Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेरमधील भेसळखोरांना कोणाचे अभय? तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईनंतरही संगमनेरचे अन्न व औषध प्रशासन सुस्तच! शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उपजिल्हाप्रमुख अमर कतारी यांचा प्रशासनाला सवाल; आंदोलनाचा इशारा

June 9, 2026

यशोधन कार्यालयात ‘एसटी स्मार्ट कार्ड’ सुविधेचा शुभारंभ; ज्येष्ठ नागरिक व महिलांना प्रवासात मिळणार मोठी सवलत

June 9, 2026

…अन् थेट कोर्टातच झाली घोषणाबाजी!संगमनेरमधील ‘त्या’ प्रकाराने खळबळ, २० ते २५ जणांवर गुन्हा दाखल

June 9, 2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » वरिष्ठ पोलीस निरीक्षकाला अटक करून आणा, न्यायालयाचा आदेश; वाचा नेमकं प्रकरण काय?
न्यायालय

वरिष्ठ पोलीस निरीक्षकाला अटक करून आणा, न्यायालयाचा आदेश; वाचा नेमकं प्रकरण काय?

शिवाजीनगर न्यायालयातील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांचा आदेश...
अनंत पांगारकरBy अनंत पांगारकरOctober 27, 2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज

पुणे: एका खटल्याच्या साक्षीसाठी न्यायालयाने वारंवार बोलावून देखील न्यायालयात हजर न राहणाऱ्या तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षकाला अटक करून न्यायालयात आणण्याचे आदेश पुण्याच्या न्यायालयातील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी सी. एस. पाटील यांनी दिला आहे.

एस. डी. कांबळे असे या तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षकाचे नाव असून ते कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात कार्यरत होते.

हानिफ गुलामअली सोमजी (रा. बोट क्लब रोड) यांनी दिलेल्या तक्रारीवरून २० मे २०१३ या दिवशी कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात शिवाजी कांतीलाल शिंदे, साईनाथ निवॄत्ती सातव, सोमनाथ काळूराम सातव, विष्णू बाजीराव सातव, ज्ञानेश्वर किसन सातव, निळाराम शितकल (सर्व रा. केसनंद) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

मारहाण करून प्रत्येकी वीस लाख रुपयांची खंडणी मागितली, तक्रारदाराच्या कार्यालयात अनाधिकाराने प्रवेश करून दंगलसदृश्य परिस्थिती निर्माण करणे आणि जीवे ठार मारण्याच्या धमक्या दिल्याचे तक्रारीत नमूद होते.

या प्रकरणी कोरेगाव पार्क पोलिसांनी तपास करून २४ सप्टेंबर २०१३मध्ये न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते. या खटल्याची सुनावणी २७ जानेवारी २०१७ मध्ये सुरू झाली.

आरोपींच्यावतीने ॲड. मिलिंद पवार, ॲड. आकाश देशमुख काम पाहत आहेत. या प्रकरणात सरकार पक्षाने साक्षीदारांची साक्ष नोंदवली आहे. मात्र २०१९ पासून खटल्याचे तपासी अंमलदार म्हणून वरिष्ठ निरीक्षक एस. डी. कांबळे यांची साक्ष नोंदवणे बाकी असल्याने त्या कारणामुळे खटला प्रलंबित आहे.

कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्याने या प्रकरणाचा अहवाल न्यायालयात सादर केला. तत्कालीन वरिष्ठ निरीक्षक कांबळे यांना वारंवार फोन केले, मात्र, ते फोनही उचलत नाहीत. तसेच, पहिल्यांदा काढलेल्या पकड वॉरंटची सूचना त्यांना व्हाटसॲपवर पाठवूनही त्यांच्याकडून कोणताच प्रतिसाद मिळत नाही, असे त्यात नमूद होते.

या अहवालानंतर सरकारी वकिलांनी न्यायालयात अर्ज करून कांबळे यांना पकडून आणण्यासाठी पकड वॉरंट काढण्यासाठी विनंती केली. ती न्यायालयाने मान्य केली. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी सी. एस. पाटील यांनी कांबळे यांना पकडून आणण्यासाठी जामीनपात्र वॉरंट काढले. या प्रकरणाची पुढील सुनावणी २४ नोव्हेंबर २०२३ मध्ये होणार आहे.

anantpangarkar
अनंत पांगारकर

Post Views: 1,061
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
अनंत पांगारकर
  • Website

Related Posts

संगमनेर येथील जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल: पोक्सो प्रकरणातील आरोपीची निर्दोष मुक्तता

June 6, 2026

राजेंद्र गडगे याला न्यायालयाचा दिलासा; गंभीर गुन्ह्यांत मिळाला नियमित जामीन

May 29, 2026

नसरापूर हत्याकांड: ६५ वर्षीय नराधमाभोवती कायद्याचा फास आवळला; कोर्टात रोज …

May 28, 2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
आंदोलन

संगमनेरमधील भेसळखोरांना कोणाचे अभय? तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईनंतरही संगमनेरचे अन्न व औषध प्रशासन सुस्तच! शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उपजिल्हाप्रमुख अमर कतारी यांचा प्रशासनाला सवाल; आंदोलनाचा इशारा

By अनंत पांगारकरJune 9, 20260

महाराष्ट्र संवाद न्यूज | संगमनेर: एकीकडे अन्न व औषध प्रशासन विभागाचे (FDA) धडक आयुक्त तुकाराम…

यशोधन कार्यालयात ‘एसटी स्मार्ट कार्ड’ सुविधेचा शुभारंभ; ज्येष्ठ नागरिक व महिलांना प्रवासात मिळणार मोठी सवलत

June 9, 2026

…अन् थेट कोर्टातच झाली घोषणाबाजी!संगमनेरमधील ‘त्या’ प्रकाराने खळबळ, २० ते २५ जणांवर गुन्हा दाखल

June 9, 2026

उज्ज्वला योजनेतील लाभार्थ्यांना मोठा झटका; अनुदानित गॅस सिलिंडरची संख्या ९ वरून थेट ४ वर

June 9, 2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.