Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

आजच्या म्हणजेच १६ नोव्हेंबर २०२६ चे राशिभविष्य

16/11/2026

राष्ट्रीय स्तरावर संगमनेरच्या ‘अमृतवाहिनी’चा दुहेरी डंका! गोव्यात आयएसटीईच्या दोन मानाच्या पुरस्कारांनी गौरव; ‘बेस्ट ग्रीन कॅम्पस’ अन् ‘बेस्ट इनोव्हेशन’वर कोरले नाव

15/11/2026

नाशिक-पुणे रेल्वेचा अंतिम निर्णय कधी? ६० दिवसांची मुदत संपली, समितीचा अभ्यास अद्याप सुरूच; जनसुनावणीसाठी आमदार सत्यजीत तांबे आग्रही

15/11/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » जिल्ह्यात मराठा कुणबी, कुणबी मराठा व कुणबी जातीचे पुरावे तपासणी मोहीम युद्धपातळीवर… जिल्हाधिकारी कार्यालयासह तालुकास्तरावरही “विशेष कक्ष” कार्यान्वीत
प्रशासन

जिल्ह्यात मराठा कुणबी, कुणबी मराठा व कुणबी जातीचे पुरावे तपासणी मोहीम युद्धपातळीवर… जिल्हाधिकारी कार्यालयासह तालुकास्तरावरही “विशेष कक्ष” कार्यान्वीत

Annant PpangarkarBy Annant Ppangarkar05/11/2023No Comments3 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज

अहमदनगर : शनिवारपासून जिल्ह्यात मराठा कुणबी व कुणबी मराठा, कुणबी जातीचे पुरावे तपासणीची विशेष मोहीम युद्धपातळीवर सुरू झाली आहे. यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आज ‘विशेष कक्ष’ कार्यान्वित करण्यात आला.

मराठवाड्यात कुणबी नोंदी शोधण्यासाठी मोहीम राबविण्यात आली, त्याप्रमाणे आता संपूर्ण राज्यभर ही प्रक्रिया मिशन मोडवर राबविण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांना दिले होते. यावर नाशिक विभागीय आयुक्तांनी जिल्हाधिकारी कार्यालयांमध्ये यासंदर्भात “स्वतंत्र कक्ष” स्थापन करण्याचे निर्देश दिले आहेत.

या पार्श्वभूमीवर अहमदनगर जिल्ह्यात सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील मराठा- कुणबी नोंदी शोधण्यासाठी ४ नोव्हेबर पासूनच विशेष मोहीम हाती घेतली असून यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात “विशेष कक्ष” कार्यान्वित करण्यात आला आहे.

जिल्हास्तरीय कक्ष :-

जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ यांनी जिल्ह्यात अपर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील कक्ष स्थापन करण्याचा आदेश जारी केला आहे‌. निवासी उपजिल्हाधिकारी या कक्षाचे सदस्य सचिव असणार आहेत. तर सदस्य म्हणून जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्राम पंचायत), शिक्षणाधिकारी (प्राथमिक), शिक्षणाधिकारी (माध्यमिक) व सहायक आयुक्त (नगरपालिका प्रशासन) हे असणार आहेत.

तालुकास्तरीय कक्ष :-

तालुकास्तरावर तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली कक्ष स्थापन करण्यात आला आहे. निवासी नायब तहसीलदार हे सदस्य सचिव असणार आहेत. सदस्य सचिव म्हणून गटविकास अधिकारी, गटशिक्षणाधिकारी, मुख्याधिकारी (नगरपालिका/नगरपंचायत) हे असणार आहेत.

तपासणी केलेली कागदपत्रे व नोंदी मिळालेली कागदपत्रे याची निर्दोष यादी तयार करण्यासाठी संपूर्ण अहमदनगर महसूल प्रशासन आजपासून कामाला लागले आहे. जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ यांच्या मार्गदर्शनाखाली अन्य सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, नायब तहसिलदार आणि महसूल कर्मचारी युद्धपातळीवर काम करीत आहेत. याबाबत जिल्हाधिकारी श्री.सालीमठ स्वतः बारकाईने या कामावर लक्ष ठेवणार आहेत.

