतपत्रिका काढून सत्य समोर मांडावे, अशी मागणी काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते, माजी मंत्री, आमदार बाळासाहेब थोरात यांनी एका पत्राद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.

थोरात यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना या संदर्भात एक सविस्तर पत्र लिहिले आहे. या पत्रात ते म्हणतात, राज्यभरातील संपूर्ण आरोग्य व्यवस्था सलाईनवर गेली आहे. आरोग्य मंत्री म्हणतात, ‘याला काही मी एकटा जबाबदार नाही. ही संपूर्ण मंत्रिमंडळाची जबाबदारी आहे’. याचा अर्थ फक्त आरोग्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा असा होत नाही तर संपूर्ण मंत्रिमंडळाची जबाबदारी असल्याने मंत्रिमंडळाने राजीनामा द्यायला हवा.

राज्याच्या आरोग्यवस्थेचा पुरता बोजवारा उडालेला आहे, सामान्य माणसाच्या जीवाशी खेळ सुरू आहे. नांदेडसह महाराष्ट्राच्या शासकीय रुग्णालयांमध्ये मृत्यूचे तांडव झाले. ही परिस्थिती नेमकी का उद्भवली? नेमके दोष कुठे होते? औषध पुरवठ्याची स्थिती काय होती? यंत्रणेमध्ये इतका गलथानपणा का आला?… pic.twitter.com/rVOqRzMKD7

— Balasaheb Thorat (@bb_thorat) October 8, 2023

राज्यातील शासकीय रुग्णालयांचे आरोग्य क्षेत्रात मोठे काम आहे. गोरगरीब माणसाला आधार देण्यात या रुग्णालयांचा मोठा वाटा आहे. आम्हाला आठवते, कोविडच्या कठीण काळात हीच यंत्रणा जीव तोडून काम करत होती, याच यंत्रणेने महाराष्ट्रातल्या अनेक गंभीर रुग्णांना वाचवले कारण तेव्हाच्या सरकारचा हेतू प्रामाणिक होता. सामान्य माणसाला संकटातून बाहेर काढण्याची आमची भूमिका होती, असे असताना या वर्षात काय घडले की, ज्यामुळे आरोग्य यंत्रणा अपयशी ठरत आहे? शोध घेतल्यानंतर लक्षात येते की, या संपूर्ण अपयशाचे मूळ हे राज्य शासनाच्या कारभारात आहे. शासनाचा गलथानपणा आणि आरोग्य क्षेत्राकडे अक्षम्य दुर्लक्ष या काळात झाले आहे.

खरेतर ही शासकीय रुग्णालये सामान्य माणसासाठी महत्त्वाचे असतात. सरकारने त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले पाहिजे. आर्थिकदृष्ट्या त्यांना पूर्ण पाठबळ दिले पाहिजे, त्यावर नियंत्रणही ठेवले पाहिजे. नांदेडसह महाराष्ट्राच्या रुग्णालयांमध्ये जे चित्र दिसते आहे ते विदारक आहे. दोन-दोन दिवसात शेकडो लोकांना जीव गमवावा लागतो, ही जबाबदारी शासनाचीच आहे. शासनाला त्यापासून पळ काढता येणार नाही.

राज्याची संपूर्ण आरोग्य व्यवस्था सलाईन वर गेली आहे, आरोग्यमंत्री म्हणतात याला काही मी एकटा जबाबदार नाही, ही संपूर्ण मंत्रिमंडळाची जबाबदारी आहे. याचा अर्थ फक्त आरोग्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा असा होत नाही तर संपूर्ण मंत्रिमंडळाची ही जबाबदारी आहे, त्यांनी राजीनामा दिला पाहिजे. pic.twitter.com/Dsxj7E0fAB

— Balasaheb Thorat (@bb_thorat) October 8, 2023

नांदेड आणि महाराष्ट्रात घडलेल्या घटनेसंदर्भात शासनाने नेमलेल्या चौकशी समितीने रुग्णालय प्रशासनाकडून दिलेल्या माहितीवरुन काही निष्कर्ष काढले आहेत. त्यात सांगण्यात आलेली कारणे न पटण्यासारखी असल्यामुळे उच्च न्यायालयाने स्व-पुढाकाराने याचिका दाखल करुन त्या याचिकेच्या सुनावणीत शासनावर गंभीर ताशेरे ओढलेले आहेत. शासनाला व संबंधित अधिकाऱ्यांना या मृत्युंबाबतची जबाबदारी दुसरीकडे ढकलता येणार नाही.

