Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

गुरुवार ०१ आक्टोंबर २०२६ — जाणून घ्या आजच्या दिवसाचे राशिभविष्य

01/10/2026

अंगारकी चतुर्थीनिमित्त श्री वरदविनायकाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी, आमदार डॉ. किरण लहामटे यांच्यासह हजारो भाविकांनी घेतले दर्शन; खिचडी महाप्रसाद व सामुदायिक अथर्वशीर्ष पठणाने कोतूळ नगरी भक्तिमय

30/09/2026

संगमनेरकरांची सुरक्षा होणार अधिक भक्कम; नगरपरिषदेसाठी २ नवीन अग्निशामक वाहनांना प्रशासकीय मान्यता, आमदार अमोल खताळ यांच्या प्रयत्नांना यश! साक्षी सूर्यवंशी यांची माहिती

30/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » दूधगंगा पतसंस्था 81 कोटींचा गैरव्यवहार प्रकरण; सह आरोपी कॅशियर उत्तम लांडगे यांना जामीन मंजूर
न्यायालय

दूधगंगा पतसंस्था 81 कोटींचा गैरव्यवहार प्रकरण; सह आरोपी कॅशियर उत्तम लांडगे यांना जामीन मंजूर

न्यायालयाने केले फिर्यादीवर प्रश्नचिन्ह उपस्थित!
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar04/11/2023No Comments3 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज

संगमनेर : दूधगंगा नागरी सहकारी पतसंस्थेच्या 81 कोटी रुपयांच्या अपहार प्रकरणातील सहआरोपी व अटकेमध्ये असलेल्या कॅशियर उत्तम लांडगे याला संगमनेरच्या जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. दरम्यान या प्रकरणातील मुख्य आरोपींपैकी केवळ व्यवस्थापकाला अटक झाले असून उर्वरित सर्व आरोपी बाहेर आहेत. मुख्य आरोपींपैकी काहींचे अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळण्यात आले तर काहींना जामीन मिळाला आहे.

व्हाईट कॉलर पुढारी आणि दूधगंगा पतसंस्थेचा अध्यक्ष असलेल्या भाऊसाहेब कुटे याच्यासह त्याच्या कुटुंबातील सहा व्यक्तींसोबत एकूण 15 जणांवर तब्बल 81 कोटी रुपयांचा अपहार केल्याचा तर या अपहाराला सहाय्य केल्याचा सहा जणांवर संगमनेर शहर पोलीस ठाण्यात 19 ऑगस्टला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या सहा जणांमध्ये उत्तम शंकर लांडगे यांचा समावेश होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर काही दिवसांनी लांडगे स्वतःहून आर्थिक गुन्हे शाखेसमोर हजर झाले होते. तब्बल महिनाभर तुरुंगात असलेल्या लांडगे यांनी संगमनेरच्या जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला होता.

जिल्हा न्यायाधीश योगेश मनाठकर यांच्यासमोर या जामीन अर्जाची सुनावणी झाली. आरोपी उत्तम लांडगे यांच्यावतीने ॲड. श्रीराम गणपुले यांनी केलेल्या युक्तिवादात दूधगंगा पतसंस्थेतील पैशाचा गैरवापर 17 आरोपींनी मिळून केलेला आहे. उत्तम लांडगे हे त्या सतरा आरोपी पैकी नसून त्यांनी सदर पतसंस्थेत केवळ कॅशियर म्हणून काम केले होते. कॅशियर चे काम अत्यंत मर्यादित होते ठेवी संदर्भात निर्णय कॅशियर कधी घेत नव्हते संस्थेचे अध्यक्ष सचिव यांच्या निर्देशाप्रमाणे काम करणे इतकीच त्यांची ड्युटी होती.

संस्थेचे चेअरमन भाऊसाहेब कुटे, व्यवस्थापक भाऊसाहेब गुंजाळ, चिफ अकाउंटंट हे तिघेजण संस्थेतील तत्कालीन कॅशियरकडून वेळोवेळी रोख रकमा घेऊन गेले. रोख रकमेच्या अपहारात कॅशियरवर चेअरमन, मॅनेजर, अकाउंटंट यांनी दबाव टाकला होता. कॅशियरने त्यांच्याकडे रकमेची मागणी केली असता, रकमा तूच घेऊन गेला, असे धमकावून तुझ्यावर कारवाई करतो. असा नंतर दबाव टाकला. म्हणून कॅशियर आरोपीने सदर तिघांच्या म्हणण्यानुसार वेळोवेळी रकमा दिल्या. प्राप्त परिस्थिती बघता कॅशियर हे प्रत्यक्ष लाभार्थी असल्याचे दिसून येत नाही. मात्र उपजीविकेचे साधन हिरावून जाऊ नये या धाकाने ते बळी पडले असल्याचे दिसते असे म्हटले.

