Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

गुरुवार ०१ आक्टोंबर २०२६ — जाणून घ्या आजच्या दिवसाचे राशिभविष्य

01/10/2026

अंगारकी चतुर्थीनिमित्त श्री वरदविनायकाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी, आमदार डॉ. किरण लहामटे यांच्यासह हजारो भाविकांनी घेतले दर्शन; खिचडी महाप्रसाद व सामुदायिक अथर्वशीर्ष पठणाने कोतूळ नगरी भक्तिमय

30/09/2026

संगमनेरकरांची सुरक्षा होणार अधिक भक्कम; नगरपरिषदेसाठी २ नवीन अग्निशामक वाहनांना प्रशासकीय मान्यता, आमदार अमोल खताळ यांच्या प्रयत्नांना यश! साक्षी सूर्यवंशी यांची माहिती

30/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » शेतकऱ्यांच्या जीवनात पशुधनाचे महत्त्व, दुग्ध व्यवसायामुळे शेतकऱ्यांच्या कौटुंबिक विकासाला बळकटी : माजी कृषिमंत्री आमदार बाळासाहेब थोरात
शेती व सहकार

शेतकऱ्यांच्या जीवनात पशुधनाचे महत्त्व, दुग्ध व्यवसायामुळे शेतकऱ्यांच्या कौटुंबिक विकासाला बळकटी : माजी कृषिमंत्री आमदार बाळासाहेब थोरात

Annant PpangarkarBy Annant Ppangarkar09/11/2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

राजहंस दूध संघात वसुबारस निमित्त गाईंचे पूजन

महाराष्ट्र संवाद न्यूज

संगमनेर : शेतीला जोडधंदा असलेल्या दूध व्यवसायाने अनेक शेतकरी कुटुंबाच्या आर्थिक विकासाला मोठी बळकटी दिली आहे. संगमनेर तालुक्यातून दररोज सुमारे सात लाख लिटर दुधाची निर्मिती होत असून शेतकऱ्यांच्या जीवनात पशुधनाचे मोठे महत्त्व असल्याचे प्रतिपादन माजी कृषी व महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी केले.

राजहंस दूध संघ येथे वसुबारस निमित्त गाईंचे पूजन करण्यात आले. यावेळी समवेत दूध संघाचे चेअरमन रणजितसिंह देशमुख, व्हा. चेअरमन राजेंद्र चकोर, रामहरी कातोरे, डॉ. तुषार दिघे कार्यकारी संचालक डॉ. सुजित खिलारी आदींसह विविध मान्यवर उपस्थित होते.

थोरात म्हणाले, दूध संघाने तालुक्याची ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत केली आहे. राजहंस दूध संघ हा राज्यात प्रथम क्रमांकाचा ओळखला जात असून दीपावली निमित्त दूध संघाने 32 कोटी रुपये बँकेत वर्ग करून दूध उत्पादक, कामगार, व्यापारी यांच्या जीवनात आनंद निर्माण केला आहे.

संगमनेरच्या सहकारी संस्थांमुळे तालुक्यातील नागरिकांच्या जीवनात आनंद निर्माण झाला आहे. वसुबारस निमित्त तालुक्यात गायींचे पूजन केले जात आहे. तालुक्यात पशुधन मोठे असून दररोज सुमारे सात लाख लिटर दूध निर्माण होत आहे. मोठ्या कष्टातून उभ्या असलेल्या या व्यवसायामुळे शेतकऱ्यांच्या जीवनात समृद्धी आली असल्याचेही ते म्हणाले.

यावेळी शेतकरी बंधू व महिलांसह दूध संघाचे सर्व अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

रणजीतसिंह देशमुख म्हणाले…

भारतीय संस्कृतीत गाईला आईचे स्थान दिले आहे. तिची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी वसुबारसनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे. दूध संघाच्यावतीने गायींच्या आरोग्यासाठी जंत निर्मूलन, विविध लसीकरण सातत्याने केले जात असून पशुधनाच्या आरोग्याची काळजी घेतली जात आहे. आमदार थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली दूध संघाने कायम दूध उत्पादकांच्या जीवनात आनंद निर्माण केला.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 694
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

सोशल मीडियावर खोटे पसरवणाऱ्यांचा बंदोबस्त करा: माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचा इशारा; संगमनेरची आर्थिक समृद्धी टिकवण्यासाठी संघर्षाचे आवाहन

21/09/2026

राज्यात सरसकट दुष्काळ जाहीर करा; माजी कृषिमंत्री बाळासाहेब थोरात यांची मागणी, रेल्वेप्रश्नी लोकप्रतिनिधीच्या बालिश वक्तव्यावरही केले भाष्य

19/09/2026

थोरात कारखान्याचे ११ लाख मेट्रिक टनाचे गाळप उद्दिष्ट; बॉयलर अग्नीप्रदीपन समारंभात बाळासाहेब थोरात यांचे आवाहन

19/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राशिभविष्य

गुरुवार ०१ आक्टोंबर २०२६ — जाणून घ्या आजच्या दिवसाचे राशिभविष्य

By Annant Ppangarkar01/10/20260

आजचे राशिभविष्य –  मेष – आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत उत्साहाचा आणि नवीन ऊर्जा घेऊन येणारा…

अंगारकी चतुर्थीनिमित्त श्री वरदविनायकाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी, आमदार डॉ. किरण लहामटे यांच्यासह हजारो भाविकांनी घेतले दर्शन; खिचडी महाप्रसाद व सामुदायिक अथर्वशीर्ष पठणाने कोतूळ नगरी भक्तिमय

30/09/2026

संगमनेरकरांची सुरक्षा होणार अधिक भक्कम; नगरपरिषदेसाठी २ नवीन अग्निशामक वाहनांना प्रशासकीय मान्यता, आमदार अमोल खताळ यांच्या प्रयत्नांना यश! साक्षी सूर्यवंशी यांची माहिती

30/09/2026

महात्मा गांधी जयंतीनिमित्त संगमनेरमध्ये जयहिंदच्या वतीने विविध उपक्रम; १५७ विद्यार्थ्यांची प्रभात फेरी अन् ‘जवाहरलाल हाजीर हो’ पुस्तकाचे प्रकाशन

30/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.