असे असेल समितीचे कामकाज :-

महसूल अभिलेखे खसारा पत्रक, पाहणी पत्रक, क पत्रक, कुळ नोंदवही. नागरिकांचे राष्ट्रीय रजिस्टर सन वही व सातबारा उतारे. १९५१ नमुना नंबर १, नमुना नंबर २, हक्क नोंद, जन्म-मृत्यु रजिस्टर गाव नमुना क्रमांक १४,शैक्षणिक अभिलेखे प्रवेश निर्गम नोंदवही / जनरल रजिस्टर, राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे अभिलेखे अनुन्याप्ती नोंदवहया, मळी नोंदवही, ताडी नोंदवही अस्थापना अभिलेख, कारागृह विभागाचे अभिलेखे रजिस्टर ऑफ अंडर ट्रायल प्रिझनर, कच्च्या कैद्यांची नोंदवही, पोलीस विभाग गाववारी, गोपनीय रजिस्टर C1, C2. क्राईम रजिस्टर, अटक पंचनामे व एफ आयआर रजिस्टर, सह जिल्हा निबंधक तथा मुद्रांक जिल्हाधिकारी खरेदी खत नोंदणी रजिस्टर, डे बुक करार खत, साठेखत, इसार पावती भाडे चिट्ठी, ठोके पत्रक, बटाई पत्रक, दत्तक विधान पत्रक, मृत्युपत्र, इच्छापत्रक, तडजोड पत्र ई दस्त, भूमि अभिलेख विभाग पक्का बुक, शेतवार पत्रक, वसुली बाकी, उल्ला बुक, रिविजन प्रतिबुक, क्लासेस रजिस्टर व हक्क नोंदणी पत्रक, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी माजी सैनिकांच्या नोंदी, जिल्हा वफ्फ अधिकारी यांचे कडील मुंतखब, शासकीय कर्मचाऱ्यांच्या सेवा तपशील सन १९६७ पूर्वीचे कर्मचाऱ्यांचा सेवा तपशील, जात प्रमाणपत्र पडताळणी समिती वैध व अवैध प्रकरणांचा तपशील व कारणे आदींची तपासणी करण्यात येणार आहे. 

वरील अभिलेख तसेच तालुकास्तरावर विविध शासकीय विभागातील १९६७ पुर्वीच्या कागदपत्रांची पडताळणी तपासणी करावयाची आहे. त्यात कुणबी कागदपत्रे आढळल्यास त्यांचे स्कॅनिंग करून जतन करावे तसेच तपासलेले कागदपत्र व आढळलेल्या नोंदी यांची माहिती दैनंदिन स्वरुपात जिल्हा समितीने प्राप्त करुन घेवून जिल्हा समिती विभागीय समितीस तसेच जिल्ह्याचे संकेतस्थळावर अद्ययावत करावी सदस्यांनी तालुका कक्षास भेट देवून चाललेल्या कामाची प्रगती तपासावी अशा सूचना देण्यात आलेल्या आहेत उपरोक्त सर्व अभिलेख शोधणे करीत प्रशासकीय स्तरावरील अभिलेख शोधणे बाबत नियोजन करण्यात आलेले असून‌ नागरिकांना त्यांचे कडील १९६७ पूर्वीचे शासकीय पुरावे जिल्हाधिकारी कार्यालयातील कक्षात तसेच तालुका स्तरावरील कक्षात दाखल करता येतील.

नागरिकांनी त्यांच्याकडील‌१९६७ पूर्वीचे शासकीय पुरावे असणारे अभिलेख (मराठी व्यतिरिक्त इतर भाषेत असल्यास सक्षम भाषांतरकार यांचे कडून भाषांतरित) जिल्हाधिकारी कार्यालयातील कक्षात तसेच तालुका स्तरावरील कक्षात दाखल करावे.असे आवाहन जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ यांनी केले आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 615
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेरमधील शासकीय आणि आरक्षित जमिनीवरील अतिक्रमणाविरोधात प्रशासकीय हालचालींना वेग, मोजणीसह चौकशीचे आदेश

22/10/2026

सरकारी जमिनीवर अतिक्रमण! प्रशासनाचा डोळेझाक कारभार; अधिकाऱ्यांना सरकारी मालमत्ता सांभाळता येईना

14/10/2026

५० लाखांची कथित खंडणी अन् प्रशासकीय अनागोंदी: मुख्याधिकारी सक्तीच्या रजेवर, जिल्हाधिकाऱ्यांची कठोर कारवाई; नायब तहसीलदार मोहसीन शेख यांच्याकडे अतिरिक्त पदभार

24/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राशिभविष्य

आजच्या म्हणजेच १६ नोव्हेंबर २०२६ चे राशिभविष्य

By Annant Ppangarkar16/11/20260

मेष – आजचा दिवस ऊर्जा आणि उत्साहाने भरलेला असेल. कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या अंगावर येऊ…

राष्ट्रीय स्तरावर संगमनेरच्या ‘अमृतवाहिनी’चा दुहेरी डंका! गोव्यात आयएसटीईच्या दोन मानाच्या पुरस्कारांनी गौरव; ‘बेस्ट ग्रीन कॅम्पस’ अन् ‘बेस्ट इनोव्हेशन’वर कोरले नाव

15/11/2026

नाशिक-पुणे रेल्वेचा अंतिम निर्णय कधी? ६० दिवसांची मुदत संपली, समितीचा अभ्यास अद्याप सुरूच; जनसुनावणीसाठी आमदार सत्यजीत तांबे आग्रही

15/11/2026

५० लाख शेतकरी आणि ८१ लाख महिला मदतीपासून वंचित; किसान सभा आंदोलनाच्या पवित्र्यात

15/11/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
November 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« Oct    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.