Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

गुरुवार ०१ आक्टोंबर २०२६ — जाणून घ्या आजच्या दिवसाचे राशिभविष्य

01/10/2026

अंगारकी चतुर्थीनिमित्त श्री वरदविनायकाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी, आमदार डॉ. किरण लहामटे यांच्यासह हजारो भाविकांनी घेतले दर्शन; खिचडी महाप्रसाद व सामुदायिक अथर्वशीर्ष पठणाने कोतूळ नगरी भक्तिमय

30/09/2026

संगमनेरकरांची सुरक्षा होणार अधिक भक्कम; नगरपरिषदेसाठी २ नवीन अग्निशामक वाहनांना प्रशासकीय मान्यता, आमदार अमोल खताळ यांच्या प्रयत्नांना यश! साक्षी सूर्यवंशी यांची माहिती

30/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » मतिमंद मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला संगमनेरच्या जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाने दिली ‘ही’ मोठी शिक्षा…
न्यायालय

मतिमंद मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला संगमनेरच्या जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाने दिली ‘ही’ मोठी शिक्षा…

Annant PpangarkarBy Annant Ppangarkar23/10/2023Updated:25/10/2023No Comments3 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज

मतिमंद २१ वर्षीय मुलीला घरातून जवळच्या जंगलात नेत तिच्यावर अत्याचार करणाऱ्या आरोपीला संगमनेरच्या जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाने दहा वर्ष सक्तमजुरी व २० हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. दंडाच्या रकमेतून १० हजार रुपये पीडितेला देण्याचे आदेश न्यायालयाने सोमवारी दिले आहेत.

अर्जुन अण्णासाहेब जोशी (रा. पट्टेवाडी, जवळे बाळेश्वर, ता. संगमनेर) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. अत्याचारित महिला मतिमंद असल्याने अतिशय गुंतागुंतीच्या ठरलेल्या या खटल्यामध्ये सहाय्यक सरकारी वकिलांनी अतिशय कौशल्याने आरोपी विरोधात गुन्हा सिद्ध करत आरोपीला शिक्षेपर्यंत नेले. दरम्यान या प्रकरणी तपासातील काही कमकुवत बाबी देखील समोर आल्या असून न्यायालयाने याबाबत आपले निष्कर्ष नोंदविले आहेत. त्यामुळे हे निष्कर्ष अशा प्रकारच्या आरोपीवरील आरोप सिद्ध करण्यासाठी गुन्ह्यात महत्वपूर्ण ठरतील.

संगमनेर तालुक्यातील जवळे बाळेश्वर जवळ १ फेब्रुवारी २०१९ रोजी संध्याकाळच्या सुमारास अत्याचाराची ही घटना घडली होती. या संदर्भात पीडित मतिमंद मुलीच्या आईने घारगाव पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी विरोधात अत्याचाराचा गुन्हा नोंदविण्यात आला होता.

या संदर्भात पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले होते की, मतिमंद मुलगी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास आपल्या गाई चारून घरी आली होती. त्यानंतर ती घराशेजारी असलेल्या एका कुटुंबियाकडे टीव्ही पाहण्यासाठी गेली होती. पीडित मुलीची आई शेजारी गेली असता तेथील लहान मुलाने पीडित मुलीला पट्टेवाडीच्या चोरांनी नेल्याचे सांगितले. त्यामुळे पीडित मुलीचा नातेवाईकांनी शोध घेतला असता ती जवळपास कोठेही आढळून आली नाही.

रात्री आठ वाजण्याच्या सुमारास पीडित मुलगी शेता जवळून घराकडे येताना दिसली. तिच्या पाठीमागे थोड्या अंतरावर आरोपी अर्जुन अण्णासाहेब जोशी हा देखील येताना दिसला. मुलगी घाबरून तिच्या आईजवळ गेली. तिला कोठे गेली होती असे विचारले असता तिने अर्जुन जोशी याच्याकडे बोट दाखवून त्याने तिला नेल्याचे खुणावून सांगितले. तसेच अर्जुन जोशी याने बळजबरीने अत्याचार केल्याचे सांगितले.

