Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेतर्फे ‘नाट्य परिषद करंडक’ राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेचे आयोजन; १८ सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

04/09/2026

राजहंस मिल्क पार्लर चोरी प्रकरण: संगमनेर पोलिसांकडून अवघ्या काही तासांत दोन चोरट्यांना बेड्या

04/09/2026

अहिल्यानगरच्या स्थानिक गुन्हे शाखेचा दणका; २० लाखांचा वाळू तस्करांचा मुद्देमाल जप्त

04/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » महसूल मंत्री विखे पाटलांचे निकटवर्तीय अमोल खताळ यांचा चिकणी ग्रामसभेत निषेध
राजकारण

महसूल मंत्री विखे पाटलांचे निकटवर्तीय अमोल खताळ यांचा चिकणी ग्रामसभेत निषेध

पालकमंत्री समर्थक स्वयंघोषित सामाजिक कार्यकर्ते खताळांचा गावाशी काहीही संबंध नसताना केली तोडफोड
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar28/10/2023Updated:28/10/2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

सत्तेच्या गैरवापरातून सुरू असलेली दमदाटी सहन करणार नाही – आनंद वर्पे

महाराष्ट्र संवाद न्यूज

संगमनेर : संगमनेर तालुक्याच्या विकासात कोणतीही योगदान नसणारे व चिकणी गावात कोणताही संबंध नसताना पालकमंत्री समर्थक व स्वयंघोषित सामाजिक कार्यकर्ते अमोल खताळ यांनी गावात येऊन केलेली तोडफोड व दमदाटी खपवून घेणार नसून या विरोधात चिकणी ग्रामस्थांनी एकत्र येऊन निषेध नोंदवत पोलिसांना निवेदन दिले आहे. तर सत्तेच्या गैरवापर करून अशी दमदाटी सहन करणार नाही असा इशारा तालुका किसान काँग्रेसचे अध्यक्ष आनंद वर्पे यांनी दिला आहे.

चिकणी येथे झालेल्या ग्रामसभेत एकमताने याबाबत ठराव करण्यात आला. यावेळी किसान काँग्रेसचे तालुकाध्यक्ष आनंद वर्पे, दूध संघाचे संचालक विलास वर्पे, भारत वर्पे, चंद्रभान मुटकुळे, राजेंद्र वर्पे, दत्तू वर्पे, संतोष घुले, दत्तात्रय मुटकुळे आदींसह विविध संस्थांचे पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आनंद वर्पे म्हणाले, काँग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर तालुक्यातील प्रत्येक गावात विकासाच्या योजना राबवल्या जात आहेत. या योजनांसाठी आमदार थोरात यांनीच निधी मंजूर केला आहे. ही कामे सुरू असताना पालकमंत्री समर्थक अमोल खताळ हे गावाशी कोणताही संबंध नसताना किंवा पंचायत समिती व इतर विभागाकडे कोणतीही तक्रार नसताना गावात येऊन कोणत्याही स्थानिक पदाधिकाऱ्याला कोणतीही माहिती न देता विश्वासात न घेता कामात हस्तक्षेप व दमदाटी करत आहेत.

याचबरोबर त्यांनी स्मशानभूमी कामात तोडफोड केली आहे. हा अत्यंत दुर्दैवी प्रकार आहे. या गावच्या विकासासाठी चिकणी ग्रामस्थांनी रक्त सांडले आहे. बाहेरून येऊन येथे हस्तक्षेप चालणार नाही. माहिती अधिकाराच्या नावाखाली सुरू असलेली दमदाटी संगमनेर तालुका सहन करणार नसून असे विकास कामे सुरू असताना अडथळे आणण्याचा प्रकार केल्यास आगामी काळात जशास तसे उत्तर दिले जाईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

विलास वर्पे म्हणाले, काही विघ्नसंतोषी मंडळी तालुक्याच्या विकासात खोडा घालू पाहत आहे. या लोकांना नागरिकांनी ओळखले आहे. ज्यांनी आयुष्यात कधीही सामाजिक काम केले नाही. ते कामे थांबवण्याचे काम करत आहेत. यामागे तुम्ही गावात कधी आला नाही. विकासासाठी तुम्ही काही केले नाही. तुमचा संबंध काय असे सांगताना ही दादागिरी थांबली पाहिजे. अन्यथा होणाऱ्या घटनेला प्रशासन व सत्ताधारी भाजपा जबाबदार राहील असा इशाराही दिला. यावेळी भारत वर्पे, चंद्रभान मुटकुळे संतोष घुले आदींनीही मनोगत व्यक्त केले.

बाहेरच्या व्यक्तीने गावात येऊन केलेली दमदाटी सहन केली जाणार नाही, असा ठरावही गावच्या वतीने करण्यात आला असून याबाबतचे निवेदन ग्रामीण पोलीस स्टेशनला गावकऱ्यांनी दिले आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,266
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

आमदार अमोल खताळ यांच्या सूचनेनंतर लोहारे-कासारे पाझर तलावातून पाण्याचा विसर्ग सुरू

30/08/2026

संगमनेर पालिकेचा अनोखा उपक्रम! १ ते २५ सप्टेंबरदरम्यान होणार प्रभागनिहाय बैठका; नगराध्यक्ष डॉ. मैथिली तांबे यांच्या पुढाकाराने नागरिकांच्या प्रश्नांना थेट व्यासपीठ

29/08/2026

संगमनेरकरांच्या अभिप्रेत असलेलेच छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य-दिव्य स्मारक उभारणार! “दीड वर्षे खाती हातात असूनही वाढीव जागेचा प्रश्न सोडवला नाही; आता स्मारकाच्या कामात खोडा घालून संगमनेरकरांची दिशाभूल करू नका”

28/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
क्रिडा व कला

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेतर्फे ‘नाट्य परिषद करंडक’ राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेचे आयोजन; १८ सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

By Annant Ppangarkar04/09/20260

Annant Ppangarkar मुंबई/अहिल्यानगर: अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद (मध्यवर्ती), मुंबई यांच्या वतीने ‘अखिल भारतीय मराठी…

राजहंस मिल्क पार्लर चोरी प्रकरण: संगमनेर पोलिसांकडून अवघ्या काही तासांत दोन चोरट्यांना बेड्या

04/09/2026

अहिल्यानगरच्या स्थानिक गुन्हे शाखेचा दणका; २० लाखांचा वाळू तस्करांचा मुद्देमाल जप्त

04/09/2026

आज शुक्रवार, ०४ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

04/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.