तर सरकार पक्षातर्फे विधीज्ञ मच्छिंद्र गवते यांनी अर्जदार व आरोपींनी एकमेकांशी संगणमत करून जनतेच्या पैशाचा अपहार केला आहे. ठेविदारांनी विश्वासाने पतसंस्थेत ठेवी ठेवल्या होत्या. त्या पैशाचा अपहार झाला असून अपहाराची रक्कम जवळपास 81 कोटी रुपये आहे. या आर्थिक घोटाळ्याचे स्वरूप व व्यापकता प्रचंड मोठी असल्याने आरोपीला जामीन दिला जाऊ नये, असे सांगितले

याशिवाय आरोपीने 75 लाख रुपयांचे कर्ज स्वतः घेतले असून सदर कर्ज नील करण्याकरता व्यवस्थापक भाऊसाहेब गुंजाळ याचा भाऊ विजय विठ्ठल गुंजाळ यांच्या बचत खात्यात बोगस रकमा दर्शवून त्या रकमा ट्रान्सफर करून आरोपीने स्वतःचे कर्ज नील केले आहे. आरोपीने दैनंदिन काम करताना खात्यावरील व्यवहार नोंदविलेला आहे. खातेदार समक्ष आजार नसताना बनावट सह यांच्या आधारे रकमा देणे स्वतः व्याजाच्या चुकीच्या नोंदी करणे पतसंस्थेच्या इतर बँकात नसलेल्या मुदत ठेव पावत्यांबाबत बोगस रेकॉर्ड तयार करणे व्यक्तिगत खर्चाच्या नोंदी पतसंस्थेच्या महसुली खर्चात नोंदविणे अवैधरित्या देणे अशा प्रकारच्या गैर व्यवहारात आरोपीचा सहभाग आहे.

जिल्हा न्यायाधीश योगेश मनाठकर यांनी दोन्ही वकिलांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर कॅशियरला तुरुंगात डांबून ठेवून प्रकरणाच्या सुनावणीपूर्वी शिक्षा देणे न्यायोचित ठरणार नसल्याचे स्पष्ट करत जामीन अर्ज मंजूर करीत 50 हजार रुपयांच्या व्यक्तिगत जात मुचलक्यावर व त्याच रकमेच्या जामिनावर सोडण्याचे आदेश दिले. आता या प्रकरणी तपास यंत्रणा काय भूमिका घेते याकडे लक्ष लागले आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,607
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेर एम.डी. ड्रग्ज रॅकेटचे धागेदोर कोणापर्यंत? जिल्हा न्यायालयात नेमकं काय घडलं… आता एक नव्हे तर चार आरोपी

28/09/2026

चेक अनादर प्रकरणात संगमनेर न्यायालयाने आरोपीस ठोठावला एक वर्षाचा कारावास; दोन लाखांची नुकसान भरपाई व ९ टक्के व्याजासह रक्कम देण्याचा निर्णय

23/09/2026

फायनान्सचा चेक बाऊन्स: अकोले तालुक्यातील कर्जदाराला ६ महिने कारावास आणि दुप्पट दंडाची शिक्षा

04/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राशिभविष्य

गुरुवार ०१ आक्टोंबर २०२६ — जाणून घ्या आजच्या दिवसाचे राशिभविष्य

By Annant Ppangarkar01/10/20260

आजचे राशिभविष्य –  मेष – आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत उत्साहाचा आणि नवीन ऊर्जा घेऊन येणारा…

अंगारकी चतुर्थीनिमित्त श्री वरदविनायकाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी, आमदार डॉ. किरण लहामटे यांच्यासह हजारो भाविकांनी घेतले दर्शन; खिचडी महाप्रसाद व सामुदायिक अथर्वशीर्ष पठणाने कोतूळ नगरी भक्तिमय

30/09/2026

संगमनेरकरांची सुरक्षा होणार अधिक भक्कम; नगरपरिषदेसाठी २ नवीन अग्निशामक वाहनांना प्रशासकीय मान्यता, आमदार अमोल खताळ यांच्या प्रयत्नांना यश! साक्षी सूर्यवंशी यांची माहिती

30/09/2026

महात्मा गांधी जयंतीनिमित्त संगमनेरमध्ये जयहिंदच्या वतीने विविध उपक्रम; १५७ विद्यार्थ्यांची प्रभात फेरी अन् ‘जवाहरलाल हाजीर हो’ पुस्तकाचे प्रकाशन

30/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.