Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

‘पैशाचा पाऊस’ पडणारच होता, पण…; अहिल्यानगरमध्ये ९२ लाखांच्या बनावट नोटांसह टोळी गजाआड!

29/09/2026

दुष्काळ, जिल्हा बँक आणि राजकारण : नाण्याच्या दोन बाजू एकत्र आल्या! पुढे काय…

29/09/2026

मंगळवार २९ सप्टेंबर — जाणून घ्या आजच्या दिवसाचे राशिभविष्य

28/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » प्रादेशिक योग स्पर्धेतही ‘ध्रुव’ची चमकदार कामगिरी; १९ सुवर्णसह २५ पदकांवर उमटविली मोहोर
क्रिडा व कला

प्रादेशिक योग स्पर्धेतही ‘ध्रुव’ची चमकदार कामगिरी; १९ सुवर्णसह २५ पदकांवर उमटविली मोहोर

Annant PpangarkarBy Annant Ppangarkar28/10/2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज

शैक्षणिक क्षेत्रासह खेळांमध्येही आपला दबदबा निर्माण करणार्‍या संगमनेरच्या ध्रुव ग्लोबल स्कूलच्या योगासन संघाने सीबीएसईची प्रादेशिक योग स्पर्धाही गाजवली. या स्पर्धेत ध्रुवच्या योगासन खेळाडूंनी सांघिक व वैयक्तिक अशा दोन्ही प्रकारात चमकदार कामगिरी बजावतांना तीन गटांमध्ये प्रथम क्रमांक पटकावला. योगासनांच्या विविध प्रकारांमध्ये केलेल्या उत्कृष्ट सादरीकरणाच्या बळावर ध्रुवला १९ सुवर्णसह एकूण २५ पदकांची कमाई झाली.

कर्नाटकची राजधानी बेंगलुरुमध्ये पार पडलेल्या या स्पर्धेत सहभागी झालेल्या ध्रुव ग्लोबलच्या सर्व स्पर्धकांची पुढील महिन्यात गाझीयाबाद येथे होणार्‍या सीबीएसई नॅशनल गेम्ससाठी निवडही करण्यात आली आहे.

चौदा वर्षांखालील मुलींच्या सांघिक प्रकारात तृप्ती डोंगरे, देवांशी वाकळे, वैदेही मयेकर, रिद्धी लगड व नीरल वाडेकर यांच्या संघाने प्रथम क्रमांक पटकावतांना सुवर्ण पदकांचा पंचम प्राप्त केला. तर एकोणावीस वर्षांखालील मुलींच्या गटात अन्वी फटांगरे, प्रांजल व्हाना, रुद्राक्षी भावे, सिद्धी लगड आणि तन्वी पवार यांच्या संघासह मुलांच्या गटातील प्रीत बोरकर, निबोध पाटील, रुपेश सांगे, नानक अभंग आणि यश लगड यांच्या संघानेही विजयाची परंपरा गाजवतांना पहिल्या क्रमांकाचा मान मिळवित तब्बल दहा सुवर्ण पदके प्राप्त केली.

चौदा वर्षांखालील मुलांच्या गटात अंश मयेकर, तन्मय म्हाळसकर, स्वराज थोरात, रुद्र अभंग व सिद्धांत चासकर यांच्या संघाला पहिल्या क्रमांकाने हुलकावणी दिल्याने त्यांना रौप्य पदकावर समाधान मानावे लागले.

सांघिक कामगिरीसह ध्रुव ग्लोबलच्या योगासन खेळाडूंनी वैयक्तिक प्रकारातही आपला दबदबा राखला. चौदा वर्षांखालील मुलींच्या गटात रिद्धी लगडने सुवर्ण तर, नीरल वाडेकरने रौप्य पदकं मिळवले. याच वयोगटात मुलांमध्ये अंश मयेकरने तर, 19 वर्षांखालील मुलींमध्ये रुद्राक्षी भावे व मुलांमध्ये नानक अभंग याने सुवर्ण पदक मिळवतांना संघाचा आलेख आणखी उंचावला.

या स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करणार्‍या ध्रुवच्या सर्व योगासन खेळाडूंची पुढील महिन्यात गाझीयाबाद येथे होणार्‍या सीबीएसई राष्ट्रीय गेम्ससाठीही निवड करण्यात आली आहे. योग प्रशिक्षक किरण वाडेकर, विष्णू चक्रवर्ती व प्रवीण पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

सीबीएसईच्या प्रादेशिक योग स्पर्धेत ध्रुवच्या योगासन खेळाडूंनी मिळविलेल्या या यशाबद्दल चेअरमन डॉ.संजय मालपाणी, व्हा.चेअरमन गिरीश मालपाणी, प्राचार्या अर्चना घोरपडे व क्रीडा विभाग प्रमुख गिरीश टोकसे यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 418
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

जयहिंद कला महोत्सव: १२ हजार विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग; कौशल्यपूर्ण शिक्षणासाठी उपक्रम राज्यासाठी दिशादर्शक – माजी मंत्री बाळासाहेब थोरात

08/09/2026

संगमनेरात बालकला महोत्सवाचे उत्साहात उद्घाटन; बालगोपाळांच्या कलागुणांना मिळाले हक्काचे व्यासपीठ!

07/09/2026

संगमनेरात जयहिंद लोकचळवळीच्या वतीने उद्या आणि परवा बालकला महोत्सवाचे आयोजन; विविध उपक्रमांसह रंगभरण स्पर्धेची पर्वणी

05/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

‘पैशाचा पाऊस’ पडणारच होता, पण…; अहिल्यानगरमध्ये ९२ लाखांच्या बनावट नोटांसह टोळी गजाआड!

By Annant Ppangarkar29/09/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – नागरिकांच्या अज्ञानाचा आणि अंधश्रद्धेचा फायदा घेत ‘पैशाचा पाऊस’ पाडण्याचे आमिष…

दुष्काळ, जिल्हा बँक आणि राजकारण : नाण्याच्या दोन बाजू एकत्र आल्या! पुढे काय…

29/09/2026

मंगळवार २९ सप्टेंबर — जाणून घ्या आजच्या दिवसाचे राशिभविष्य

28/09/2026

मुलांऐवजी पालकांसाठी संस्कार शिबिर घ्या! — डॉ. संजय कळमकर यांचा घणाघाती टोला; बालकुमार साहित्य संमेलनात रंगली वैचारिक चर्चा

28/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.