शासनाने आरोग्य यंत्रणेवर होणारा खर्च कमी केला आहे. दुसरी एक महत्वाची बाब म्हणजे वैद्यकीय शिक्षण व संशोधन ही शासनाची एक संस्था असून शासकीय वैद्यकीय महाविद्यालये तिच्याशी निगडीत असतात. पण या संस्थेवर कायमस्वरुपी संचालक अद्यापही नेमलेला नाही. त्याचे प्रमुख कारण म्हणजे आपली कामे होण्यासाठी आपल्या मर्जीतील अधिकारी मिळेपर्यंत अशी पदे भरली जात नाहीत, ही खरी शोकांतिका आहे. शासकीय रुग्णालये ही गरिबांसाठी असतात, ज्यांची रुग्णांची आर्थिक स्थिती खाजगी रुग्णालयांचा खर्च पेलण्यासारखी नसते असेच रुग्ण शासकीय रुग्णालयांमध्ये येतात. परंतु त्यांच्यावर उपचार होण्याऐवजी त्यांना मृत्यूच्या खाईत लोटण्याचे प्रकार होत असतील आणि दुसरीकडे ‘शासन आपल्या दारी’ व विविध आरोग्य योजनांच्या जाहिराती देऊन शासन स्वत:ची पाठ थोपटून घेत असेल तर ते दुर्दैवी आहे.

सरकारकडून आम्ही या सर्व गोष्टींचे स्पष्टीकरण मागतो आहे, सत्य स्थिती लोकांच्या नजरेत यायलाच हवी तरच आणि तरच महाराष्ट्राची आरोग्य यंत्रणा आपण सक्षम करू शकतो म्हणूनच शासनाने तातडीने महाराष्ट्राच्या आरोग्य व्यवस्थेची श्वेतपत्रिका काढावी अशी मागणी मी करत आहे, असेही थोरात यांनी सांगितले.

anantpangarkar
अनंत पांगारकर

Post Views: 515
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
अनंत पांगारकर
  • Website

Related Posts

घुलेवाडी सरपंच व तीन सदस्यांच्या अपात्रतेला अप्पर विभागीय आयुक्तांची स्थगिती; जिल्हाधिकार्‍यांच्या निर्णयाविरोधात दिलासा

June 4, 2026

विधानपरिषद निवडणूक : भाजपकडून दिडशे कोटींची सौदेबाजी.. मविआच्या सर्व उमेदवारांची माघार! खा. संजय राऊत यांचा गंभीर आरोप

June 4, 2026

विधान परिषद निवडणूक बिनविरोध करण्यासाठी भाजपाकडून कोट्यवधींच्या ऑफर्स; काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा घणाघाती आरोप

June 4, 2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
आंदोलन

मालपाणी बजाज शोरूममधील मारहाण प्रकरण: आरोपींच्या अटकेसाठी संगमनेर प्रशासकीय भवनावर मोर्चा; तीव्र आंदोलनाचा इशारा

By अनंत पांगारकरJune 6, 20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन | संगमनेर: संगमनेर तालुक्यातील कासारा-दुमाला येथील रहिवासी स्वप्नील रोहिदास सातपुते यांना…

आज शनिवार, ६ जून २०२६ – कसा असेल तुमचा आजचा दिवस जाणून घ्या

June 6, 2026

वृक्ष संवर्धन ही काळाची गरज; तापमान वाढ रोखण्यासाठी प्रत्येकाने दोन झाडे लावावीत: माजी मंत्री बाळासाहेब थोरात

June 5, 2026

संगमनेर बायपासवर चालत्या कंटेनरला आग; लाखो रुपयांच्या चारचाकी गाड्या जळाल्याने मोठे नुकसान

June 5, 2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.