या आशयाच्या तक्रारीवरून आरोपी विरोधात २ फेब्रुवारी २०१९ रोजी घारगाव पोलीस ठाण्यात अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक योगेश मोहिते यांनी या प्रकरणाचा तपास केला. आरोपी विरोधात संगमनेरच्या जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयात आरोप पत्र दाखल करण्यात आले होते.

या खटल्याची सुनावणी अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश वाय. एच. अमेठा यांच्यासमोर यांच्यासमोर झाली. पीडित मुलगी मतिमंद असल्याने आरोपी विरोधात गुन्हा सिद्ध करण्याचे मोठे आव्हान सरकार पक्षासमोर होते. मात्र सहाय्यक सरकारी वकील संजय वाकचौरे यांनी मोठ्या कौशल्याने एका मतिमंद विद्यालयाच्या शिक्षकाच्या मदतीने न्यायालयासमोर गुन्हा सिध्द केला. या खटल्यात पीडित मुलीसह, फिर्यादी, वैद्यकीय अधिकारी, तपास अधिकारी यांच्यासह आठ साक्षीदारांच्या साक्षी नोंदविण्यात आल्या.

न्यायाधीश वाय. एच. अमेठा यांनी आरोपीला दोषी ठरवत दहा वर्ष सप्तमजुरी आणि वीस हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली दंडाच्या रकमेतून दहा हजार रुपये पीडित मुलीला देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहे.

 

न्यायालयाने नोंदविले हे महत्त्वाचे निरीक्षण…

पीडित मुलगी ही मतिमंद असल्याचे प्रमाणपत्र तिच्या नातेवाईकांनी झेरॉक्स प्रतिमध्ये तपास अधिकाऱ्यांना दिले होते. ते न्यायालयाने ग्राह्य धरले नाही. पीडित मुलीची पुन्हा अहमदनगरच्या जिल्हा रुग्णालयात तपासणी करण्यात आली होती. अशा पद्धतीने तपासणी करणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्याचे नाव त्या प्रमाणपत्रावर असणे आवश्यक आहे. मात्र या खटल्यामध्ये तपास अधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांनी शकले नाही. अशा प्रकारच्या खटल्यांमध्ये संबंधित अधिकाऱ्याच्या साक्षी महत्त्वपूर्ण ठरू शकत असल्याने वैद्यकीय अधिकाऱ्यांनी याबाबत दखल घेणे आवश्यक असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 8,253
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेर एम.डी. ड्रग्ज रॅकेटचे धागेदोर कोणापर्यंत? जिल्हा न्यायालयात नेमकं काय घडलं… आता एक नव्हे तर चार आरोपी

28/09/2026

चेक अनादर प्रकरणात संगमनेर न्यायालयाने आरोपीस ठोठावला एक वर्षाचा कारावास; दोन लाखांची नुकसान भरपाई व ९ टक्के व्याजासह रक्कम देण्याचा निर्णय

23/09/2026

फायनान्सचा चेक बाऊन्स: अकोले तालुक्यातील कर्जदाराला ६ महिने कारावास आणि दुप्पट दंडाची शिक्षा

04/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राशिभविष्य

गुरुवार ०१ आक्टोंबर २०२६ — जाणून घ्या आजच्या दिवसाचे राशिभविष्य

By Annant Ppangarkar01/10/20260

आजचे राशिभविष्य –  मेष – आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत उत्साहाचा आणि नवीन ऊर्जा घेऊन येणारा…

अंगारकी चतुर्थीनिमित्त श्री वरदविनायकाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी, आमदार डॉ. किरण लहामटे यांच्यासह हजारो भाविकांनी घेतले दर्शन; खिचडी महाप्रसाद व सामुदायिक अथर्वशीर्ष पठणाने कोतूळ नगरी भक्तिमय

30/09/2026

संगमनेरकरांची सुरक्षा होणार अधिक भक्कम; नगरपरिषदेसाठी २ नवीन अग्निशामक वाहनांना प्रशासकीय मान्यता, आमदार अमोल खताळ यांच्या प्रयत्नांना यश! साक्षी सूर्यवंशी यांची माहिती

30/09/2026

महात्मा गांधी जयंतीनिमित्त संगमनेरमध्ये जयहिंदच्या वतीने विविध उपक्रम; १५७ विद्यार्थ्यांची प्रभात फेरी अन् ‘जवाहरलाल हाजीर हो’ पुस्तकाचे प्रकाशन

30/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.