Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

चंदनापुरी येथे ‘वसुंधरा पायी दिंडी’चे स्वागत व वृक्षारोपण— बदलत्या हवामानावर मात करण्यासाठी प्रत्येकाने झाड लावून संवर्धन करावे: आमदार अमोल खताळ

03/10/2026

पोलिसाच्या शेतातील बाजरीच्या कणसांवर जादूटोणा; संगमनेर तालुक्यात एकावर गुन्हा दाखल

03/10/2026

आज शनिवार ३ ऑक्टोबर — तुमचा आजचा दिवस कसा असेल जाणून घेऊया

03/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » निळवंडेचे पाणी हा परमेश्वराचा प्रसाद, या पाण्यामुळे आनंदाची दिवाळी : आमदार बाळासाहेब थोरात
इतिहास

निळवंडेचे पाणी हा परमेश्वराचा प्रसाद, या पाण्यामुळे आनंदाची दिवाळी : आमदार बाळासाहेब थोरात

Annant PpangarkarBy Annant Ppangarkar10/11/2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज

संगमनेर – निळवंडे धरणाचे पाणी दुष्काळी भागातील जनतेला मिळावे हे स्वप्न ठेवून आपण काम केले. या कामासाठी योगदान दिले. मात्र पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटनावेळी योगदान देणारे दूरच मात्र प्रकल्पग्रस्त किंवा साधा कामगारही उपस्थित नव्हता. ही बाब चांगली नाही. मोठ्या प्रयत्नातून मिळालेल्या निळवंडेच्या पाण्यामुळे तालुक्यात आनंदाची दिवाळी होत असून यापुढील काळात हे पाणी सर्वांना मिळेल, यासाठी काम केले जाणार आहे. निळवंडेचे पाणी हा परमेश्वराचा प्रसाद असल्याचे प्रतिपादन निळवंडे धरण व कालव्याचे निर्माते जलनायक आमदार बाळासाहेब थोरात यांनी केले.

वडगाव पान येथे आयोजित कृतज्ञता सोहळा व जल पूजन कार्यक्रमात थोरात बोलत होते. यावेळी माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, साखर संघाचे उपाध्यक्ष बाबा ओहोळ, माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे आदी उपस्थित होते.

थोरात म्हणाले संगमनेर तालुका हा संघर्षातून समृद्धी निर्माण करणार आहे. 1999 पासून आपण निळवंडेच्या कामाला सुरुवात केली. दररोज सातत्याने या कामाचा आढावा घेतला. आदर्शवत पुनर्वसन केले. धरणग्रस्तांना संगमनेर तालुक्यात जमिनी दिल्या. सहकारी संस्थांमध्ये सन्मानाच्या नोकऱ्या दिल्या. धरण आणि कालव्याच्या निर्मितीसाठी प्रत्येक टप्प्यावर निधी मिळविला.

कोरोनासारख्या मोठ्या संकटात हे काम सुरू ठेवले होते. या कामात जेष्ठ नेते मधुकरराव पिचड यांची मोठी मदत झाली, हे आपण वेळोवेळी जाहीरपणे सांगितले आहे.

उन्हाळ्यामध्ये निळवंडे धरणात दहा टीएमसी पाणी साठा होता. खरंतर त्यावेळी दुष्काळी गावातील सर्व बंधारे भरून घेता आले असते. मात्र काहींनी श्रेयासाठी हे पाणी थांबविले. पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले त्यावेळी या धरणाच्या निर्मितीसाठी योगदान देणाऱ्या कोणालाही बोलावले गेले नाही. माजी मंत्री मधुकरराव पिचड, अकोले चे विद्यमान आमदार यांना देखील बोलावले नाही. एक प्रकल्पग्रस्त किंवा साधा कामगारही बोलविला नाही. ज्यांनी योगदान दिले ते तिथे नव्हते आणि ज्यांचे काहीच योगदान नाही ते मात्र श्रेय लाटण्याचा प्रयत्न करत असल्याचे जनतेला ज्ञात आहे.

आता डाव्या कालव्यातून पाणी सुरू असून फोनाफोनी करून पाणी फोडले जात आहे. अनेक गावांना पाण्यापासून वंचित ठेवले जात आहे. अशी दडपशाही आणि दहशतीचे राजकारण संगमनेर तालुक्यात खपवून घेतली जाणार नाही. तुम्ही इकडे येतात ते तालुक्यातील विकास कामे थांबविण्यासाठी, दहशत निर्माण करण्यासाठी. आम्ही राहता तालुक्यात जातो ते चांगले निर्माण करण्यासाठी. 35 वर्ष आपल्या घरातही या भागाची खासदारकी होती यातून संगमनेरसाठी आपण नेमके काय केले हा मोठा प्रश्न आहे.

आम्ही काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ राहिलो. चांगल्या वाईट दिवसातही एकनिष्ठ आहोत, काही लोक मात्र संधीसाधूप्रमाणे उड्या मारतात. हे जनतेला मान्य नाही. इडीच्या भीतीने तिकडे गेले की ते मोकळे राहतात. अत्यंत कमी पाऊस झालेला असताना देखील सत्ताधारी आमदारांच्याच तालुक्यात दुष्काळी तालुके जाहीर केले. इतर तालुक्यात का नाही, असे देखील थोरात म्हणाले.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,213
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेरात महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांची जयंती उत्साहात; १५७ बालगांधींच्या प्रभात फेरीने शहर दुमदुमले, गांधीजींच्या विचारांमुळे जगात भारताची मोठी ओळख: मा. आमदार डॉ. सुधीर तांबे

02/10/2026

संगमनेरमध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकांच्या उभारणीला गती

01/07/2026

संगमनेरमध्ये शिवरायांचे भव्य अश्वारूढ स्मारक साकारणार; संगमनेरकरांची अश्वारूढ स्मारकाला पसंती, जनमताचा आदर करत पालिकेच्या सभेत ठरावावर शिक्कामोर्तब

14/04/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
धार्मिक

चंदनापुरी येथे ‘वसुंधरा पायी दिंडी’चे स्वागत व वृक्षारोपण— बदलत्या हवामानावर मात करण्यासाठी प्रत्येकाने झाड लावून संवर्धन करावे: आमदार अमोल खताळ

By Annant Ppangarkar03/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- बदलते हवामान, वाढते तापमान आणि राज्यात निर्माण झालेली दुष्काळी परिस्थिती यावर…

पोलिसाच्या शेतातील बाजरीच्या कणसांवर जादूटोणा; संगमनेर तालुक्यात एकावर गुन्हा दाखल

03/10/2026

आज शनिवार ३ ऑक्टोबर — तुमचा आजचा दिवस कसा असेल जाणून घेऊया

03/10/2026

पुस्तकापुरते मर्यादित न राहता ऑडिओ आणि रील्सच्या माध्यमातून विचार पोहोचवा : बाळासाहेब थोरात

02/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.