Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

‘पैशाचा पाऊस’ पडणारच होता, पण…; अहिल्यानगरमध्ये ९२ लाखांच्या बनावट नोटांसह टोळी गजाआड!

29/09/2026

दुष्काळ, जिल्हा बँक आणि राजकारण : नाण्याच्या दोन बाजू एकत्र आल्या! पुढे काय…

29/09/2026

मंगळवार २९ सप्टेंबर — जाणून घ्या आजच्या दिवसाचे राशिभविष्य

28/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » …या कारणामुळे थोरात कारखाना ठरला राज्यातील साखर कारखानदारीसाठी मापदंड : माजी आमदार डॉ. सुधीर तांबे
शेती व सहकार

…या कारणामुळे थोरात कारखाना ठरला राज्यातील साखर कारखानदारीसाठी मापदंड : माजी आमदार डॉ. सुधीर तांबे

...यामुळे आमदार बाळासाहेब थोरात नव्हते उपस्थित
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar02/11/2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

सहकार महर्षी थोरात कारखान्याच्या ५७ व्या गळीत हंगामाचा शुभारंभ

मराठा आरक्षणासंदर्भात डॉ. तांबे म्हणाले…

महाराष्ट्र संवाद न्यूज

संगमनेर : कारखान्याचे व्यवस्थापन कसे असावे, याचा आदर्श नमुना सहकार महर्षी थोरात सहकारी साखर कारखाना असून येथे होत असलेल्या उत्तम प्रकारच्या कामामुळे हा कारखाना सहकारातील इतर कारखान्यांसाठी मापदंड ठरला आहे, असे प्रतिपादन नाशिक पदवीधर मतदार संघाचे काँग्रेसचे माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी केले.

सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या ५७ व्या गळीत हंगामाचा शुभारंभ माजी आमदार डॉ. सुधीर तांबे व राज्य साखर संघाचे उपाध्यक्ष कारखान्याचे अध्यक्ष बाबा ओहोळ यांच्या हस्ते साध्या पद्धतीने झाला.

यावेळी जेष्ठ नेते बाजीराव खेमनर, इंद्रजीत थोरात, सुधाकर जोशी, रामहरी कातोरे, अजय फटांगरे, कारखान्याचे कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर यांच्यासह कारखान्याचे संचालक व विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते. तांबे यांच्या हस्ते कृषी शैक्षणिक सहकार क्रांतीचा जागर असणाऱ्या सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या जन्मशताब्दी महोत्सवानिमित्त स्टिकरचे प्रकाशन करण्यात आले.

तांबे म्हणाले, हे वर्ष थोर स्वातंत्र्य सेनानी सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांचे जन्म शताब्दी वर्ष आहे. भाऊसाहेब थोरात यांनी आपल्या आयुष्यात कायम तत्त्वाचे राजकारण केले. तत्त्वांची कधीही तडजोड केली नाही. अमृत परिवारासाठी त्यांनी राजहंसह ब्रँड दिला आहे. त्यांच्या पश्चात काँग्रेस पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी अत्यंत तन्मयतेने आणि शिस्तीने ही आदर्श सहकाराची तत्वे जपत सहकाराला आधुनिकतेची जोड देत येथील सहकार देशासाठी मॉडेल बनविला आहे.

आमदार थोरात यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर तालुक्यातील ग्रामीण विकासासोबतच येथे शैक्षणिक प्रगती मोठ्या प्रमाणात झाली असल्याने आर्थिक संपन्नतेबरोबर समृद्ध प्रगती देखील दिसून येत आहे. ही वाटचाल यापुढील काळात अशीच जपणे आवश्यक आहे.

बाबा ओहोळ म्हणाले, साखर कारखान्यासाठी प्रत्येक हंगाम आव्हानात्मक ठरत असतो. यावर्षी कमी पाऊस आणि कमी ऊसामुळे कारखानदारी अवघड परिस्थितीतून मार्गक्रमण करत आहे. आमदार थोरात यांच्या नेतृत्वामुळे या कारखान्यावर सभासद, ऊस उत्पादक, कार्यक्षेत्राबाहेरील ऊस उत्पादक या सर्वांचा मोठा विश्वास आहे. या विश्वासाचा परिणाम म्हणून कारखान्याने सातत्याने उच्चांकी भाव देत सर्वसामान्यांच्या जीवनात आनंद निर्माण करण्याचे काम केले आहे. प्रास्ताविक कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर यांनी तर सूत्रसंचालन नामदेव कहांडळ यांनी केले.

राज्यभर सुरू असलेल्या मराठा आरक्षण आंदोलनाच्या संदर्भात बोलताना माजी आमदार डॉ. तांबे म्हणाले, या प्रश्नात सरकारने तातडीने भूमिका घेणे आवश्यक असून मराठा समाजाला त्वरित आरक्षण मिळायला हवे.

या कारणामुळे बाळासाहेब थोरात कार्यक्रमाला आले नाही…

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांचे दुसऱ्या टप्प्यात उपोषण सुरू आहे आरक्षणाच्या या लढ्याला प्रथमपासूनच आमदार बाळासाहेब थोरात यांनी पाठिंबा दिला असून मराठा समाज बांधवांच्या भावनांचा आदर करत थोरात यांनी गुरुवारी सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्यासह जुन्नर येथील विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचा तसेच राज्यातील पूर्वनियोजित कार्यक्रम रद्द केले असल्याने ते आज उपस्थित नव्हते.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 960
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

सोशल मीडियावर खोटे पसरवणाऱ्यांचा बंदोबस्त करा: माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचा इशारा; संगमनेरची आर्थिक समृद्धी टिकवण्यासाठी संघर्षाचे आवाहन

21/09/2026

राज्यात सरसकट दुष्काळ जाहीर करा; माजी कृषिमंत्री बाळासाहेब थोरात यांची मागणी, रेल्वेप्रश्नी लोकप्रतिनिधीच्या बालिश वक्तव्यावरही केले भाष्य

19/09/2026

थोरात कारखान्याचे ११ लाख मेट्रिक टनाचे गाळप उद्दिष्ट; बॉयलर अग्नीप्रदीपन समारंभात बाळासाहेब थोरात यांचे आवाहन

19/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

‘पैशाचा पाऊस’ पडणारच होता, पण…; अहिल्यानगरमध्ये ९२ लाखांच्या बनावट नोटांसह टोळी गजाआड!

By Annant Ppangarkar29/09/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – नागरिकांच्या अज्ञानाचा आणि अंधश्रद्धेचा फायदा घेत ‘पैशाचा पाऊस’ पाडण्याचे आमिष…

दुष्काळ, जिल्हा बँक आणि राजकारण : नाण्याच्या दोन बाजू एकत्र आल्या! पुढे काय…

29/09/2026

मंगळवार २९ सप्टेंबर — जाणून घ्या आजच्या दिवसाचे राशिभविष्य

28/09/2026

मुलांऐवजी पालकांसाठी संस्कार शिबिर घ्या! — डॉ. संजय कळमकर यांचा घणाघाती टोला; बालकुमार साहित्य संमेलनात रंगली वैचारिक चर्चा

28/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.