Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

मुलांऐवजी पालकांसाठी संस्कार शिबिर घ्या! — डॉ. संजय कळमकर यांचा घणाघाती टोला; बालकुमार साहित्य संमेलनात रंगली वैचारिक चर्चा

28/09/2026

संगमनेर एम.डी. ड्रग्ज रॅकेटचे धागेदोर कोणापर्यंत? जिल्हा न्यायालयात नेमकं काय घडलं… आता एक नव्हे तर चार आरोपी

28/09/2026

१०० वे पुण्यात, तर १०१ वे साहित्य संमेलन संगमनेरमध्ये, दुर्गाताई तांबे यांची मोठी घोषणा!

28/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » ग्रामसेवकाला कार्यालयात कोंडणे, मारहाण करणे आले अंगलट; न्यायालयाने आरोपीला दिली कारावासाची शिक्षा
न्यायालय

ग्रामसेवकाला कार्यालयात कोंडणे, मारहाण करणे आले अंगलट; न्यायालयाने आरोपीला दिली कारावासाची शिक्षा

अहमदनगरच्या 'या' तालुक्यातील घटना
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar12/10/2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज 

संगमनेर – तात्काळ माहिती दिली नाही याचा राग येऊन ग्रामसेवकास लाथा बुक्क्यांनी मारहाण करून ग्रामपंचायत कार्यालयात कोंडून ठेवणाऱ्या आरोपीस संगमनेर जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाने तीन महिने सश्रम कारावास आणि वीस हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.

दत्तात्रय विठ्ठल गोंदके (रा. करंडी, तालुका अकोले) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे.

करंडे गावचे ग्रामसेवक सोमा मुरलीधर येडे, पाणीपुरवठा कर्मचारी शशिकांत गोंदके, ग्रामपंचायत शिपाई विठ्ठल गोंदके, रोजगार सेवक सोमनाथ वायाळ हे सर्व ग्रामपंचायत करंडी येथे कार्यालयात दैनंदिन काम पहात होते. रोजगार हमी योजनेचा फेर सर्व्हे करावयाच्या असल्याने कृषी सहाय्यक अनिल फापाळे यांच्यासोबत या सर्वांना जायचे होते.

त्याचवेळी गावातील दत्तात्रय विठ्ठल गोंदके हा ग्रामपंचायत कार्यालयात आला आणि त्याने एक अर्ज देऊन मला तात्काळ माहिती द्या अशी मागणी ग्रामसेवकास करू लागला. तेव्हा ग्रामसेवक सोमा येडे यांनी त्या समजावून सांगितले की, आता रोजगार हमी योजने संदर्भात सर्व्हे करायचा असल्याने तिकडून आल्यावर तुमची माहिती देतो.

मात्र आरोपीने त्यांचे म्हणणे ऐकून घेतले नाही. मला तात्काळ माहिती द्या अशी मागणी करत त्याने जर माहिती दिली नाही तर तुम्हाला ग्रामपंचायती बाहेर जाऊ देणार नाही असे सांगून ग्रामपंचायतचा दरवाजा लावून घेतला व येडे यांना दोन तास कोंडून ठेवले.

दोन तासानंतर दरवाजा उघडल्यावर ग्रामसेवक ग्रामपंचायत कार्यालयातून बाहेर जाऊ लागले असता आरोपी गोंदके याने त्यांच्या छातीत लाथ मारून त्यांना खाली पाडून लाथा बुक्क्याने मारहाण केली व जखमी केले. तसेच सरकारी कामात अडथळा निर्माण केला. म्हणून आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला.

अकोले पोलीस स्टेशनचे तत्कालीन पोलीस निरीक्षक मिथुन घुगे यांनी याप्रकरणी तपास करत न्यायालयामध्ये आरोपी विरोधात आरोप पत्र दाखल केले होते. सदर घटल्याची सुनावणी संगमनेर येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्यायाधीश योगेश मनाठकर यांच्यासमोर झाली.

सरकारी पक्षातर्फे साक्षीदार तपासण्यात आले. खटल्याच्या युक्तिवादाच्यावेळी सरकार पक्षातर्फे सहाय्यक सरकारी वकील मच्छिंद्र गवते यांनी प्रबळ युक्तिवाद केला. दोन्ही पक्षाची बाजू ऐकून घेतल्यानंतर आरोपी दत्तात्रेय विठ्ठल गोंदके याच्यावर गुन्हा शाबीत झाला. त्यामुळे न्यायाधीश योगेश मनाठकर यांनी आरोपीला तीन महिन्याचा सश्रम कारावास व वीस हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.

सदरच्या खटल्याच्या सुनावणीच्या वेळी सरकारी वकिलांना पोलीस हवालदार प्रवीण डावरे, महिला पोलीस कॉन्स्टेबल स्वाती नाईकवाडी, दिपाली दवंगे, नयना पंडित, प्रतिभा थोरात यांनी सहकार्य केले.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 960
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेर एम.डी. ड्रग्ज रॅकेटचे धागेदोर कोणापर्यंत? जिल्हा न्यायालयात नेमकं काय घडलं… आता एक नव्हे तर चार आरोपी

28/09/2026

चेक अनादर प्रकरणात संगमनेर न्यायालयाने आरोपीस ठोठावला एक वर्षाचा कारावास; दोन लाखांची नुकसान भरपाई व ९ टक्के व्याजासह रक्कम देण्याचा निर्णय

23/09/2026

फायनान्सचा चेक बाऊन्स: अकोले तालुक्यातील कर्जदाराला ६ महिने कारावास आणि दुप्पट दंडाची शिक्षा

04/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
महाराष्ट्र संवाद विशेष

मुलांऐवजी पालकांसाठी संस्कार शिबिर घ्या! — डॉ. संजय कळमकर यांचा घणाघाती टोला; बालकुमार साहित्य संमेलनात रंगली वैचारिक चर्चा

By Annant Ppangarkar28/09/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- “सध्याच्या डिजिटल युगात अन्न, वस्त्र आणि निवारा यासोबत ‘मोबाईल डेटा’ ही…

संगमनेर एम.डी. ड्रग्ज रॅकेटचे धागेदोर कोणापर्यंत? जिल्हा न्यायालयात नेमकं काय घडलं… आता एक नव्हे तर चार आरोपी

28/09/2026

१०० वे पुण्यात, तर १०१ वे साहित्य संमेलन संगमनेरमध्ये, दुर्गाताई तांबे यांची मोठी घोषणा!

28/09/2026

कांदा व्यापाऱ्यावर कोयत्याने वार करणारा फरार आरोपी अखेर दोन वर्षानंतर एलसीबीच्या जाळ्यात

28/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.