Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेतर्फे ‘नाट्य परिषद करंडक’ राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेचे आयोजन; १८ सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

04/09/2026

राजहंस मिल्क पार्लर चोरी प्रकरण: संगमनेर पोलिसांकडून अवघ्या काही तासांत दोन चोरट्यांना बेड्या

04/09/2026

अहिल्यानगरच्या स्थानिक गुन्हे शाखेचा दणका; २० लाखांचा वाळू तस्करांचा मुद्देमाल जप्त

04/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » फडणवीसांच्या नव महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी मी पुन्हा येईन! भाजपने ट्विट व नंतर डिलीट केलेल्या व्हिडिओमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा भूकंपाची शक्यता
राजकारण

फडणवीसांच्या नव महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी मी पुन्हा येईन! भाजपने ट्विट व नंतर डिलीट केलेल्या व्हिडिओमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा भूकंपाची शक्यता

Annant PpangarkarBy Annant Ppangarkar27/10/2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज

मुंबई : भारतीय जनता पक्षाकडून त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर एक व्हिडीओ ट्विट करण्यात आला आहे. या व्हिडीओत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मी पुन्हा येईन, असं बोलताना दिसत आहेत. भाजप कडून ट्विट करण्यात आलेल्या या व्हिडिओमुळे राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा भूकंपाची शक्यता वर्तविली जात आहे.

सध्याची राजकीय परिस्थिती बघता राज्याच्या राजकारणात कधी कोणती उलथापालट होईल याची कोणतीही शक्यता राहिलेली नाही. विधानसभा निवडणुकीनंतर भाजपचा आता तोंडाशी आलेला सत्तेचा घास महाविकास आघाडीने हिरावून घेतला. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या तिघांनी एकत्र येत अनपेक्षितरित्या महाविकास आघाडीची स्थापना केली होती. या सरकारचा अडीच वर्षाचा कार्यकाल होत नाही तोच एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेतील एक मोठा गट फोडून शिंदे यांना मुख्यमंत्री पदावर भाजपकडून बसविण्यात आले.

शिवसेनेतील फुटीनंतर अजित पवारांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पाडण्यात आणि अजित पवारांना उपमुख्यमंत्री पदावर बसविण्यात भाजप यशस्वी झाली. दोन मोठ्या पक्षात फूट पाडल्यानंतर मोठ्या बहुमतात शिंदे-फडणवीस-पवार सरकार सत्तेत आहे. मात्र राज्यातील हा सत्ता संघर्ष सर्वोच्च न्यायालयात पोहोचला आहे.

या पार्श्वभूमीवर आमदार अपात्रतेच्या सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या भूमिकेकडे लक्ष लागले असताना आता भाजपकडून त्यांच्या ट्विटर हँडलवर फडणवीस यांच्या वक्तव्याचा मी पुन्हा येईल हा व्हिडिओ ट्विट करण्यात आला आहे. यामुळे राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या बदलाची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवली जात आहे.

विशेष म्हणजे दसरा मेळाव्यानंतर दुसऱ्याच दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नुकतेच दिल्ली दौऱ्यावर जावून आले आहेत. त्यानंतर गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी शिर्डी दौऱ्यावर आले होते. दिल्ली आणि शिर्डी दौऱ्यात नेमक्या काय घडामोडी घडल्या की ज्यामुळे भाजपकडून देवेंद्र फडणवीस यांचा मी पुन्हा येईन बोलतानाचा व्हिडीओ ट्विट करण्यात आला आहे. यामुळे फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहे. मात्र त्यानंतर भाजपने हे ट्विट आपल्या ट्विटर हँडलवरून हटविले आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 647
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

आमदार अमोल खताळ यांच्या सूचनेनंतर लोहारे-कासारे पाझर तलावातून पाण्याचा विसर्ग सुरू

30/08/2026

संगमनेर पालिकेचा अनोखा उपक्रम! १ ते २५ सप्टेंबरदरम्यान होणार प्रभागनिहाय बैठका; नगराध्यक्ष डॉ. मैथिली तांबे यांच्या पुढाकाराने नागरिकांच्या प्रश्नांना थेट व्यासपीठ

29/08/2026

संगमनेरकरांच्या अभिप्रेत असलेलेच छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य-दिव्य स्मारक उभारणार! “दीड वर्षे खाती हातात असूनही वाढीव जागेचा प्रश्न सोडवला नाही; आता स्मारकाच्या कामात खोडा घालून संगमनेरकरांची दिशाभूल करू नका”

28/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
क्रिडा व कला

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेतर्फे ‘नाट्य परिषद करंडक’ राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेचे आयोजन; १८ सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

By Annant Ppangarkar04/09/20260

Annant Ppangarkar मुंबई/अहिल्यानगर: अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद (मध्यवर्ती), मुंबई यांच्या वतीने ‘अखिल भारतीय मराठी…

राजहंस मिल्क पार्लर चोरी प्रकरण: संगमनेर पोलिसांकडून अवघ्या काही तासांत दोन चोरट्यांना बेड्या

04/09/2026

अहिल्यानगरच्या स्थानिक गुन्हे शाखेचा दणका; २० लाखांचा वाळू तस्करांचा मुद्देमाल जप्त

04/09/2026

आज शुक्रवार, ०४ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

04/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.