Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

‘पैशाचा पाऊस’ पडणारच होता, पण…; अहिल्यानगरमध्ये ९२ लाखांच्या बनावट नोटांसह टोळी गजाआड!

29/09/2026

दुष्काळ, जिल्हा बँक आणि राजकारण : नाण्याच्या दोन बाजू एकत्र आल्या! पुढे काय…

29/09/2026

मंगळवार २९ सप्टेंबर — जाणून घ्या आजच्या दिवसाचे राशिभविष्य

28/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » दिवाळी होणार गोड… राजहंस दूध संघाने दूध उत्पादक शेतकरी, ठेकेदार, कामगारांच्या बँक खात्यावर तब्बल 35.66 कोटी रुपये केले वर्ग! दूध संघाचे अध्यक्ष रणजीतसिंह देशमुख यांची माहिती
शेती व सहकार

दिवाळी होणार गोड… राजहंस दूध संघाने दूध उत्पादक शेतकरी, ठेकेदार, कामगारांच्या बँक खात्यावर तब्बल 35.66 कोटी रुपये केले वर्ग! दूध संघाचे अध्यक्ष रणजीतसिंह देशमुख यांची माहिती

Annant PpangarkarBy Annant Ppangarkar02/11/2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज

संगमनेर : काँग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेल्या संगमनेर तालुका दूध उत्पादक संघाने (राजहंस दूध) दीपावलीच्या अगोदरच दूध दर फरक, दुधाचे पेमेंट, दूध वाहतूक ठेकेदारांचे पेमेंट, अनामत, कामगारांचा बोनस, मेहनताना, पगार, व्यापारी देणे, चढ-उतार निधी असे एकूण 35.66 कोटी रुपये संबंधितांच्या खात्यावर बँकेत वर्ग करण्यात आल्याची माहिती दूध संघाचे अध्यक्ष रणजीतसिंह देशमुख यांनी दिली.

देशमुख म्हणाले, थोर स्वातंत्र्य सेनानी सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या आदर्श तत्त्वावर आमदार थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली वाटचाल करणाऱ्या राजहंस दूध संघाच्या माध्यमातून संगमनेर तालुक्याची ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत झाली. दूध संघाच्या माध्यमातून सातत्याने शेतकरी व नागरिकांना मदत करण्यात आली. थोरात यांच्याच मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेल्या अमृत उद्योग समूहाच्या माध्यमातून दरवर्षी दीपावली निमित्त शेकडो कोटी रुपये संबंधितांच्या बँक खात्यावर वर्ग केले जातात. या माध्यमातून बाजारामध्ये शेकडो कोटी रुपयांची उलाढाल होत असते.

सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांचे हे जन्मशताब्दी वर्ष असून यावर्षी दूध उत्पादक व कामगारांची दिवाळी गोड करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. राजहंस दूध संघाकडून दरवर्षी चांगल्या प्रतीच्या दूध पुरवठ्यावर दूध उत्पादकांना जास्तीत जास्त दूध दर फरक अदा करण्यात येतो. तब्बल 35.66 कोटी रुपये बँक खात्यावर वर्ग करण्यात आल्याने दूध उत्पादक, दूध वाहतूक ठेकेदार, कामगार व व्यापारी वर्गामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

दूध संघाची मागील वर्षाची उलाढाल 530.38 कोटी रुपयांची झाली, ही संगमनेर तालुक्यातील सहकारासाठी अत्यंत अभिमानाची बाब आहे.

पैसे संबंधितांच्या बँक खात्यावर वर्ग करण्याच्या निर्णयावेळी अध्यक्ष रणजितसिंह देशमुख, उपाध्यक्ष राजेंद्र चकोर, संचालक लक्ष्मणराव कुटे, आर. बी. राहणे, विलासराव वर्पे, भास्करराव सिनारे, संतोष मांडेकर, विलास कवडे, बबनराव कुऱ्हाडे, बादशहा वाळुंज, संजय पोकळे, विक्रम थोरात, विष्णू ढोले, तुकाराम दातीर, रवींद्र रोहम, भारत मुंगसे, डॉ. प्रमोद पावसे, प्रतिभा जोंधळे, मंदा नवले, कार्यकारी संचालक डॉ. सुजित खिलारी, जनरल मॅनेजर गणपत शिंदे आदी उपस्थित होते.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,158
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

सोशल मीडियावर खोटे पसरवणाऱ्यांचा बंदोबस्त करा: माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचा इशारा; संगमनेरची आर्थिक समृद्धी टिकवण्यासाठी संघर्षाचे आवाहन

21/09/2026

राज्यात सरसकट दुष्काळ जाहीर करा; माजी कृषिमंत्री बाळासाहेब थोरात यांची मागणी, रेल्वेप्रश्नी लोकप्रतिनिधीच्या बालिश वक्तव्यावरही केले भाष्य

19/09/2026

थोरात कारखान्याचे ११ लाख मेट्रिक टनाचे गाळप उद्दिष्ट; बॉयलर अग्नीप्रदीपन समारंभात बाळासाहेब थोरात यांचे आवाहन

19/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

‘पैशाचा पाऊस’ पडणारच होता, पण…; अहिल्यानगरमध्ये ९२ लाखांच्या बनावट नोटांसह टोळी गजाआड!

By Annant Ppangarkar29/09/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – नागरिकांच्या अज्ञानाचा आणि अंधश्रद्धेचा फायदा घेत ‘पैशाचा पाऊस’ पाडण्याचे आमिष…

दुष्काळ, जिल्हा बँक आणि राजकारण : नाण्याच्या दोन बाजू एकत्र आल्या! पुढे काय…

29/09/2026

मंगळवार २९ सप्टेंबर — जाणून घ्या आजच्या दिवसाचे राशिभविष्य

28/09/2026

मुलांऐवजी पालकांसाठी संस्कार शिबिर घ्या! — डॉ. संजय कळमकर यांचा घणाघाती टोला; बालकुमार साहित्य संमेलनात रंगली वैचारिक चर्चा

28/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.