Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

स्वातंत्र्य दिन विशेष: ८० वर्षांचा भारत; स्वातंत्र्य मिळाले, पण आपण खरेच स्वतंत्र झालो का?

August 15, 2026

स्वातंत्र्य दिन विशेष: देशाला स्वातंत्र्य मिळाले, पण आम्हाला स्वातंत्र्य मिळाले का?

August 15, 2026

शनिवार, १५ ऑगस्ट २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

August 15, 2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » शरीर संबंधाचे आक्षेपार्ह फोटो काढून व्हायरल करण्याची धमकी दिली… अनैसर्गिक शारीरिक संबंध ठेवले… प्रकरणातील आरोपीच्या अटकपूर्व जामीनावर न्यायालयाने दिला ‘हा’ निर्णय
न्यायालय

शरीर संबंधाचे आक्षेपार्ह फोटो काढून व्हायरल करण्याची धमकी दिली… अनैसर्गिक शारीरिक संबंध ठेवले… प्रकरणातील आरोपीच्या अटकपूर्व जामीनावर न्यायालयाने दिला ‘हा’ निर्णय

अनंत पांगारकरBy अनंत पांगारकरNovember 6, 2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज

संगमनेर : तीन महिने पीडितेवर अनैसर्गिक शरीर संबंध केल्याचा तसेच शरीर संबंधाचे आक्षेपार्ह फोटो काढून ते व्हायरल करण्याची धमकी दिल्याचा आरोप असणाऱ्या आरोपीच्या अटकपूर्व जामीन अर्ज संगमनेरच्या जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाने मंजूर केला आहे.

पहिला विवाह लपवून ठेवत पीडित महिलेसोबत दुसरा विवाह करून तीन महिने अनैसर्गिक शारीरिक संबंध करून तिचा मानसिक व शारीरिक छळ केला. शरीर संबंधाचे आक्षेपार्ह फोटो काढून ते व्हायरल करण्याची धमकी दिली असा आरोप करत पीडित महिलेने संगमनेर तालुक्यातील आरोपी विरोधात सांगवी (पुणे) पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल केली होती.

पीडित महिलेने सांगवी पोलीस ठाण्यात केलेल्या तक्रारीचा हा गुन्हा संगमनेर शहर पोलिसांकडे वर्ग करण्यात आला होता. शहर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक दाभाडे या प्रकरणी तपास करत आहे.

या संदर्भात आरोपीने अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी संगमनेरच्या जिल्हा अतिरिक्त सत्र न्यायालयात ॲड. शरीफ पठाण यांच्यामार्फत अर्ज दाखल केला होता. जिल्हा व सत्र न्यायाधीश वाय. एच. अमेठा यांच्या न्यायालयासमोर या जामीन अर्जाची सुनावणी झाली.

सुनावणी दरम्यान आरोपीच्या वकिलांनी अर्जदार आरोपी निर्दोष असल्याचे न्यायालयाला सांगितले. त्याने पूर्वीचे लग्न लपवून पिडीतेसोबत कोणतेही गैरकृत्य केल्याचे बाब स्पष्टपणे नाकारली. तसेच आरोपीने पिडीतेचे कोणतेही आक्षेपार्ह फोटो काढले नसल्याचा युक्तीवाद केला. पिडीतेला केवळ आरोपीच्या मुलाचा सांभाळ करण्यासाठी कामास ठेवले होते. दरम्यान काही दिवसांपूर्वी आरोपीच्या घरातून रोख रक्कम गायब झाली, त्याची चौकशी आरोपीने फिर्यादीकडे केली असता फिर्यादीवरच गुन्हा दाखल होईल या भीतीने तिने आरोपी विरुद्ध खोटी फिर्याद दाखल केल्याचा युक्तिवाद केला.

सरकार पक्ष, पीडित महिला आणि आरोपीचे वकील या सर्वांचे म्हणणे ऐकल्यानंतर जिल्हा व सत्र न्यायाधीश वाय. एच. अमेठा यांनी आरोपीचा अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर केला.

anantpangarkar
अनंत पांगारकर

Post Views: 1,601
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
अनंत पांगारकर
  • Website

Related Posts

संगमनेरचे आमदार अमोल खताळ यांना सर्वोच्च न्यायालयाचा मोठा धक्का; आमदारकी टांगणीला

July 30, 2026

‘दत्तधाम’च्या गडगे महाराजाच्या पत्नी अन् मुलाला दिलासा; सत्र न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन मंजूर

July 22, 2026

संगमनेर पोलिसांचा धक्कादायक कारनामा; १२ वर्षांच्या अल्पवयीन मुलाला २० वर्षांचा दाखवून तब्बल पाच महिने डांबले जेलमध्ये; न्यायालयानं बजावली नोटीस, तपासी अधिकारी अडचणीत!

July 1, 2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
महाराष्ट्र संवाद विशेष

स्वातंत्र्य दिन विशेष: ८० वर्षांचा भारत; स्वातंत्र्य मिळाले, पण आपण खरेच स्वतंत्र झालो का?

By अनंत पांगारकरAugust 15, 20260

अमोल शेलकर- १५ ऑगस्ट २०२६ रोजी भारत आपल्या स्वातंत्र्याचा ८० वा वर्धापन दिन साजरा करत…

स्वातंत्र्य दिन विशेष: देशाला स्वातंत्र्य मिळाले, पण आम्हाला स्वातंत्र्य मिळाले का?

August 15, 2026

शनिवार, १५ ऑगस्ट २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

August 15, 2026

राज्यात खळबळ..! तहसीलदार निलंबित; ‘ते’ प्रकरण भोवलं

August 14, 2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.