Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

धार्मिक कार्यानंतर नदीत पोहण्यासाठी गेलेल्या दोघांचा बुडून मृत्यू

June 10, 2026

आज बुधवार, १० जून २०२६ – कसा असेल तुमचा आजचा दिवस जाणून घ्या

June 10, 2026

संगमनेरमधील भेसळखोरांना कोणाचे अभय? तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईनंतरही संगमनेरचे अन्न व औषध प्रशासन सुस्तच! शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उपजिल्हाप्रमुख अमर कतारी यांचा प्रशासनाला सवाल; आंदोलनाचा इशारा

June 9, 2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » आमदार थोरात यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या हॅप्पी हायवेवर लखलखाट
इतिहास

आमदार थोरात यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या हॅप्पी हायवेवर लखलखाट

अमृतवाहिनी महाविद्यालय ते बस स्थानक मार्गावर वीज दिव्यांचा लखलखाट
अनंत पांगारकरBy अनंत पांगारकरOctober 11, 2023Updated:October 11, 2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज

संगमनेर – काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते तथा मा. महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या संकल्पनेतून साकारलेला हॅप्पी हायवेवर आज विद्युत रोषणाईचा लखलखाट झाला असून संगमनेरकरांच्या आनंदात भर पडली आहे.

गणेश उत्सवाच्या काळामध्ये आमदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली सर्व संगमनेरकरांनी एकत्र येत हॅप्पी हायवेचा लोकार्पण सोहळा भर पावसात मोठ्या उत्साहात आणि आनंदाने साजरा केला.

यामध्ये शहरातील बालक, नागरिक, युवक, युवती, महिलांनी अत्यंत आनंदाने सहभागी होऊन रस्त्याच्या दुतर्फा सजावट करून सर्वांनी रस्त्यावर ढोल ताशांच्या गजरात व भर पावसात फटाक्यांच्या आतिषबाजीत विविध खेळांमध्ये सहभाग घेतला. यामध्ये झुम्बा डान्स, लेझीम, कबड्डी, लावणी नृत्य, पारंपारिक ड्रेपरी, तायकोंदो ,रांगोळी अशा विविध स्पर्धांमधून अनेकांनी हॅप्पी हायवेचा संस्मरणीय सोहळा अनुभवला.

मात्र पालकमंत्री व भाजपाच्या लोकांनी सत्तेचा गैरवापर करून संगमनेरकरांच्या आनंदामध्ये मिठाचा खडा टाकला. तमाम संगमनेरकरांनी मागणी करूनही अनेक दिवस विद्युतीकरणाचे काम रखडवले.

आगामी काळ हा सणासुदीचा काळ आहे. नवरात्र उत्सव, दसरा, दिवाळी या काळामध्ये संगमनेरकरांच्या आनंदात भर पडावी व कायमस्वरूपी या रस्त्यावर लाईट असावी याकरीता आमदार थोरात यांनी पुन्हा वरिष्ठ पातळीवरून वीज विभागाला सूचना दिल्या.

यानंतर आज सायंकाळी संपूर्ण हॅप्पी हायवेवर लखलखाट झाला. आणि संगमनेरकरांनी हा रोमांच अनुभवला अनेक तरुणांनी या रस्त्यावर बाईक राईड केल्या.

यावेळी अनेक महिला, युवक व नागरिक यांनीही रस्त्यावर येऊन या प्रकाश सोहळ्याचा आनंद घेतला. या चांगल्या कामात काही लोकांनी केलेले राजकारण हे अत्यंत दुर्दैवी होते मात्र शेवटी सत्याचा विजय झाला, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे शहराध्यक्ष सोमेश्वर दिवटे यांनी दिली आहे.

anantpangarkar
अनंत पांगारकर

Post Views: 1,365
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
अनंत पांगारकर
  • Website

Related Posts

संगमनेरमध्ये शिवरायांचे भव्य अश्वारूढ स्मारक साकारणार; संगमनेरकरांची अश्वारूढ स्मारकाला पसंती, जनमताचा आदर करत पालिकेच्या सभेत ठरावावर शिक्कामोर्तब

April 14, 2026

गुरुवारी संगमनेरात शिवजयंतीनिमित्त ‘रायबा हेच का आपले स्वराज्य’ महानाट्याचे जयहिंद लोकचळवळीकडून आयोजन

February 17, 2026

संगमनेरला मिळाले अत्याधुनिक मल्टिप्लेक्स, मालपाणी मल्टिप्लेक्सचे आज भव्य उद्घाटन! संगमनेरकरांना एकाच वेळी दोन पडद्यांवर चित्रपट बघण्याची सोय

October 17, 2025
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
महाराष्ट्र संवाद विशेष

धार्मिक कार्यानंतर नदीत पोहण्यासाठी गेलेल्या दोघांचा बुडून मृत्यू

By अनंत पांगारकरJune 10, 20260

महाराष्ट्र संवाद न्यूज | अहिल्यानगर अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील जुने भालगाव येथे नदीच्या पाण्यात बुडून…

आज बुधवार, १० जून २०२६ – कसा असेल तुमचा आजचा दिवस जाणून घ्या

June 10, 2026

संगमनेरमधील भेसळखोरांना कोणाचे अभय? तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईनंतरही संगमनेरचे अन्न व औषध प्रशासन सुस्तच! शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उपजिल्हाप्रमुख अमर कतारी यांचा प्रशासनाला सवाल; आंदोलनाचा इशारा

June 9, 2026

यशोधन कार्यालयात ‘एसटी स्मार्ट कार्ड’ सुविधेचा शुभारंभ; ज्येष्ठ नागरिक व महिलांना प्रवासात मिळणार मोठी सवलत

June 9, 2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.