Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेर नगरपरिषदेच्या पथ विक्रेता तक्रार निवारण समितीवर श्रीनिवास पगडाल आणि कृष्णा वालझाडे यांची निवड

11/09/2026

आज शुक्रवार ११सप्टेंबर — असे आहे आजच्या दिवसाचे राशिभविष्य

11/09/2026

तरुणांच्या प्रश्नांवर उत्तरदायित्व मागण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचा उपक्रम; ‘जय भीम Gen-Z’ टाउनहॉल मालिकेचा टीझर प्रदर्शित

10/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » केंद्रातून परत बोलविले; आयुष्यमान भारत मिशनच्या अंमलबजावणीसाठी राज्याच्या कक्ष प्रमुखपदी आता उपमुख्यमंत्र्यांच्या विश्वासातील या डॉक्टरांवर जबाबदारी
आरोग्य

केंद्रातून परत बोलविले; आयुष्यमान भारत मिशनच्या अंमलबजावणीसाठी राज्याच्या कक्ष प्रमुखपदी आता उपमुख्यमंत्र्यांच्या विश्वासातील या डॉक्टरांवर जबाबदारी

राज्यातल्या आरोग्य व्यवस्थेमध्ये सुसूत्रता व सुधारणा करण्यासाठी निवड
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar03/11/2023Updated:04/11/2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज

मुंबई : केंद्र शासनाच्या आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व राज्य सरकारच्या महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेच्या एकत्रित अंमलबजावणीसाठी केंद्रात असलेल्या डॉ. ओमप्रकाश शेटे यांना पुन्हा महाराष्ट्रात बोलाविण्यात आले आहे.

डॉ. शेटे यांच्याकडे राज्यातल्या आरोग्य व्यवस्थेमध्ये सुसूत्रता व सुधारणा करण्यासाठी या नवीन अभियानाची धुरा देण्यात आल्याचं समजते. डॉ. शेटे हे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू समजले जातात. मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष व केंद्रीय आरोग्य राज्यमंत्र्यांचे सहाय्यक खासगी सचिव राहिलेल्या डॉ. शेटे यांनी तत्कालीन भाजप-शिवसेना सरकारच्या कार्यकाळात मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाच्या माध्यमातून फडणवीस सरकारची प्रतिमा घराघरात पोहोचविण्याचे काम केले होते.

दिवस-रात्र काम करत साडेचार वर्षाच्या कार्यकाळात डॉ. शेटे यांनी राज्याच्या इतिहासातील सर्वात जास्त निधी सर्वसामान्य रुग्णांच्या उपचारासाठी पोहोचविण्याचे काम केले होते. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा रुग्णसेवेचा संदेश घेऊन राज्यभर आरोग्य शिबिरे भरवली होती. अतिशय दुर्गम व नक्षलग्रस्त भागात सरकारची रुग्णसेवा पोहोचवली होती.

तत्कालीन मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाचे प्रमुख राहिलेले डॉ. शेटे सध्या केंद्र सरकारच्या आरोग्य मंत्रालयामध्ये सहाय्यक सचिव म्हणून कार्यरत आहेत. मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षात असताना धर्मादाय व महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेचे सदस्य म्हणून देखील त्यांनी काम पाहिलेलं आहे.

त्यांच्या कार्यकाळामध्ये मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता व धर्मादाय किंवा महात्मा फुले योजनेतील लाभार्थ्यांना आरोग्य उपचाराच्या दृष्टीने मोठा लाभ झाला आहे. डॉ. शेटे यांनी 2014 ते 2019 या कार्यकाळात सामान्य माणूस केंद्रबिंदू मानून पैशाअभावी किंवा उपचाराअभावी सामान्य माणसाचा जीव जाता कामा नये, हा देवेंद्र फडणवीस यांचा संदेश राज्यातल्या कानाकोपऱ्यापर्यंत नेला.

त्यांची खासियत म्हणजे सर्वपक्षीय संबंध, कोणताही पक्षीय भेदाभेद न करता, कुठलीही शिफारस न घेता प्राणाणिकपणे काम करणे. सर्वसामान्य रुग्णांना जात, धर्म,पंथ विरहित न्याय देण्याचा प्रयत्न त्यांच्या कार्यकाळात झाला. त्यामुळेच त्यांनी राज्यभरात देवदूत म्हणून ओळख आहे. शेटे यांच्याकडून सर्वसामान्य व गरजवंत रुग्णांच्या खूप मोठ्या अपेक्षा आहेत.

 

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 776
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयातील ढिसाळ कारभारावर शिवसेना शहरप्रमुख विनोद सूर्यवंशी आक्रमक; आंदोलनाचा इशारा

19/07/2026

मध्यरात्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे रुग्णालयात दाखल; आगामी दौरे आणि कार्यक्रम तूर्तास पुढे ढकलले

04/07/2026

केमिकलयुक्त दूषित पाण्यामुळे बदापूर येथील शेती धोक्यात; विहिरींचे पाणी दूषित, तलावातील मासे मृत

11/06/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
निवड

संगमनेर नगरपरिषदेच्या पथ विक्रेता तक्रार निवारण समितीवर श्रीनिवास पगडाल आणि कृष्णा वालझाडे यांची निवड

By Annant Ppangarkar11/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – संगमनेर नगरपरिषद क्षेत्रासाठीच्या पथ विक्रेता तक्रार निवारण व…

आज शुक्रवार ११सप्टेंबर — असे आहे आजच्या दिवसाचे राशिभविष्य

11/09/2026

तरुणांच्या प्रश्नांवर उत्तरदायित्व मागण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचा उपक्रम; ‘जय भीम Gen-Z’ टाउनहॉल मालिकेचा टीझर प्रदर्शित

10/09/2026

अवैध मावा तयार करणाऱ्या कारखान्यावर एलसीबीचा छापा; १९ वर्षांच्या तरुणासह १ लाख ५ हजारांचा मुद्देमाल जप्त

10/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.