Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेरमध्ये वृद्ध शेतकऱ्याला भरदुपारी लुटले; पावणेदोन लाखांच्या रोकडसह धनादेश लंपास

June 6, 2026

वीज चोरी पकडणाऱ्या कंत्राटी वायरमनने मागितली ५० हजारांची लाच! गुन्हा दाखल, वायरमन अटकेत; सोमवारपर्यंत पोलीस कोठडी

June 6, 2026

मालपाणी बजाज शोरूममधील मारहाण प्रकरण: आरोपींच्या अटकेसाठी संगमनेर प्रशासकीय भवनावर मोर्चा; तीव्र आंदोलनाचा इशारा

June 6, 2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » एक कोटीचा लाचखोर! नासिक एसीबीची नगरमध्ये सर्वात मोठी कारवाई..! सहाय्यक अभियंता रंगेहात पकडला; दोघा लाचखोरांवर गुन्हा दाखल
गुन्हेगारी

एक कोटीचा लाचखोर! नासिक एसीबीची नगरमध्ये सर्वात मोठी कारवाई..! सहाय्यक अभियंता रंगेहात पकडला; दोघा लाचखोरांवर गुन्हा दाखल

जिल्ह्यात लाचखोरी बोकाळली
अनंत पांगारकरBy अनंत पांगारकरNovember 4, 2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज

अहमदनगर : शे-पन्नास रुपयांची लाचखोरी आता तब्बल कोटीच्या घरात गेली आहे. लाचखोरीचे ग्रहण एमआयडीसी अधिकाऱ्यांनाही लागल्याचे समोर आले असून अहमदनगर येथील सहाय्यक अभियंता अमित किशोर गायकवाड (वय 32, रा. प्लॉट नंबर 2, आनंदविहार, नागापूर, अहमदनगर मूळ रा. चिंचोली ता. राहुरी) याला तब्बल एक कोटी रुपयांची लाच स्वीकारताना नाशिकच्या एसीबीने रंगेहात पकडले आहे.

गायकवाड याने लाचेची रक्कम स्वतःसाठी व तत्कालीन उपविभागीय अभियंता गणेश वाघ यांच्यासाठी स्वीकारली असल्याची माहिती देण्यात आली आहे. छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय ठेकेदाराने नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे याबाबत तक्रार केली होती. शुक्रवारी केलेल्या या कारवाईबाबत गोपनीयता बाळगली होती. नाशिक विभागात झालेली ही सर्वात मोठी कारवाई असल्याची माहिती समोर येत आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या अधिकाऱ्याला लाच घेताना पकडण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.

छत्रपती संभाजीनगरच्या एका शासकीय ठेकेदाराने अहमदनगर येथील औद्योगिक विकास महामंडळाअंतर्गत (MIDC) 100 एमएम व्यासाची पाईपलाईन टाकण्याचे काम केले होते. या कामाचे 2 कोटी 66 लाख 99 हजार 244 रूपयांचे बिल मिळावे, यासाठी सदर बिलांवर तत्कालीन उपविभागीय अभियंता गणेश वाघ याच्या मागील तारखेचे आउटवर्ड करुन त्यावर त्याच्या सह्या घेवुन सदरचे देयक पाठविण्याचे मोबदल्यात गायकवाड याने स्वतःसाठी तसेच वाघ याच्याकरीता या बिलाच्या कामाचे व यापुर्वीच्या अदा केलेल्या काही बिलांची बक्षिसी म्हणुन एक कोटी रूपये लाचेची मागणी केली होती.

त्यामुळे या ठेकेदाराने नाशिक एसीबीकडे तक्रार केली होती. तक्रारीनंतर एसीबीच्या नाशिक पथकाने शुक्रवारी दुपारी नगर-छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील शेंडी शिवारात आनंद सुपर मार्केट बिंल्डिंगच्या बाजुला सापळा लावला होता.

संबंधित ठेकेदाराकडून लाचेची एक कोटी रूपयांची रक्कम एका इनोव्हा कारमध्ये पंच, साक्षीदारांसमक्ष स्विकारली. त्याचवेळी गायकवाड याने त्याच्या मोबाईलवरुन वाघ याला फोन करून लाचेची रक्कमेबाबत माहिती दिली व त्याच्या हिस्स्याची 50 टक्के कोठे पोहचवावी बाबत विचारले असता वाघ याने सांगीतले की, ‘राहु दे तुझ्याकडे, बोलतो मी तुला. ते तुलाच पोहचवायचे आहे एका ठिकाणी, सांगतो नंतर, सध्या तुझ्या सेफ कस्टडीमध्ये ठेवुन दे’, असे म्हणुन वाघ याने गायकवाड याला सांगितले. या दरम्यान पथकाने गायकवाड याला लाचेची रक्कम स्वीकारताना पकडले.

गायकवाड आणि वाघ या दोघांविरुद्ध नगर एमआयडीसी पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तब्बल एक कोटी रुपयांची लाचखोरी समोर आल्याने नगर जिल्ह्यात किती मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार बोकाळला आहे याचे हे एक ज्वलंत उदाहरण ठरले आहे.

 

 

anantpangarkar
अनंत पांगारकर

Post Views: 1,189
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
अनंत पांगारकर
  • Website

Related Posts

संगमनेरमध्ये वृद्ध शेतकऱ्याला भरदुपारी लुटले; पावणेदोन लाखांच्या रोकडसह धनादेश लंपास

June 6, 2026

वीज चोरी पकडणाऱ्या कंत्राटी वायरमनने मागितली ५० हजारांची लाच! गुन्हा दाखल, वायरमन अटकेत; सोमवारपर्यंत पोलीस कोठडी

June 6, 2026

पोलिसांची मोठी कारवाई: कत्तलीसाठी चालवलेल्या गोवंशासह तिघांना पकडले; ८ लाखांचा मुद्देमाल जप्त

June 5, 2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

संगमनेरमध्ये वृद्ध शेतकऱ्याला भरदुपारी लुटले; पावणेदोन लाखांच्या रोकडसह धनादेश लंपास

By अनंत पांगारकरJune 6, 20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, संगमनेर: बँकेतून पैसे काढून घराकडे चाललेल्या एका वृद्ध शेतकऱ्याचे लक्ष विचलित…

वीज चोरी पकडणाऱ्या कंत्राटी वायरमनने मागितली ५० हजारांची लाच! गुन्हा दाखल, वायरमन अटकेत; सोमवारपर्यंत पोलीस कोठडी

June 6, 2026

मालपाणी बजाज शोरूममधील मारहाण प्रकरण: आरोपींच्या अटकेसाठी संगमनेर प्रशासकीय भवनावर मोर्चा; तीव्र आंदोलनाचा इशारा

June 6, 2026

आज शनिवार, ६ जून २०२६ – कसा असेल तुमचा आजचा दिवस जाणून घ्या

June 6, 2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.