Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

स्वातंत्र्य दिन विशेष: ८० वर्षांचा भारत; स्वातंत्र्य मिळाले, पण आपण खरेच स्वतंत्र झालो का?

August 15, 2026

स्वातंत्र्य दिन विशेष: देशाला स्वातंत्र्य मिळाले, पण आम्हाला स्वातंत्र्य मिळाले का?

August 15, 2026

शनिवार, १५ ऑगस्ट २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

August 15, 2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » अमेरिकेत होणाऱ्या जागतिक विमा परिषदेत संगमनेरच्या ‘या’ तरुणीचा असेल सहभाग!
सामाजिक

अमेरिकेत होणाऱ्या जागतिक विमा परिषदेत संगमनेरच्या ‘या’ तरुणीचा असेल सहभाग!

९ ते १२ जून २०२४ या कालावधीत अमेरिकेत होणार परीषद
अनंत पांगारकरBy अनंत पांगारकरOctober 22, 2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज

९ ते १२ जून २०२४ या कालावधीत अमेरिकेच्या वॉशिंग्टन राज्यातील क्लार्क काउंटीत असलेल्या कोलंबिया नदीच्या उत्तर तीरावरील व्हँकुव्हर या शहरात होणाऱ्या जागतिक विमा परिषदेत एचडीएफसी लाईफ इ्शुरन्स कंपनीची अभिकर्ता धनश्री सुनील कडलग ही तरुणी सहभागी होत आहे.

येथील एचडीएफसी लाईफ इ्शुरन्स कंपनीची अभिकर्ता असलेल्या धनश्री कडलगला विमा क्षेत्रातील प्रतिष्ठेचा एमडीआरटी हा सन्मान प्राप्त झाला आहे. यामुळे ती अमेरिकेत होणाऱ्या जागतिक विमा परिषदेत सहभागी होत आहे.

धनश्री हिला एमडीआरटी होण्यासाठी तिचे वडील ‘कडलग इन्व्हेस्टमेंट’चे संस्थापक सुनील कडलग यांच्यापासून प्रेरणा मिळाली. सुनील कडलग हे गेल्या २७ वर्षापासून म्युच्युअल फंड वितरक, जीवन व मेडिक्लेम विमा सल्लागार म्हणून कार्यरत आहेत. येथील कडलग इन्व्हेस्टमेंटच्या माध्यमातून त्यांनी या क्षेत्रात अतिशय पारदर्शक व प्रामाणिक सेवा व कार्य केले आहे. ग्राहकांच्या जीवनातील उद्दिष्टे प्राप्त करून देण्यासाठी त्यांनी दिलेल्या योगदानाबद्दल त्यांना आर्थिक क्षेत्रातील पुरस्कारही प्राप्त झालेले आहेत.

कोविड महामारीच्या दरम्यान कडलग यांनी अनेक कुटुंबांना विमा मृत्यू दावे प्राप्त करून दिले आहेत. आरोग्य विम्याच्या माध्यमातून अनेक कुटुंबांना कोविड क्लेम प्राप्त करून देऊन आधार दिलेला आहे. समाजामध्ये अर्थसाक्षरता निर्माण व्हावी म्हणून महाराष्ट्रभर ते व्याख्याने देतात आणि वृत्तपत्रांमधून लेखनही करतात. जवळे कडलग येथील स्वामी विवेकानंद सार्वजनिक वाचनालयाचे संस्थापक कार्यवाह, संगमनेर येथील रोटरी आय केअर ट्रस्टचे विश्वस्त, रोटरी क्लब ऑफ संगमनेरचे संचालक अशा विविध संस्थांच्या माध्यमातून कडलग हे सामाजिक कार्यातही अग्रेसर आहेत.

जागतिक विमा परिषदेसाठी पात्र होण्यासाठी धनश्री कडलग हिला एचडीएफसी लाईफ इन्शुरन्स कंपनीचे शाखाधिकारी दिपक मोरे, विकास अधिकारी सोहेल शेख, वडील सुनील कडलग यांचे मार्गदर्शन लाभले. धनश्रीच्या एचडीएफसी लाईफ एजन्सीच्या प्रदार्पणातच पहिल्याच वर्षी एमडीआरटी हा बहुमान प्राप्त झाल्याने कडलग इन्व्हेस्टमेंटची दुसरी पिढी या क्षेत्रात कार्यरत झाल्याचा संदेश दिला गेला आहे. धनश्री हिच्या यशाबद्दल तीचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

anantpangarkar
अनंत पांगारकर

Post Views: 2,062
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
अनंत पांगारकर
  • Website

Related Posts

‘पुणे–नाशिक रेल्वे संगमनेरमार्गेच व्हावी’; पुण्यात लवकरच विशेष रेल्वे परिषदेचे आयोजन

August 14, 2026

हॉटेल सुरभीपर्यंत पोहोचले बनावट दारूचे धागेदोरे; आस्थापना कायमस्वरूपी सील करा, शिवसेनेच्या (ठाकरे गट) अमर कतारी यांची मागणी

August 12, 2026

नाशिक–पुणे सेमी हायस्पीड रेल्वेसाठी आमदार सत्यजीत तांबे यांच्या आवाहनाला युवकांचा वाढता प्रतिसाद, फ्रेंडशिप डेच्या संदेशातून ९ ऑगस्टच्या चक्काजाम आंदोलनाचे आवाहन

August 2, 2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
महाराष्ट्र संवाद विशेष

स्वातंत्र्य दिन विशेष: ८० वर्षांचा भारत; स्वातंत्र्य मिळाले, पण आपण खरेच स्वतंत्र झालो का?

By अनंत पांगारकरAugust 15, 20260

अमोल शेलकर- १५ ऑगस्ट २०२६ रोजी भारत आपल्या स्वातंत्र्याचा ८० वा वर्धापन दिन साजरा करत…

स्वातंत्र्य दिन विशेष: देशाला स्वातंत्र्य मिळाले, पण आम्हाला स्वातंत्र्य मिळाले का?

August 15, 2026

शनिवार, १५ ऑगस्ट २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

August 15, 2026

राज्यात खळबळ..! तहसीलदार निलंबित; ‘ते’ प्रकरण भोवलं

August 14, 2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.